पुन्हा एकदा सरकारचं शिष्टमंडळ रात्री मनोज जरांगे यांची भेट घेणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत वर्षा निवासस्थानावरील बैठक संपन्न झालेली आहे.
छत्रपती संभाजी नगरचे विभागीय आयुक्त विशेष विमानाने मुंबईत दाखल झाले आहेत. मनोज जरांगे यांच्यासोबत चर्चा करण्यासाठी ते वाशीला जाणार असल्याची माहिती आहे.
सगेसोयऱ्यांसंदर्भात आजच जीआर निघणार असल्याची माहिती येत असून मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी यासंदर्भात बैठक सुरु आहे.
दिल्लीतील शाहदरा परिसरातील एका घराला आग लागल्याची घटना घडली आहे. अग्निशमन दलाच्या एकूण 5 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून घरामध्ये 5 जण अडकल्याची भीती व्यक्त केली जातेय.
बिहारमधील सत्तासंघर्षाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीमध्ये भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची एक बैठक सुरु झाली आहे. या बैठकीसाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची उपस्थिती आहे.
मनोज जरांगे यांची पदयात्रा वाशी येथे आहे. जरांगेंनी सरकारला उद्या १२ वाजेपर्यंत वेळ दिला आहे, दरम्यान सरकारने शिष्टमंडळ नवीन ड्राफ्टसह मनोज जरांगे यांची भेट घेणार आहे.
शाहदरा परिसरातील एका घराला आग लागल्याचा फोन आला आहे. अग्निशमन दलाच्या एकूण 5 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. 5 जण अडकल्याची भीती. बचाव कार्य सुरू आहे
बिहारचे मंत्री आणि आरजेडी नेते तेजप्रताप यादव बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्या पाटणा येथील निवासस्थानी पोहोचले.
27 आणि 28 जानेवारीला भाजप बिहारच्या राज्य कार्यकारिणीची बैठक बोलावण्यात आली आहे. बिहारचे प्रभारी विनोद तावडे उद्या म्हणजेच २७ जानेवारीला पाटण्याला जाणार आहेत.
मराठा आरक्षणाचा लढा आता निर्णायक टप्प्यावर पोहोचला आहे. वाशीत पोहोचलेलं मराठ्यांचं भगवं वादळ गुलाल घेऊनच माघारी परतणार असल्याचं दिसून येतंय. यातच आता अंतरवाली सराटीसह राज्यातील सर्व गुन्हे मागे घेण्याचे गृहविभागाने आदेश दिले आहेत
कुणबी प्रमाणपत्रा बाबत सगेसोयरे यांना देखील आरक्षण मिळण्यासाठीचा अध्यादेश आज आम्हाला द्या. आम्ही आजाद मैदानावर जात नाही. मात्र जर नाही मिळाला तर आझाद मैदानावर जाणार असे जरांगे पाटील म्हणाले.
वाशीतील पाचही मार्केट परिसरातील रस्ते जाम झाले आहेत.आंदोलकांची वाहने रस्त्यावर उभी केल्यामुळे लहान वाहनांना मार्ग काढणे कठीण झालंय. पाम बीच रोडवर बॅरिकेट्स टाकून वाशीहून सानपाडा जाणारा रस्ता बंद करण्यात आला आहे. ऐरोलीकडे जाणारा रस्ताही बंद आहे.
५४ लाख नोंदी सापडल्या आहेत. पण, आपल्या नोंदी आहेत हे काही मराठ्यांना माहिती नाही. त्यासाठी शिबिर सुरु करावं, अशी मागणी जरांगे पाटील यांनी केली आहे.
सरकार मनोज जरांगे पाटील यांना दिलेला शब्द पाळेल. फक्त इतर समाजाला धक्का लागू नये. संविधानाच्या चौकटीत आरक्षण मिळावे, असं भाजप नेत्या पंकजा मुंडे म्हणाल्या.
मनोज जरांगे पाटील हे सरकारनं दिलेल्या जीआरचं वाचन करत आहेत. यात ५४ लाख मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याचा उल्लेख आहे. जरांगे लवकरच वाशीत सभेला संबोधित करतील.
