Latest Marathi News Live Update  Sakal
देश

Latest Marathi News Update : शिंदे गटाने उमेदवार बदलेले ते संजय सिंह यांची तुरुंगातून सुटका, दिवसभरात काय घडलं?

दिल्ली अबकारी धोरण प्रकरणी सहा महिने होते तुरुंगात

सकाळ डिजिटल टीम

आप खासदार संजय सिंह यांची तिहार तुरुंगातून सुटका

दिल्ली अबकारी धोरण प्रकरणी सहा महिन्यांच्या तुरुंगवासानंतर आप खासदार संजय सिंह यांची तिहार तुरुंगातून सुटका

मथुरा लोकसभा मतदारसंघातून हेमा मालिनी यांच्याविरोधात मुकेश धनगर लढणार

उत्तर प्रदेशातील मथुरा लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसने मुकेश धनगर यांना उमेदवारी दिली आहे. ते भाजपच्या विद्यमान खासदार हेमा मालिनी यांच्याशी लढणार आहेत.

नकुल दुबे यांच्या जागी राकेश राठोड यांनी सीतापूर लोकसभा मतदारसंघातून पक्षाचे उमेदवार म्हणून निवड केली आहे

"शिवसेनेतील स्वातंत्र्य सोडून भाजपची गुलामी पत्करली"

शिवसेनेत, मातोश्रीवर सन्मान मिळत होता तो हेमंत पाटील यांना पचवता आला नाही. शिवसेनेतील स्वातंत्र्य सोडून भाजपची गुलामी पत्करली, त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागले आहेत. जाहीर झालेली उमेदवारी केवळ भाजपचा दबाव म्हणून बदलावी लागावी, यापेक्षा मोठी नामुष्की काय असावी. असा दबाव उद्धवसाहेबांवर टाकण्याची हिंमत कधीच कोणाची झाली नाही. आता कुठे जाणार तुम्ही गद्दारांनो? लोकसभा हा तर ट्रेलर आहे. तुमचे दिल्लीश्वर विधानसभेत पूर्ण पिक्चर दाखवतील.

Ambadas Danave Post

फार्मा प्लांटमधील स्फोटात चार कामगार ठार

तेलंगणातील फार्मा प्लांटमध्ये झालेल्या स्फोटात चार कामगार ठार झाले असून, 10 हून अधिकजण जखमी झाले आहेत.

"तैवानच्या लोकांसोबत एकजुटीने उभे आहोत"

तैवानमध्ये आज झालेल्या भूकंपामुळे झालेल्या जीवितहानीमुळे खूप दुःख झाले. शोकाकुल कुटुंबियांप्रती आमची मनःपूर्वक संवेदना आहे आणि जखमींना लवकरात लवकर बरे व्हावे अशी प्रार्थना आहे. आम्ही तैवानच्या लोकांसोबत एकजुटीने उभे आहोत, अशी पोस्ट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे.

केजरीवालांना भेटण्यासाठी भगवंत मान यांचे तिहार प्रशासनाला पत्र

पंजाबचे मुख्यमंत्री आणि आप नेते भगवंत मान यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना भेटण्यासाठी तिहार तुरुंग प्रशासनाची परवानगी मागितली आहे.

70 खाण कामगार अडकले खाणींत

तैवानमध्ये झालेल्या शक्तिशाली भूकंपानंतर 2 कोळशाच्या खाणींमध्ये 70 खाण कामगार अडकले आहेत, त्यांची अद्याप सुटका झाली नाही.

गुजरातच्या जामनगरमध्ये अनेक आप अन् काँग्रेस नेत्यांचा भाजपमध्ये प्रवेश

खासदार पूनमबेन मादाम आणि आमदार रिवाबा जडेजा यांच्या उपस्थितीत आज गुजारतच्या जामनगरमध्ये अनेक आप आणि काँग्रेस नेत्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.

