संसदेतील खासदार निलंबनाचा निषेध करण्यासाठी इंडिया आघाडी उद्या आंदोलन करणार आहे. काँग्रेस नेते शशी थरुर म्हणाले, सर्वजण दिल्लीतील जंतरमंतरवर आंदोलन करणार आहोत. सत्ताधारी पक्ष लोकशाहीचा ऱ्हास करत आहे, हे जनतेला दाखवून द्यावं लागेल.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी राज्यसभेत बोलताना काँग्रेस सरकारवर ताशेरे ओढले. काँग्रेसच्या चुकीच्या धोरणामुळे दहशतवाद वाढला आणि ७० हजार जणांचा मृत्यू झाला, असा आरोप त्यांनी केला.
काँग्रेस खासदार दिग्विजय सिंह यांनी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांची भेट घेतली. दिल्लीमध्ये उभय नेत्यांची भेट झाली आहे.
संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या नियोजित समारोपाच्या एक दिवस अगोदर राज्यसभेचे कामकाज तहकूब
जम्मू-काश्मीरच्या राजौरीतील थानामंडी भागात दहशतवाद्यांनी लष्करी वाहनावर केलेल्या हल्ल्यात तीन जवान शहीद झाले आहेत. तर इतर तीन जवान गंभीररित्या जखमी झाले आहेत. दहशतवाद्यांच्या हल्ल्याला आपल्या जवानांनी सडेतोड प्रत्युत्तर दिलं. काल संध्याकाळपासून या ठिकाणी लष्कराकडून सर्च ऑपरेशन राबवलं जात होतं.
इंदापूरमधील बावडा इथल्या श्री शिवाजी विद्यालयाच्या शैक्षणिक सहलीच्या बसला भीषण अपघात झाला आहे. सोलापूरजवळील अकलूज इथं हा अपघात झाला. यामध्ये एका शिक्षकाचा मृत्यू झाला असून दुसरा एक शिक्षक जखमी झाला आहे. तसेच काही लहान विद्यार्थी देखील जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
भारतीय कुस्ती महासंघाच्या अध्यक्षपदावर पुन्हा ब्रिजभूषण शरण सिंहचंच वर्चस्व कायम राहिल्यानं निराश झालेल्या ऑलिम्पिक पदक विजेत्या साक्षी मलिकनं कुस्ती सोडण्याचा मानस व्यक्त केला आहे. साक्षी मलिकच्या या निर्णयावर ब्रिजभूषणनंही प्रतिक्रिया दिली असून याच्याशी माझं काही देणंघेणं नाही, असं म्हटलं आहे.
सरसकट आरक्षणासाठी सरकार सकारात्मक असून पुढील महिन्याभरात आरक्षण मिळणार, असं गिरीश महाजन म्हणाले.
"तुमच्याकडून होत नसेल तर स्पष्ट सांगा. तुमचा आमचा रस्ता मोकळा", सरसकट आरक्षणावर मनोज जरांगे पाटील ठाम
सर्वांना सरसकट आरक्षण देता येणार नाही. सरकारकडून लिहून देताना त्यादिवशी काही चुकलं असेल, सर्वकाही चांगलं झालं असताना मग का ताणताय असं म्हणत सरकारच्या शिष्टमंडळाने भूमिका स्पष्ट केली आहे.
सरकारचं शिष्टमंडळ मनोज जरांगे पाटील यांच्याशी चर्चा करत आहे. गिरीश महाजन म्हणाले की पत्नी-मामा यांना सगे-सोयरे धरता येणार नाही. यावर सगे-सोयरे कोण धरले हे स्पष्ट करा असं जरांगे म्हणाले. तसेच आत्या-मामा यांना देखील नातेवाईक गृहित धरा असं ते म्हणाले.
जे ठरलं ते सरकारनं द्यावं. ज्यांच्या नोंदी सापडतील त्यांना प्रमाणपत्र देण्याचं सरकारनं आश्वासन दिलं होतं, असं मनोज जरांगे म्हणाले. यावर महाजन म्हणाले की, पत्नी, आई हे सगेसोयरे होऊ शकत नाहीत. पत्नीच्या कुटुंबीयांना कसं आरक्षण देता येईल. सरसकट आरक्षण दिल्यास ते कोर्टात टिकणार नाही.
रक्ताच्या नातेवाईकांना प्रमाणपत्र देण्यात यावे अशी मागणी मनोज जरांगे यांनी केली. यावेळी पत्नी, माता रक्ताच्या नात्यात येत नाहीत असं गिरीश महाजन म्हणाले. यावरुन जरांगे नाराज झाल्याचं दिसलं.