मनोज जरांगे पाटील यांची वाशीच्या शिवाजी चौकात लवकरच सभा होणार आहे. त्याआधी वाशीत सीआरपीएफ आणि आरपीफ जवान दाखल झाले आहेत. कायदा आणि सुवव्यस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून ही खबरदारी घेण्यात येत आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी रवाना झाले आहेत, अशी माहिती मंत्री दादा भुसे यांनी दिली आहे. आज सकाळी शिंदे आणि जरांगे यांच्यामध्ये फोनवर चर्चा झाली होती.
मराठा आंदोलकांनी वाशी येथे आंदोलन स्थळी पेढे वाटले असल्याचे वृत्त समोर येत आहे. यामुळे निर्णय सकारात्मक असल्याचे म्हणले जात आहे.
वाशी येथे सुरु असलेल्या मराठा आंदोलनात सहभागी होण्यासाठी जाणाऱ्या मराठा युवकांनी ठाणे वाशी लोकलमध्ये केली गर्दी केल्याचे पहायला मिळत आहे.
मराठा आदोलकांनी सीएसटीएम परिसरात रास्ता रोको आंदोलन केले असून आझाद मैदानाकडे जाणारा रस्ता रोखून धरला आहे.
जरांगे पाटलांच्या सर्व मागण्या मान्य झाल्या आहेत अशी माहिती मंत्री दीपक केसरकर यांनी दिली.
वाशी येथील शिवाजी चौकामध्ये मनोज जारांगे पाटील हे छत्रपती शिवाजी महाराजांंना अभिवादन करून उपस्थित मराठा बांधवाना संबोधित करणार आहेत. मनोज जारांगे पाटील काय बोलणार? याकडे सगळ्यांचेच लक्ष लागले आहे. याठिकाणी मराठा बांधव मोठ्या उत्साहात घोषणाबाजी देत जरांगे पाटील यांची आतुरतेने वाट पाहत आहेत.
ना धर्मासाठी...ना जातीसाठी...एक चहा माणुसकीसाठी म्हणत दलित पँथर च्या माध्यमातून संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबई आंदोलनासाठी नवी मुंबईत येणाऱ्या मराठा समाज बांधवांसाठी २४ तास मोफत चहा चे वाटप सुरु ठेवण्यात आले आहे.
शिष्टमंडळासोबतची मनोज जरांगेंची नुकतीच बैठक पार पडली. यानंतर आता जरांगेंनी बाहेर येऊन सर्व आंदोलकांना शिवाजी चौकात जमा होण्यास सांगितलं आहे. शिष्टमंडळासोबत झालेल्या चर्चेनंतर जो काही निर्णय घ्यायचा आहे तो सर्व मराठा बांधवांशी चर्चा करूनच घेतला जाईल जरांगे पाटलांनी म्हटलं आहे. सर्व मराठा आंदोलक शिवाजी चौकाकडे रवाना झाले आहेत. इथं थोड्याच वेळात त्यांची जाहीर सभा पार पडणार आहे.
उत्तर प्रदेश या राज्यानं यंदा राम मंदिराचा चित्ररथ सादर केला. नुकतंच अयोध्येतील राम जन्मभूमीवर भव्य अशा राम मंदिराचं उद्घाटन पार पडलं. पंतप्रधान मोदींच्या हस्ते रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा पार पडली.
विविध राज्यांच्या चित्ररथांचं कर्तव्यपथावर आगमन झालं आहे. राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश तसेच विविध केंद्रीय मंत्रालयांच्याही चित्ररथांचा यामध्ये समावेश आहे. यामध्ये महाराष्ट्राचा शिवराज्याभिषेकाच्या चित्ररथं उपस्थितांच्या डोळ्याचं पारण फेडलं.