 अजित डोवाल यांची रशिया अन् इराणच्या सुरक्षा परिषद सचिवांशी चर्चा

NSA अजित डोवाल यांनी आज रशिया आणि इराणच्या सुरक्षा परिषदांचे सचिव निकोलाई पात्रुशेव आणि अली अकबर अहमदियान यांच्याशी चर्चा केली.

साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्या तब्येतीची प्रत्यक्ष तपासणी करा; कोर्टाचे एएनआयला निर्देष

मालेगाव 2008 बॉम्बस्फोट प्रकरणी विशेष NIA कोर्टाने मुंबई NIA टीमला भोपाळ NIA टीमशी संपर्क साधून आरोपी साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्या तब्येतीची प्रत्यक्ष तपासणी करण्यास सांगितले. वैद्यकीय अहवालाच्या आधारे न्यायालयाने त्यांना आजची सूट दिली. CrPC 313 स्टेटमेंट रेकॉर्ड करण्यासाठी त्यांची अनुपस्थिती न्यायालयीन कामकाजात अडथळा आणत आहे आणि खटल्याला विलंब करत असल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले आहे. कोर्टाने NIA ला 8 एप्रिल 2024 रोजी त्यांच्या प्रकृतीबाबत सविस्तर अहवाल सादर करण्यास सांगितले.

आपच्या याचिकेवरील निर्णय दिल्ली उच्च न्यायालयाने राखून ठेवला

दिल्ली उच्च न्यायालयाने मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या कथित मद्य धोरण प्रकरणात ईडीने केलेल्या अटकेला आणि रिमांडला आव्हान देणाऱ्या याचिकेवरील निर्णय राखून ठेवला आहे.

Pimpri Chinchwad : पिंपरी चिंचवडमध्ये बॉम्ब शेल आढळून आल्याने खळबळ

पिंपरी चिंचवड शहरातील हिंजवडी पोलीस स्टेशन हद्दीत बॉम्ब शेल आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. हिंजवडी पोलीस स्टेशन हद्दीतील मान - म्हाळुंगे रोडवरील ब्लोरिस सोसायटीच्या मागे पी एम आर डी एच ब्रिजच खोदकाम जेसीबी मशीन ने सुरू असताना हा बॉम्ब शेल आढळून आला आहे.

आढळून आलेला हा बॉम्ब शेल हा पूर्णपणे गंजलेला असून त्यापासून नागरिकांच्या जीवाला कोणताही धोका उद्भवू शकणार नाही असं हिंजवडी पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आल आहे. बॉम्ब सेल आढळून आल्यानंतर हिंजवडी पोलिसांनी लगेच बॉम्ब शोधक व नाशक पथकाला बॉम्ब सेल त्यांच्या कडे सुपूर्द केल आहे. मिळून आलेला बॉम्ब शेल हिंजवडी पोलीस हे लष्कराच्या सदन कमांड कडे सुपूर्द करण्यासाठी आवश्यक असलेलं पत्रव्यवहार करत आहेत.

 Maratha Reservation: मराठा आरक्षणासंदर्भातील सर्व याचिका पूर्णपीठाकडे 

मराठा आरक्षणाशी संबंधित याचिकांवर मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय, न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी आणि न्यायमूर्ती फिरदोश पुनीवाला यांच्या पूर्णपीठापुढे 10 एप्रिल रोजी सुनावणी होणार आहे. 

Lok Sabha Election 2024: टिळक भवन येथे काँग्रेसच्या प्रचार समिती आणि समन्वय समितीची बैठक सुरु

टिळक भवन येथे काँग्रेसच्या प्रचार समिती आणि समन्वय समितीची बैठक सुरु झाली आहे. या बैठकीला प्रदेशाध्यक्ष मा. नाना पटोले, विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते मा. बाळासाहेब थोरात, प्रचार समितीचे अध्यक्ष मा. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, पब्लिसिटी कमिटीचे अध्यक्ष विधानपरिषदेतील काँग्रेस पक्षाचे गट नेते मा. सतेज पाटील, गोव्याचे प्रभारी मा. माणिकराव ठाकरे, प्रदेश कार्याध्यक्ष माजी मंत्री मा.नसीम खान, माजी मंत्री मा.अस्लम शेख, प्रदेश उपाध्यक्ष संघटन व प्रशासन मा. नाना गावंडे, मुख्य प्रवक्ते मा.अतुल लोंढे यांच्यासह काँग्रेस पक्षाचे नेते, समित्यांचे सदस्य उपस्थित आहेत.