सरकारच्या शिष्टमंडळासोबत मनोज जरांगे पाटलांची बैठक सुरु झाली आहे. बैठकीसाठी गिरीश महाजन, उदय सामंत, संदीपान भुमरे इत्यादी नेते उपस्थित आहेत.
काँग्रेसच्या वर्किंग कमिटीच्या बैठकीला दिल्लीतील मुख्यालयात सुरुवात झाली आहे. यासाठी पक्षाचे वरिष्ठ नेते उपस्थित आहेत.
संसदेच्या सुरक्षेचा भंग केल्याप्रकरणी दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टाने चारही आरोपींना दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलला आणखी १५ दिवसांची कोठडी सुनावली आहे.
संसद सुरक्षाभंगप्रकरणी चार आरोपींना पटीयाला कोर्टात हजर करण्यात आलं आहे. आऱोपींची सात दिवसांची पोलीस कोठडी संपली आहे.
संसदेतील नक्कल प्रकरणी मायावतींनी इंडिया आघाडीवर टीका केलीये. तसेच खासदारांच्या निलंबनावरही त्यांनी टीका केली.
निवडणूक आयुक्त नियुक्तीचे विधेयक लोकसभेत आज मंजूर झाले आहे. मागील आठवड्यात ते राज्यसभेत मंजूर झाले होते.
दिल्लीच्या कनॉट प्लेसच्या गोपालदास बिल्डिंगला आग लागल्याची घटना घडली आहे. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या १६ गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आहे. सध्या आग विझवण्याचा प्रयत्न सुरु आहे.
काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्याविरोधात भाजप आक्रमक झाली आहे. सभापती धनखड यांची नक्कल केली जात असताना व्हिडिओ शूट केल्याप्रकरणी भाजप नेत्यांनी दिल्लीत आंदोलन चालवलं आहे.
माझगावं यार्डात इंजिन रेल्वे रुळावरून घसरली आहे. त्यामुळे जलद मार्गावरील लोकल वाहतुकीला फटका बसला आहे.
संसद सुरक्षाभंगाप्रकरणी मोठा निर्णय घेण्यात आला आहे. आता संसद सुरक्षेची जबाबदारी CISF कडे देण्यात आली आहे. महत्वाच्या ठिकाणी ही यंत्रणा असते. गृह विभागाच्या अखत्यारीत आता संसदेची सुरक्षा असणार आहे.
मनोज जरांगे पाटील यांची बीडमध्ये २३ डिसेंबरला सभा होणार आहे. त्यासाठी जय्यत तयारी केली जात आहे. अल्टिमेटम संपण्याच्या एक दिवस आधी ही सभा होणार असल्याने याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
चंद्रकांत पाटील यांचा पत्रकारांकशी संवाद सुरू असताना पुन्हा गोंधळ झाला आहे.चंद्रकांत पाटील यांचा पत्रकाराशी संवाद सुरू असताना अनोळखी व्यक्तीने प्रश्न विचारला. अनोळखी व्यक्तीने प्रश्न विचारल्यानंतर चंद्रकांत पाटील देखील गडबडले. तू कोण? असं विचारत चंद्रकांत पाटलांनी त्या माणसाला तपासण्याच्या पोलिसांना केल्या सूचना.
सोशल मीडिया हँडल एक्स हे काही तासांपूर्वी डाऊन झालं होतं. जगभरातील यूजर्सना यावर कोणत्याही पोस्ट दिसत नव्हत्या. मात्र आता एक्सची सेवा पूर्ववत झाली आहे. हे प्लॅटफॉर्म कशामुळे क्रॅश झालं होतं याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही.
कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील तळंदगे या गावचे लोकनियुक्त सरपंच संदीप पोळ यांच्या निवडीला आज एक वर्ष पूर्ण झाले आहे. एका बाजूला सरपंच पदाची वर्षपूर्ती होत असताना, दुसऱ्या बाजूला संदीप पोळ यांच्या शेतात अज्ञातांनी खिळे, टाचण्या, लिंबू, नारळ, गुलाल, कुंकू अशा वस्तू टाकून भानामती आणि करणी करण्याचा प्रयत्न केल्याचं उघड झाले आहे. ही गोष्ट संदीप कोळी यांच्या लक्षात येतात त्यांनी स्वतः शेतात जाऊन या सर्व वस्तू एकत्र करून त्याची होळी केली आहे. करणी, जादूटोणा आणि भानामती प्रकाराला आपण घाबरत नसून महाराष्ट्र शासनाने अशा प्रकारांचं समूळ उच्चाटन करण्यासाठी 2013 सालीच कायदा बनवल्याचं संदीप मुळे यांनी सांगितलं आहे.
सोशल मीडिया साईट एक्स (ट्विटर) हे गेल्या काही मिनिटांपासून क्रॅश झालं आहे. यूजर्सना एक्सवर कोणत्याही पोस्ट दिसत नाहीयेत. एखादी गोष्ट सर्च केल्यानंतर केवळ 'Get Started' हा पर्याय दिसत असून, हँडल्सना फॉलो करण्याचा पर्याय उपलब्ध होत आहे. सोबतच, एखादा टॉपिक सर्च केल्यानंतर त्यासंबंधी हँडल्स दिसत आहेत, मात्र पोस्ट दिसत नसल्याचं स्पष्ट झालं आहे.
हिंगोलीहून पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांच्या गाडीला अपघात अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातामध्ये एकाचा मृत्यू झाला आहे, तर ५ वारकरी जखमी झाले आहे. जखमींमध्ये एका गरोदर महिलेचाही समोवेश आहे. जखमींवर सोलापूरमध्ये उपचार सुरू आहेत.
संसदेमधून खासदारांच्या केलेल्या निलंबनाविरोधात इंडिया आघाडीच्या खासदारांकडून आज विरोध प्रदर्शन केला जाणार आहे. विजय चौक ते संसद भवन असं विरोधी खासदारांकडून मार्च काढत विरोध केला जाणार आहे. विरोधी पक्षांच्या 143 खासदारांचं संसदेतून निलंबन केल्यानंतर सर्वच विरोधी खासदार आक्रमक झाल्याचं पहायला मिळतंय. पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
इंदापूर येथे शाळेच्या सहलीच्या बसला अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. श्री शिवाजी विद्यालय शाळेच्या बसला अपघात झाल्याची माहिती मिळत आहे.
राम मंदिराच्या उद्घाटनाच उद्धव ठाकरे यांना निमंत्रण देणार नाहीत. अडवाणी यांनाही निमंत्रण दिलं नाही. राम मंदिरासाठी त्याग केला त्यांना ते बोलावणार नाहीत. ज्याचं योगदान नाही त्यांचा तो सोहळा आहे, असं वक्तव्य ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी केलं आहे. देशभरात सध्या राम मंदिराच्या उद्घाटनावरून चर्चा सुरू आहेत.
महाराष्ट्रातील आयसीस मॉड्युल प्रकरणी
परदेशात बसलेल्या हस्तकांनी सीरियामधील एका व्यक्तीला त्रयस्त देशाच्या मदतीने साकिब नाचनला भेटण्यासाठी पाठवल होतं असा धक्कादायक दावा एनआयएने केला आहे
सीरियामधून आलेली ती व्यक्ती येत्या काळात आयसीस मॉड्युल कस मोठं करायचं आणि घातपाताच्या कारवाया कशा आणि कुठे करायच्या यासंदर्भात चर्चा करण्यासाठी आली होती. सीरियातून आलेल्या व्यक्तीने साकिब नाचणची पडघा जवळील बोरीवली गावात येऊन भेट घेतली होती, अशी माहिती एनआयएने दिली आहे.
मात्र साकिब नाचनने हे आरोप फेटाळले आहेत. मी माझ्या समाजासाठी आणि अल्लाशी एकनिष्ठ असलेला माणूस म्हणून ओळखला जाईन असंही नाचण चौकशीत दावा केला आहे
साकीब नाचन रियल इस्टेटमध्ये काम करत होता तसेच महिन्याकाठी तो २ ते ३ लाख कमवायचा आणि आयसीस मोड्यूलसाठी हे पैसे वापरले जात होते असा एनआयएचा दावा आहे
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ईडीने पाठवलेल्या चौकशीच्या समन्सला प्रत्युत्तर दिले आहे. अरविंद केजरीवार यांनी हा समन्स राजकीयदृष्ट्या प्रेरित असल्याचे म्हटले आहे. तसेच हा समन्स बेकायदेशीर असल्याचे देखील केजरीवाल म्हणाले आहेत.
केरळमध्ये 20 डिसेंबर रोजी कोरोनाचे 300 नवीन सक्रिय प्रकरणे आणि 3 मृत्यूची नोंद झाली, असे आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने म्हटले आहे. देशात कोरोनाच्या एकूण सक्रिय रुग्णांची संख्या 2669 आहे.
मुंबई होत असलेल्या महिलांच्या एकमेव कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या संघाने भारतीय क्रिकेट संघाविरुद्ध फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
मुंबई : सोलापूर येथील दाणाबंदर परिसरातील एका गोदामावर उत्पादन शुल्क विभागाने छापा टाकून 80 लाख रुपयांच्या विदेशी दारूच्या 590 बाटल्या जप्त केल्या आहेत. एका ट्रान्सपोर्ट कंपनीवर छापा टाकून एक ट्रकही जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून तिघांना अटक करण्यात आली आहे. पुढील तपास सुरू आहे.
