Anandiben Patel sakal
देश

Anandiben Patel : माजी खासदार करवरिया यांना राज्यपालांकडून माफी

सकाळ वृत्तसेवा

प्रयागराज : समाजवादी पक्षाचे खासदार जवाहर यादव यांच्या हत्येप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेले भाजपचे माजी खासदार उदयभान करवरिया यांची सुटका करण्यात येणार आहे. उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल यांनी त्यांना माफी दिली आहे.

करवरिया यांची तुरुंगातील वर्तणूक चांगली असल्याचा अहवाल प्रयागराजचे वरिष्ठ पोलिस अधीक्षक आणि जिल्हा न्यायदंडाधिकारी यांनी दिल्यानंतर करवरिया यांच्या शिक्षेचा कालावधी पूर्ण व्हायच्या आधी राज्यपालांकडून त्यांना माफी देण्यात आली.

शुक्रवारी याबद्दलचा आदेश जारी करण्यात आला. घटनेतील १६१व्या कलमानुसार एखाद्या कैद्याला माफ करण्याचा राज्यपालांना अधिकार देण्यात आला आहे.दरम्यान, करवरिया यांना मुक्त करण्याबाबत अद्याप कोणताही आदेश मिळालेला नसून संबंधित आदेश मिळाल्यानंतर करवरिया यांना मुक्त करण्यात येईल, असे नैनी मध्यवर्ती कारागृहाचे वरिष्ठ कारागृह अधिक्षक यांनी सांगितले.

जवाहर यादव यांची १३ आॅगस्ट १९९६ रोजी प्रयागराज येथे गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी चार नोव्हेंबर २०१९ मध्ये उदयभान करवरिया यांना शिक्षा ठोठावण्यात आली होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींचे टपालात दीड लाख खाती; जिल्हाभरातील महिलांची पसंती

IND vs NZ, Test: जड्डू मानलं तुला! किवींच्या दोन फलंदाजांचे उडवले त्रिफळे, भारताचे दमदार पुनरागमन

Model Code Of Conduct: विधानसभेचा धुरळा... आचारसंहितेत काय करता येते अन् काय नाही? जाणून घ्या एका क्लिकवर

Ratan Tata: कोणाला मिळणार 7,900 कोटी रुपये? रतन टाटांच्या मृत्यूपत्राची अंमलबजावणी कोण करणार?

Rishabh Pant कसोटी मालिकेला मुकण्याची चिन्ह; तिसऱ्या दिवशी मैदानावर नाही आला, BCCI ने दिले अपडेट्स

SCROLL FOR NEXT