देशासाठी प्रेरणास्त्रोत असलेले भारताचे माजी धावपटू फ्लाइंग सिख मिल्खा सिंग यांचे निधन झाले आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांची पत्नी निर्मल कौर यांचे कोरोनामुळे निधन झाले होते. मिल्खा सिंग हे 91 वर्षांचे होते. नुकताच त्यांचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला होता. प्रकृती अस्वस्थामुळे त्यांना पुन्हा चंदीगड येथील PGI रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रुग्णालयातच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. (Milkha Singh Flying Sikh Passes Away Aged 91 After Long Fight With Covid19)
जवळपास एक महिना कोरोनाशी लढा देणाऱ्या मिल्खा सिंग यांची शुक्रवारी अचानक तब्येत बिघडली. एक दिवसांपूर्वीच त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा झाल्याचे PGI रुग्णालयाच्यावतीने सांगण्यात आले होते. शुक्रवारी त्यांना ताप आला. ऑक्सिजन लेव्हलही कमी झाली होती. रात्री उशीराने त्यांचे निधन झाल्याचे वृत्त आले.
मिल्खा सिंग यांनी चार वेळा आशियाई स्पर्धेत भारताला सुवर्ण पदक मिळवून दिले होते. 1960 मध्ये रोम ऑलिम्पिंकमध्ये 400 मीटर शर्यतीत ते चौथ्या स्थानावर राहिले. त्यांनी 45.6 सेकंदात शर्यत पूर्ण केली होती. यावेळी त्यांचे कास्य पदक थोडक्यात हुकले होते. 1956 मध्ये आशियाई स्पर्धेत 200 मीटर, 400 मीटर धावण्याच्या स्पर्धेत त्यांनी सुवर्ण पदक मिळवले होते. 400 मीटर आणि 4X400 रिले स्पर्धेत 1962 मध्ये त्यांनी सुवर्णपदकाची कमाई केली होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.