कर्तव्यपथावर प्रजासत्ताक दिनाच्या परेडला सुरुवात झाली आहे. यंदा प्रथमच या परेडची सुरुवात 100 महिला कलाकारांद्वारे भारतीय वाद्ये वाजवून झाली. यामध्ये शंख, नादस्वरम, नगाडा आणि महाराष्ट्राचा ढोल-ताशा वाजवून एका संगितीक पद्धतीनं या परेडची सुरुवात झाली.
पंतप्रधान नरेंद्र मोदींचं कर्तव्यपथावर आगमन झालं आहे. या ठिकाणी ते मान्यवरांच्या भेटी घेऊन त्यांच्या अभिवादनाचा स्विकार केला. यानंतर ते आपल्या जागी स्थानापन्न होतील.
प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याचं नेतृत्व राष्ट्रपती मुर्मू करणार आहेत. त्यांनी सर्व सैन्य दलांच्यावतीनं मानवंदना स्विकारली आणि ते आपल्या स्थानी स्थानापन्न झाल्या आहेत.
देशभरात आज ७५ वा प्रजासत्ताक दिन साजरा होत आहे. याचा प्रमुख राष्ट्रीय सोहळा राजधानी नवी दिल्लीतील कर्तव्यपथावर पार पडणार आहे. या सोहळ्याला सुरुवात करण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय युद्ध स्मारकाला भेट दिली अनं शहिद जावांना मानवंदना दिली.
मालदीवचे माजी राष्ट्रपती इब्राहिम मोहमेद सोलिह यांनी भारताच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. राष्ट्रपती मुर्मू, पंतप्रधान मोदी आणि भारतातील नागरिकांना त्यांनी शुभेच्छा दिल्या. मालदीव आणि भारतातील संबंध अधिक बळकट व्हावेत अशी इच्छाही त्यांनी व्यक्त केली.
"सारे जहाँ से अच्छा.. हिंदोस्तां हमारा" हे हिंदी देशभक्तीपर गीत गाऊन जपानचे भारतातील राजदूत हिरोशी सुझूकी यांनी देशातील नागरिकांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिल्लीतील आपल्या निवासस्थानी ध्वजवंदन करत प्रजासत्ताक दिन साजरा केला. यावेळी त्यांनी नागरिकांना शुभेच्छा दिल्या.
ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांंनी भारताला 75 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. भारता-ऑस्ट्रेलिया हे दोन्ही देश यापूर्वी कधीच एवढ्या जवळ नव्हते. आपल्यातील मैत्री साजरी करण्याचा हा आणखी एक क्षण आहे, असं त्यांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे.
राज्य सरकारचं शिष्टमंडळ हे मनोज जरांगेंशी चर्चा करण्यासाठी वाशीमध्ये दाखल झालं आहे. यामध्ये सुमंत भांगे, मंगेश चिवटे यांचा सहभाग असल्याचं सांगण्यात येतंय. सर्वांसमक्ष चर्चा व्हावी अशी जरांगेंची मागणी असल्याचंही म्हटलं जातंय. ही चर्चा कशी पार पडते, आणि त्यानंतर मनोज जरांगे काय निर्णय घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत चर्चा करण्यासाठी राज्य सरकारचं एक शिष्टमंडळ येणार आहे. ही चर्चा झाल्यानंतर ते वाशीमध्ये आपल्या आंदोलनाची दिशा स्पष्ट करणार आहेत. यामुळे सकाळपासून वाशीमध्ये मराठा समाजाच्या तरुणांची गर्दी जमू लागली आहे. यावेळी जरांगेंच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केलेलीही पहायला मिळत आहे.
गोव्याचे राज्यपाल पी.एस. श्रीधरन पिल्लई यांनी गोवा विद्यापीठ मैदानावर होत असणाऱ्या प्रजासत्ताक दिन सोहळ्यात ध्वजवंदन केलं. या सोहळ्याची दृश्ये समोर आली आहेत.
भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी दिल्लीमधील भाजप मुख्यालय परिसरात ध्वजवंदन केलं. यावेळी त्यांंनी देशातील नागरिकांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
मराठा आरक्षणाबाबत शासनाच्या शिष्टमंडळासोबत चर्चा केल्यानंतर मनोज जरांगे पाटील हे आपली भूमिका वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात जाहीर करणार आहेत. जरांगे पाटील यांची भूमिका जाणून घेण्यासाठी हजारो मराठा बांधव या चौकात जमू लागले आहेत.
प्रजासत्ताक दिनानिमित्त आयटीबीपीच्या हिमवीरांनी भारत-चीन सीमेवरील बर्फाळ डोंगरांवर तिरंगा फडकावला आहे. या माध्यमातून त्यांनी देशातील नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत.
तामिळनाडूचे राज्यपाल आर. एन. रवी यांनी ध्वजवंदन केलं. यावेळी मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिनदेखील उपस्थित होते.
तेलंगणाच्या राज्यपाल तामिलिसाई सौंदराराजन यांनी सिकंदराबाद येथील परेड ग्राऊंडवर ध्वजवंदन केलं. यावेळी मुख्यमंत्री रेवंथ रेड्डीदेखील उपस्थित होते.
मनोज जरांगेंच्या हस्ते नवी मुंबईमध्ये ध्वजवंदन पार पडलं आहे. यानंतर ते आता आपल्या आंदोलनाची आजची दिशा स्पष्ट करतील.
वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ध्वजवंदन पार पडलं आहे.
आज प्रजासत्ताकदिनानिमित्त ध्वजवंदनानंतर सरसंघचालकांनी उपस्थितांना संबोधित केलं. यावेळी भारत लवकरच विश्वगुरू होणार असल्याचा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. यासाठी आपल्याला अनुपालन करण्याची गरज असल्याचं ते म्हणाले. 40 वर्षांपूर्वी जर कुणी हे म्हटलं असेल, तर आपलेच लोक हसले असते. मात्र, आज हे खरं होताना दिसतंय. संविधान लागू करणं ही एक गोष्ट आहे, तर त्याचं पालन करणं ही एक गोष्ट आहे असंही ते यावेळी म्हणाले.
चंद्रपुरात अज्ञात आरोपींकडून युवासेना (ठाकरे गट) शहर प्रमुख शिवा वझरकर यांची हत्या करण्यात आली आहे. संबंधित घटना ही चंद्रपुरातील उच्चभ्रू सरकारनगर भागात घडली आहे. 30 वर्षीय शिवा वझरकर यांचा मृतदेह त्यांच्याच एका मित्राच्या कार्यालयापाशी सापडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
कोल्हापूर : राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांच्या पुढाकारातून होत असलेल्या भीमा कृषी पशुपक्षी प्रदर्शनाला आजपासून (ता. २६) मेरी वेदर मैदानावर सुरुवात होत आहे. प्रदर्शनाचे हे १५ वे वर्ष असून, पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते व माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या अध्यक्षतेखाली या प्रदर्शनाचे उद्घाटन सायंकाळी पाच वाजता होणार आहे.
कोल्हापूर : अंगणवाडी सेविका (Anganwadi Sevika) व मदतनीसांना पेन्शन योजना (Pension Scheme) व ग्रॅच्युइटी लागू करून त्याची तत्काळ अंमलबजावणी केली जाईल, या निर्णयाची घोषणा महिला व बालविकास विभागाचे सचिव अनुप कुमार यादव (Anup Kumar Yadav) यांनी केल्यानंतर अंगणवाडी सेविका, मदतनीसांनी संप मागे घेतला.
मुंबई : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात मोठ्या संख्येने मराठा समाज मुंबईच्या दिशेने कूच करत आहे. आज त्यांच्या आंदोलनाचा सातवा दिवस आहे. मनोज जरांगेंची मराठा आरक्षण पदयात्रा नवी मुंबईत दाखल झाली असून आज सकाळी दहाच्या सुमारास ते मुंबईच्या दिशेने रवाना होणार आहेत.
उज्जैन, मध्य प्रदेश : आज प्रजासत्ताक दिनी भस्म आरतीनंतर महाकालेश्वर शिवलिंगाला तिरंग्याने सजवण्यात आले आहे.
नवी मुंबई : मराठा आरक्षणाचा मोर्चा पामबीच मार्गे वळवण्यात आल्याने पामबीच मार्ग इतर वाहनांसाठी पूर्णत: बंद करण्यात आला आहे. तसेच इतर वाहनांसाठी पोलिसांनी पर्यायी मार्ग निश्चित करून या मार्गावरून जाण्यास सूचित केले आहे. गुरुवारी सायंकाळपासून काही मोर्चेकऱ्यांची वाहने नवी मुंबईत डेरेदाखल झाली आहेत. त्यांच्या मोर्चासोबत मोठ्या प्रमाणात दुचाकी व चारचाकी वाहनांचा ताफा आहे. या मोर्चाचा एक दिवसाचा मुक्काम नवी मुंबई पोलिस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात असणार आहे.
मुंबई : कामाठीपुरा, ग्रँट रोड येथील रेस्टॉरंटमध्ये पहाटे 2 वाजता आग लागली. अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आतापर्यंत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती मुंबई अग्निशमन दलाने दिली आहे.
रियासी, जम्मू आणि काश्मीर : 75 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त रियासीमधील भीमगड किल्ला तिरंगी दिव्यांनी उजळून निघाला आहे.
गुवाहाटी : आसाममधील काझीरंगा राष्ट्रीय उद्यानात आज सोनेरी रंगाची छटा असलेला दुर्मिळ वाघ दिसला. स्थानिक मार्गदर्शकासह राष्ट्रीय उद्यानात गेलेल्या एका छायाचित्रकाराला या पूर्ण वाढ झालेल्या नर वाघाचे दर्शन झाले. हा अत्यंत दुर्मिळ प्रकार असून त्याचे डीएनए मॅपिंग केले जात असल्याचे वनअधिकाऱ्यांनी सांगितले. आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्व सरमा यांनी या वाघाचे छायाचित्र सोशल मीडियावर प्रसिद्ध केले आहे.
Latest Marathi News Live Update : प्रजासत्ताक दिनाचा उत्साह संपूर्ण देशभरात पाहायला मिळत आहे. आज, 26 जानेवारी 2024 रोजी आपण 75 वा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहोत. तसेच मराठा आरक्षणाच्या मुद्यावर तोडगा काढण्यासाठी राज्य सरकारने वेगाने हालचाली सुरू केल्या आहेत. आरक्षणाच्या मागणीबाबत मनोज जरांगे-पाटील यांच्यासमवेत चर्चा करण्यासाठी सरकारतर्फे गुरुवारी दोन शिष्टमंडळे स्वतंत्रपणे लोणावळा (वाकसई) येथे आली होती. मात्र, दोन्ही शिष्टमंडळांचे म्हणणे न पटल्याने जरांगे त्यांच्या मतावर ठाम राहिले. यानंतर आंदोलकांनी मुंबईच्या दिशेने कूच केली.
प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने राष्ट्रीय शौर्य पुरस्कारांची घोषणा केली. केंद्रीय गृहमंत्रालयाने जारी केलेल्या यादीनुसार पोलिस, अग्निशमन दल, होमगार्ड, नागरी संरक्षण आदींमधील एकूण १,१३२ कर्मचाऱ्यांना शौर्य किंवा सेवा पुरस्कारांनी आज सन्मानित केले जाणार आहे. तसेच वाराणसीतील ज्ञानवापी मशिदीखाली देखील मंदिराचे अस्तित्व असल्याचे उघड झाले आहे. याबाबतच्या सर्वेक्षण अहवालातूनच याबाबतची माहिती समोर आली आहे. त्याचबरोबर महाविकास आघाडीमध्ये (मविआ) अखेरीस वंचित बहुजन आघाडीचा समावेश झाला असून यापुढील ‘मविआ’च्या बैठकांमध्ये सहभागी होण्याची तयारी ‘वंचित’चे नेते प्रकाश आंबेडकर यांनी दर्शविली आहे. यासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडीचा आपण 'लाईव्ह ब्लाॅग'च्या माध्यमातून आढावा घेणार आहोत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.