JP Nadda Sakal
देश

JP Nadda : राज्यसभेचे सभागृह नेतेपद जे. पी. नड्डांकडे

सकाळ न्यूज नेटवर्क / वृत्तसंस्था

नवी दिल्ली - भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा यांची राज्यसभेच्या सभागृह नेतेपदी नियुक्ती झाली आहे. याआधीचे सभागृह नेते पियुष गोयल हे लोकसभेवर निवडून आले असल्याने आता ही जबाबदारी नड्डा यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.

राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या तिसऱ्या सत्ताकाळामध्ये नड्डा यांना आरोग्य तसेच खते व रसायन मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली आहे. भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाचा नड्डा यांचा कार्यकाळ ३० जूनला संपुष्टात येत आहे. तत्पूर्वीच त्यांची राज्यसभेच्या सभागृह नेतेपदी नेमणूक झाल्याने आता भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याचीही चर्चा रंगली आहे.

पक्षातील या सर्वोच्च पदाबाबत याआधीच महाराष्ट्रातील नेते व राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राजस्थानमधील नेते ओम माथूर, माजी केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यासह अन्य वेगवेगळ्या नावांबाबत अटकळबाजी सुरू आहे.

मात्र, झारखंड, महाराष्ट्र आणि जम्मू-काश्मीरच्या आगामी विधानसभा लक्षात घेता नड्डा यांना सहा महिन्यांची मुदतवाढ दिली जाऊ शकते आणि त्यांच्या जोडीला एक कार्यकारी अध्यक्ष दिला जाऊ शकतो, असाही कयास राजकीय वर्तुळात लावला जात आहे.

राजकीय प्रवास

मूळचे हिमाचल प्रदेशचे असलेल्या नड्डा यांची पार्श्वभूमी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची आहे. नड्डा यांची २०१९ मध्ये भाजपच्या कार्यकारी अध्यक्षपदी नेमणूक करण्यात आली होती. २०२० मध्ये नड्डा पूर्णवेळ पक्षाध्यक्ष झाले होते. त्यांचा कार्यकाळ जानेवारी २०२४ मध्ये संपुष्टात आला होता. मात्र, लोकसभा निवडणूक लक्षात घेऊन त्यांना सहा महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'हा जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार', IND vs BAN सामन्याविरोधात हिंदू संघटना आक्रमक, मालिका रद्द होणार?

Aaditya Thackeray : महायुती गद्दारांचा चेहरा घेऊन विधानसभा लढणार का?

Raj Thackeray: डॉ. अजित रानडेंना कुलगुरु पदावरुन हटवल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट; राज्यासह केंद्र सरकारला सुनावले खडेबोल

Sanjay Gaikwad: संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल; वडेट्टीवारांचा जोरदार हल्ला

दोन टप्प्यात निवडणुका कुठे होणार? सुरत आणि गुवाहाटीला का? शिंदेंच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरेंची खोचक टीका

SCROLL FOR NEXT