court  
देश

Law News: आजारी पत्नीला काम करायला लावणे क्रूरतेसारखे; हायकोर्टाची टिप्पणी

Delhi High Court: पती-पत्नीचा घटस्फोट झाला आहे पण महिलेने आपल्या पतीवर गंभीर आरोप केले होते. कोर्टाने यावर सुनावणी घेताना महिलेला चुकीचं ठरवलं आहे.

कार्तिक पुजारी

नवी दिल्ली- आजारी पत्नीला घरकामासाठी बळजबरी करणे क्रूरता असल्याची टिप्पणी दिल्ली हायकोर्टाने केली आहे. हायकोर्टाचे न्यायमूर्ती सुरेश कैत आणि न्यायमूर्ती नीना बन्सल यांच्या खंडपीठाने एका प्रकरणाची सुनावणी घेतली. याचिकेवर सुनावणी करताना कोर्टाने पत्नीने पतीवर केलेले आरोप फेटाळून लावले आहेत.

पती-पत्नीचा घटस्फोट झाला आहे पण महिलेने आपल्या पतीवर गंभीर आरोप केले होते. कोर्टाने यावर सुनावणी घेताना महिलेला चुकीचं ठरवलं आहे. तसेच आपल्या जोडीदारावर त्याचे चारित्र्य हनन करणारे असे आरोप करणे म्हणजे उच्च दर्जाची क्रूरता आहे, असं कोर्टाने म्हटलं आहे.(Law News Making Sick Wife Work is Cruelty said delhi High Court)

आमच्या मतानुसार, जेव्हा एखादी पत्नी घरकाम करते, तेव्हा ती आपल्या कुटुंबाप्रति असणारे प्रेम आणि स्नेहभाव यासाठी असे करत असते. पत्नीची तब्येत ठीक नसेल त्यामुळे ती घरकाम करत नसेल तर तिला घरकामासाठी बळजबरी करणे नक्कीच क्रूरते सारखे असेल. पण, याप्रकरणामध्ये आम्हाला वेगळं चित्र दिसत आहे.

पतीने पत्नीवर केली नाही क्रूरता

सुनावणी करताना कोर्टाने म्हटलं की, पतीने आपल्या पत्नीवर क्रूरता केलेली नाही. महिलेला घरकाम करण्याची बळजबरी करण्यात आली नव्हती. या प्रकरणामध्ये महिलेने केलेले आरोप खोटे दिसून येत आहेत. महिलेकडून सादर करण्यात आलेल्या पुराव्यांमध्ये काहीही तथ्य नाही.

महिलेने आपल्या पतीवर खोटे आरोप केले आहेत. शिवाय पतीच्या कुटुंबियांविरोधात खोटे आरोप केले आहेत. आपल्या जोडीदाराच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवणे क्रूरतेच्या समान आहे. यामुळे थेटपणे हा विवाह संस्थेवर हल्ला आहे, असं कोर्टाने म्हटलं आहे.

पतीने कोर्टामध्ये पत्नी विरोधात याचिका दाखल केली होती. याचिकेमध्ये म्हणण्यात आलं होतं की, 'पत्नी सुरुवातीपासून त्याचा आणि सासू-सासऱ्यांचा आदर करत नव्हती. त्यामुळेच सुरुवातीपासूनच त्यांचे संबंध तणावपूर्ण होते. शिवाय ती घरचे काहीही काम करत नव्हती. आर्थिक मदतही ती करत नव्हती.' (Latest Marathi News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: राज ठाकरेंची मोठी खेळी! मावळमध्ये अजित पवारांची कोंडी, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा जाहीर

Sports Bulletin 5th November: भारत-पाकिस्तानचे खेळाडू एकाच संघातून खेळणार ते २०३६ च्या ऑलिम्पिक आयोजनासाठी भारताचे पत्र

Shah-Yogi Maharashtra Rally : शहा अन् योगी महाराष्ट्रासाठी जीवाचं रान करणार! कोल्हापुरात मुक्काम, दुसऱ्या दिवशी चार सभा

Patan Assembly Election : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे महाविकास आघाडीच्या नेत्यांना खुले आव्हान, ते म्हणाले...

Latest Marathi News Updates live : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अंबाबाईचे दर्शन घेऊन सभेला करणार सुरुवात

SCROLL FOR NEXT