like delhis burari bodies of 5 members of the same family were found hanging from a noose in alirajpur mp  Esakal
देश

Delhi burari kand: तीच तारीख, तीच पद्धत... 6 वर्षांनंतर दिल्लीच्या बुरारीसारख्या मध्यप्रदेशात एकाच कुटुंबातील 5 जणांचे आढळले मृतदेह

अंकिता खाणे (Ankita Khane)

मध्य प्रदेशातील अलीराजपूर येथे एका घरात पाच जणांचे मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळल्याने खळबळ उडाली आहे. पती, पत्नी आणि तीन मुलांचे मृतदेह असल्याची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक राजेश व्यास घटनास्थळी पोहोचले. ही हत्या की सामूहिक आत्महत्या? एफएसएल आणि पोस्टमार्टम रिपोर्टनंतरच हे स्पष्ट होईल. पोलीस आता एफएसएल टीमच्या रिपोर्टची प्रतिक्षा करत आहेत. विशेष म्हणजे या घटनेने दिल्लीतील बुरारी येथे 1 जुलै 2018 रोजी घडलेल्या घटनेची आठवण करून दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अलीराजपूर जिल्ह्यातील सोंडवा पोलीस स्टेशन हद्दीतील रावडी गावात ही घटना घडली आहे. मृतांमध्ये घराचा प्रमुख राकेश, त्याची पत्नी ललिता आणि मुलगी लक्ष्मी, दोन मुले अक्षय आणि प्रकाश यांचा समावेश आहे. संपूर्ण कुटुंबाचा खून झाल्याची भीती नातेवाइकांनी व्यक्त केली आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

याआधी दिल्लीतील बुरारी येथील सामूहिक आत्महत्या प्रकरणाने संपूर्ण देश हादरला होता. आज 1 जुलै रोजी या घटनेला 6 वर्षे पूर्ण झाली आहेत. 30 जून 2018 रोजी रात्री उशिरा 12 ते 1 वाजेच्या सुमारास चुंडावत कुटुंबातील (ज्यांना भाटिया कुटुंब असेही म्हणतात) 11 जणांनी आत्महत्या केली.

दिल्लीतील त्यांच्या राहत्या घरी दहा जण लटकलेल्या अवस्थेत सापडले होते, तर कुटुंबातील सर्वात वयस्कर सदस्य, आजीचा गळा दाबून खून करण्यात आला होता. दुसऱ्या दिवशी म्हणजे 1 जुलै 2018 रोजी त्यांच्या मृत्यूनंतर पहाटे घरातून त्यांचे मृतदेह सापडले. बुरारी प्रकरणात, असा दावा करण्यात आला होता की, कुटुंबप्रमुख ललित भाटिया याने जादूटोण्याच्या प्रभावाखाली संपूर्ण कुटुंबाला सामूहिक आत्महत्या करण्यास भाग पाडले होते. 11 मृत्यू हे मनोविकारामुळे झालेले मानले गेले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Metro Line 3 ला मोदींकडून हिरवा कंदील; आधी मजुरांशी संवाद, नंतर विद्यार्थ्यांशी गप्पा, पाहा व्हिडिओ

Jammu Kashmir Exit Poll Result: हरियाणानंतर जम्मू-काश्मीरमध्येही भाजपला धक्का; काय सांगतो एक्झिट पोलचा अंदाज? वाचा सविस्तर...

मेट्रोच्या Aarey To BKC Aqua Line भुयारी सेवेला आजपासून सुरूवात, कसं असेल भाडं आणि वेळापत्रक, जाणून घ्या...

Haryana Exit Poll Result: 10 वर्षांचा दुष्काळ संपणार! हरियाणात काँग्रेसचं सरकार? पाहा एक्झिट पोलचा अंदाज...

Sports Bulletin 5th Oct 2024 : मुंबईने २७ वर्षांनी जिंकला इराणी चषक ते भारतीय महिला संघाचे वर्ल्ड कप स्पर्धेतील सेमी फायनलचे समीकरण, एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT