PM Modi Security Breach e sakal
देश

PM मोदींच्या सुरक्षेवरुन 16 माजी पोलीस महासंचालकांचं राष्ट्रपतींना पत्र

भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रांनी शेअर केलं पत्र

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : पंजाबमध्ये PM मोदींच्या (PM Modi) सुरक्षा व्यवस्थेत झालेल्या त्रुटींवरुन भाजपनं आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्यातच आता भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा (Sambit Patra) यांनी आपल्या ट्विटर हँडलवरुन एक पत्र शेअर केलं आहे. यामध्ये देशातील १६ माजी पोलीस महासंचालक आणि २७ आयपीएस अधिकाऱ्यांनी राष्ट्रपतींना पत्र लिहिल्याचं म्हटलं आहे. (Letter from 16 former DGP to President regarding PM Modi security breach)

संबित पात्रांनी हे पत्र ट्विट करताना म्हटलं की, "देशातील १६ माजी पोलीस महासंचालक आणि २७ आयपीएस अधिकाऱ्यांनी राष्ट्रपतींना एक पत्र लिहिलं आहे. यामध्ये त्यांनी पंतप्रधानांच्या सुरक्षेत झालेल्या निष्काळजीपणाला पंजाब सरकारला जबाबदार धरलं आहे. इतकंच नव्हे तर पंजाब सरकारचं हे षडयंत्र असल्याचा आरोपही केला आहे. त्यामुळं याप्रकरणी त्वरीत कार्यवाही करुन त्याची जबाबदारी निश्चित करण्याची मागणी केली आहे"

पत्रात या अधिकाऱ्यांनी म्हटलं की, "आम्ही माजी पोलीस अधिकाऱ्यांनी संपूर्ण देशभरात सेवा देण्यासाठी आमचं जीवन अर्पण केलं आहे. पण सीमेवरील राज्य असलेल्या पंजाबमध्ये पंतप्रधानांच्या सुरक्षेबाबत झालेल्या निष्काळजीपणा हा त्या राज्याच्या प्रशासकीय यंत्रणेसाठी लाजीरवाणी बाब आहे. या घटनेमुळं राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय परिणामांच्या शक्यता असल्यानं याबाबत योग्य कारवाई व्हावी यासाठी आम्ही तुमच्यापर्यंत आलो आहोत"

देशातील सध्याच्या प्रोटोकॉलप्रमाणं पंतप्रधानांना SPG सुरक्षा पुरवली जाते. याबाबत केंद्रीय गृहमंत्रालयाकडून राज्याच्या पोलिसांशी समन्यव साधला जातो. त्यामुळं राज्याचे पोलीस पंतप्रधानांच्या प्रवासाला आणि सुरक्षेला जबाबदार असते. याबाबत माध्यमातील वृत्तांनुसार, पंजाब सरकारचा या प्रकरणी गांभीर्यचं दिसून आलं नाही तसेच यामध्ये राज्यातील प्रशासकीय व्यवस्थाच कारणीभूत असल्याचं दिसून आलं. आम्ही पत्राद्वारे तुमच्याशी यासाठी संवाद साधू इच्छितो की, यापूर्वी देशाच्या इतिहासात असं कधीच घडलेलं नाही. तसेच या घटनेवर मुख्यमंत्र्यांनी विरोधाभास करणारी व्यक्तव्य केली आहेत, त्यामुळं याची गांभीर्यानं दखल घेतली जावी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: महायुतीची जोरदार मुसंडी; २०० हून अधिक जागांवर आघाडी

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: अंधेरी पूर्व विधानसभेत मुर्जी पटेल आघाडीवर

Karad South Assembly Election 2024 Results : कराड दक्षिणमध्ये पृथ्वीराज चव्हाणांना मोठा धक्का; अतुल भोसलेंनी घेतली 'इतक्या' मतांनी आघाडी

Sanjay Raut : हा जनतेचा कौल नसून, लावून घेतलेला निकाल; संजय राऊतांचा रोख कोणाकडे?

Amit Thackeray Maharashtra Assembly Election : अमित ठाकरे पहिल्यांदाच निवडणुकीत उतरले अन् तिरंगी लढतीच्या चक्रव्यूहात अडकले; ठाकरे ब्रँडचं काय होणार?

SCROLL FOR NEXT