भारताचे उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांच्या समर्थनार्थ जाट समुदायाने काँग्रेस कार्यालयाकडे निषेध मोर्चा काढला.
कोरोनाच्या प्रकारातील ‘जेएन.१’ या नव्या उपप्रकाराचा महाराष्ट्रातील पहिला रुग्ण सिंधुदुर्गमध्ये आढळला आहे. केरळमध्ये सर्वप्रथम ७९ वर्षीय महिलेला याची लागण झाली. ही महिला आता पूर्णपणे बरी आहे. त्यानंतर ‘जेएन. १’चा देशातील दुसरा रुग्ण महाराष्ट्रात आढळला असून तो सिंधुदुर्ग जिल्ह्यात असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ४१ वर्षीय पुरुषाला या नव्या उपप्रकाराचा संसर्ग झाला आहे.
मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. मुंबईमध्ये महिनाभर जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. शहरात शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी मुंबई पोलिसांनी जमावबंदीचे आदेश जारी केले आहेत. त्यानुसार, बुधवारी (२० डिसेंबर) मध्यरात्रीपासून नवीन वर्षातील १८ जानेवारीपर्यंत मुंबईत जमावबंदी लागू असणार आहे.
गडचिरोली जिल्ह्याच्या धानोरा तालुक्यातील सोडे येथील शासकीय मुलींच्या आश्रमशाळेतील 105 विद्यार्थीनींना जेवणातून विषबाधा झाली आहे. या विद्यार्थींनींना धानोरा उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
कोल्हापूर : येथील प्रसिद्ध लेखक व कादंबरीकार प्रा. कृष्णात खोत यांना ‘रिंगाण’ कादंबरीसाठी साहित्य अकादमीचा पुरस्कार आज जाहीर झाला. देशातील चोवीस प्रादेशिक भाषांतील साहित्यासाठी पुरस्कार जाहीर झाले असून, मराठी भाषेसाठीचा बहुमान ‘रिंगाण’ला मिळाला आहे.
बंगळूर : कोरोनाचा ‘जेएन -१’ (कोरोनाव्हायरस जेएन-१) हा विषाणूचा प्रकार अतिशय वेगाने पसरत आहे. राज्यामध्ये पाच दिवसांपूर्वी एका ६४ वर्षीय व्यक्तीचा कोरोना संसर्गामुळे मृत्यू झाल्याचे आरोग्य मंत्री दिनेश गुंडूराव यांनी सांगितले.
नवी दिल्ली : लोकशाहीचे स्तंभ असलेली संसद व संवैधानिक संस्थांना पंगू करून मोदी सरकार देशातील लोकशाही उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप काँग्रेस संसदीय दलाच्या नेत्या सोनिया गांधी यांनी आज केला. काँग्रेस संसदीय दलाच्या बैठकीत त्यांनी आज विविध विषयांवर आपली मते मांडून काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना पुढील काळात अधिक सजग व धैर्याने लढा देण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले.
नवी दिल्ली : उपराष्ट्रपती जगदीप धनकड यांची विरोधी खासदाराकडून खिल्ली उडविण्यात आल्यानंतर राष्ट्रपती, पंतप्रधानांसह विविध मंत्र्यांनी त्या घटनेचा निषेध केला. हा प्रकार निराशाजनक असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी दिली. उपराष्ट्रपतींच्या अवमानाच्या निषेधार्थ आज (ता.२१) देशभरात भाजपकडून आंदोलन करण्यात येईल.
Latest Marathi News Live Update : नागपुरातील हिवाळी अधिवेशन संपताच राज्याचे काही मंत्री मनोज जरांगे-पाटील यांच्या भेटीला जाणार आहेत. मनोज जरांगेंनी मराठा आरक्षणाबाबत सरकारला 24 डिसेंबर ही डेडलाईन दिली आहे. तसेच देशात पुन्हा कोरोना विषाणूने डोके वर काढायला सुरुवात केली आहे. देशात कोरोनाचा (Coronavirus) नवीन प्रकार आढळून आल्यानंतर सरकारने उपाययोजना सुरू केल्या आहेत. त्याचबरोबर उपराष्ट्रपती जगदीप धनकड यांची विरोधी खासदाराकडून खिल्ली उडविण्यात आल्यानंतर राष्ट्रपती, पंतप्रधानांसह विविध मंत्र्यांनी त्या घटनेचा निषेध केला. आजही या प्रकरणावरुन संसदेत घमासान होण्याची शक्यता आहे. यासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडीचा आपण लाईव्ह ब्लाॅगच्या माध्यमातून आढावा घेणार आहोत.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.