Lok Sabha Election 2024: वसंत मोरे 5 एप्रिलला वंचित बहुजन आघाडीत अधिकृत प्रवेश करणार 

लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा असलेले आणि मनसेतून बाहेर पडलेले पुण्याचे नेते वसंत मोरे यांनी प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली होती. वसंत मोरे हे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आहेत असे जाहीर करण्यात आले आहे. येत्या 5 एप्रिलला ते वंचित बहुजन आघाडीत अधिकृत प्रवेश करतील असे वसंत मोरे यांनी सांगितले आहे.

Lok Sabha Election 2024: विकासासाठी आणि लोकांच्या सेवेसाठी भाजपमध्ये प्रवेश केला- बॉक्सर विजेंदर सिंग

भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर बॉक्सर विजेंदर सिंग यांनी सांगितले की, "मी आज देशाच्या विकासासाठी आणि लोकांच्या सेवेसाठी भाजपमध्ये प्रवेश केला आहे"

Lok Sabha Election 2024: पंतप्रधान मोदींना पर्याय कोण? काँग्रेस नेते शशी थरूर यांनी दिले उत्तर 

काँग्रेसचे उमेदवार शशी थरूर यांनी तिरुवनंतपुरम लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पर्याय कोण असू शकतो, असा प्रश्न काँग्रेस नेते शशी थरूर यांना विचारण्यात आला होता. थरूर यांनी 3 एप्रिल रोजी X वर पोस्ट करून या प्रश्नाचे उत्तर दिले. त्यांनी लिहिले की हा प्रश्न संसदीय व्यवस्थेत अप्रासंगिक आहे कारण लोक एखाद्या व्यक्तीला निवडून देत नाहीत तर पक्षाला निवडून देतात.

कंगनाचा 'डोअर टू डोअर' प्रचार

लोकसभा निवडणुकीसाठी मंडीतून भाजपकडून निवडणूक लढवत असलेल्या अभिनेत्री कंगना रणौत हिने डोअर डू डोअर प्रचार सुरू केला आहे.

यंदाची लोकसभा निवडणूक म्हणजे लोकशाही अन् संविधानासाठीचा लढा- राहुल गांधी 

वापरा आणि फेकून द्या ही भाजपची नीती - उद्धव ठाकरे

देश आता हुकुमशाहीच्या दिशेनं चालला आहे. वापरा आणि फेकून द्या ही भाजपची नीती आहे. उन्मेश पाटील यांनी खऱ्या अर्थानं बंड केलं आहे आमच्याकडं जे झालं ती गद्दारी होती. जळगाव हा मतदारसंघ आमच्याकडं आहे.

Rahul Gandhi : राहुल गांधींचा उमेदवारी अर्ज दाखल

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. ते आपल्या जुन्याच वायनाड मतदार संघातून निवडणूक लढवतील.

Jyoti Mete : राजकारणात सक्रिय, मात्र आज पक्षप्रवेश नाही - ज्योती मेटे

मी राजकारणात येण्याच्या दृष्टीने शासकीय सेवेतून निवृत्त झाले आहे. पवारांसोबत मी याबाबतच चर्चा केली. मात्र आज तरी माझा पक्षप्रवेश होणार नाही, असं स्पष्टीकरण ज्योती मेटे यांनी दिलं आहे. आपल्याला निर्णयाची प्रतिक्षा असल्याचं देखील त्या म्हणाल्या.

Rahul Gandhi : राहुल गांधी आज वायनाडमधून उमेदवारी अर्ज भरणार

काँग्रेस नेते राहुल गांधी आज लोकसभेचा उमेदवारी अर्ज भरणार आहेत. 2019 साली जिंकलेल्या वायनाड मतदारसंघातूनच ते निवडणुकीला उभारणार आहेत. शक्तीप्रदर्शन करण्यासाठी त्यांनी मोठी रॅली काढली असून, प्रियांका गांधी देखील या रॅलीमध्ये सहभागी झाल्या आहेत.

उन्मेष पाटलांचा थोड्याच वेळात ठाकरे गटात प्रवेश

भाजप खासदार थोड्याच वेळात ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत. कार्यकर्त्यांकडून त्यांच्या कार्यालयावरील भाजपचे स्टीकर काढण्यात आले.

पक्षांतराच्या मुद्द्यावर एकनाथ खडसेंचं स्पष्टीकरण

एकनाथ शिंदे भाजपमध्ये प्रवेश करतील, अशा चर्चा समोर आल्या होत्या. यावर एकनाथ खडसे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. ते म्हणाले की, "अजून असा कोणताही निर्णय घेतलेला नाही. पक्षांतराचा निर्णय कार्यकर्त्यांना विचारुन घेण्यात येईल. "

वसंत मोरे करणार वंचित बहुजन आघाडीत प्रवेश

वसंत मोरे ५ एप्रिलला वंचित बहुजन आघाडीत प्रवेश करतील. यावेळी प्रकाश आंबेडकर आणि सुजात आंबेडकर हे देखील उपस्थित राहणार आहेत.

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर दोन दिवस ब्लॉक

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर आज आणि उद्या ब्लॉक राहणार आहे.

दिलीप वळसेंच्या प्रकृतीसाठी महिलांचं साकडं

दिलीप वळसेंच्या प्रकृतीत सुधार व्हावा यासाठी घोडेगावच्या महिलांनी महादेवाच्या मंदिरात साकडं घातलं.

उन्मेष पाटील यांच्या जळगावात ठाकरे गटाचा विजय होईल- संजय राऊत

भाजपचे खासदार उन्मेष पाटील यांनी काल उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. त्यानंतर त्यांच्या ठाकरे गटातील प्रवेशाच्या चर्चा सुरु झाल्या. यंदा जळगावात ठाकरे गटाचा विजय होईल, असं संजय राऊतांकडून सांगण्यात आलं.

महायुतीच्या उमेदवाराची बदनामी करणं हेच मविआचं काम- उदय सांमत

महायुतीच्या उमेदवाराची बदनामी करणं हेच मविआचं काम आहे. विदर्भातील महायुतीचे सर्व उमेदवार विजयी होतील, यवतमाळ- वाशिममध्ये उमेदवार उद्या अर्ज भरणार आहेत, असं शिवसेना शिंदे गटाचे नेते उदय सांमत यांनी म्हटलं आहे.

कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यात पुन्हा अवकाळीचा इशारा

मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा, आणि कोकण विभागात तुरळक पावसाचा अंदाज (Rain) वर्तवण्यात आला आहे. पाच एप्रिलपासून हा पाऊस पडण्याची शक्यता (Weather Update) आहे. तर पाच ते आठ तारखेला मध्य महाराष्ट्रामध्ये, सहा ते आठ तारखेला कोकण गोवा आणि मराठवाड्यात, सात आणि आठ तारखेला विदर्भामध्ये हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.

Raigad Lok Sabha : सुनील तटकरे १८ ला उमेदवारी अर्ज भरणार

सावर्डे : लोकसभा निवडणुकीत रायगड लोकसभा मतदारसंघातून महायुतीकडून १८ एप्रिलला उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे उमेदवार सुनील तटकरे यांनी सांगितले.

Judge in Pakistan : पाकिस्तानात न्यायाधीशांच्या जीवाला धोका, 8 जणांना धमकीचं पत्र

पाकिस्तानमध्ये न्यायाधीशांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. मंगळवारी प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे की, इस्लामाबाद उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश आमिर फारूक यांच्यासह आठ न्यायाधीशांना धमकीचं पत्र आलं होतं. या पत्रांमध्ये काही संशयास्पद साहित्यही होतं. याआधीही पाकिस्तानच्या बलाढ्य गुप्तचर संस्थांकडून न्यायालयीन प्रकरणांमध्ये हस्तक्षेप केल्याचा आरोप झाला आहे.

Japan Earthquake : तैवानच्या पूर्वेकडील किनाऱ्यावर शक्तिशाली भूकंप, दक्षिण जपानमध्ये सुनामीचा इशारा

तैपेई (तैवान) : आज तैवानच्या पूर्वेकडील किनाऱ्यावर शक्तिशाली भूकंप झाला असून याची रिश्टर स्केलवर 7.4 तीव्रता आहे. या भूकंपामुळं दक्षिण जपानमध्ये सुनामीचा इशारा देण्यात आला आहे. भूकंपाचा केंद्रबिंदू पॅसिफिक महासागरात हुआलियन काउंटी हॉलपासून 25.0 किलोमीटर दक्षिण-पूर्वेस 15.5 किमी खोलीवर होता.

छत्रपती संभाजीनगरात कपड्याच्या दुकानाला भीषण आग, 7 जणांचा गुदमरून मृत्यू

छत्रपती संभाजीनगरात कपड्याच्या दुकानाला भीषण आग लागली असून यात दुकानाच्या वरच्या मजल्यावर राहणाऱ्या 7 जणांचा गुदमरून मृत्यू झाल्याचं कळतंय. मृतांमध्ये तीन महिला आणि दोन मुलांचाही समावेश आहे. ही घटना पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास घडली आहे.

Trinamool Congress : तृणमूल काँग्रेसच्या नेत्या महुआ मोईत्रांविरोधात गुन्हा दाखल

नवी दिल्ली : पैशाच्या बदल्यात संसदेत प्रश्न विचारल्याच्या आरोपावरून खासदारकी गमवाव्या लागलेल्या तृणमूल काँग्रेसच्या नेत्या महुआ मोईत्रा यांच्याविरोधात सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) हवाला प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. ‘सीबीआय’ने नोंदविलेल्या तक्रारीची दखल घेत ‘ईडी’ने हा गुन्हा दाखल केला आहे. पैशाच्या बदल्यात प्रश्न विचारल्याच्या प्रकरणात आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा ‘ईडी’ला संशय आहे.

Vanchit Bahujan Aghadi : वसंत मोरेंना वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारी जाहीर

Latest Marathi News Live Update : लोकसभेसाठी दुसऱ्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत संपत आली तरी महायुतीतील जागांचा घोळ मिटेना झाला आहे. शरद पवार गटाची दुसरी यादी आज जाहीर होण्याची शक्यता आहे. तसेच वंचित बहुजन आघाडीकडून लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची तिसरी यादी जाहीर करण्यात आली असून वसंत मोरेंना 'वंचित'कडून पुण्यातून उमेदवारी जाहीर केली आहे. शिवाय छत्तीसगडमधील विजापूर जिल्ह्यात नक्षलविरोधी मोहिमेदरम्यान सुरक्षा दलांबरोबर झालेल्या चकमकीत दहा नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला. आपचे खासदार संजय सिंह यांना सहा महिन्यांनंतर जामीन मंजूर झाला आहे. महाराष्ट्र सदन गैरव्यवहारप्रकरणी छगन भुजबळांसह कुटुंबीयांना कोर्टानं नोटीस बजावलीये. तसेच देशातील विविध राज्यांत वातावरणात बदल जाणवत असून काही ठिकाणी पाऊस पडत आहे. यासह देशासह राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर..

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT