bjp party esakal
देश

BJP : भाजपकडून चाळीस जणांची यादी जाहीर

मोदी, शहांसह फडणवीस ‘स्टार प्रचारक’

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने महाराष्ट्रासाठीची स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह ४० नावांचा या यादीत समावेश आहे.

भाजपच्या उमेदवारांसाठी जे प्रमुख नेते प्रचाराच्या मैदानात उतरणार आहेत, त्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस व अजित पवार, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, रस्ते आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, केंद्रीय मंत्री नारायण राणे, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णुदेव साय, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव, राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा, रिपाई नेते व केंद्रीय मंत्री रामदास आठवले, केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर, पियुष गोयल, स्मृती ईराणी, ज्योतिरादित्य शिंदे, रावसाहेब दानवे पाटील यांचा समावेश आहे.

याशिवाय भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान, बिहारचे उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी, आशिष शेलार, पंकजा मुंडे, चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, राधाकृष्ण विखे पाटील, गिरीश महाजन, रवींद्र चव्हाण, के. अण्णामलाई, मनोज तिवारी, रवी किशन, अमर साबळे, डॉ. विजयकुमार गावित, अतुल सावे आणि धनंजय महाडीक यांचा स्टार प्रचारकांमध्ये समावेश करण्यात आलेला आहे. भाजपने आपल्या स्टार प्रचारकांची यादी केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त राजीव कुमार यांना पाठवली आहे.

अमरावतीतून नवनीत राणा

लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने अमरावती मतदारसंघातून नवनीत राणा यांना तिकीट देण्यात आले आहे. मावळत्या लोकसभेत राणा या अपक्ष खासदार आहेत. मात्र यावेळी त्या ‘कमळ’ चिन्हावर लढणार आहेत. भाजपने आज जाहीर केलेल्या सातव्या यादीत केवळ दोन उमेदवारांची नावे असून राणा यांच्याशिवाय कर्नाटकमधील चित्रदुर्ग मतदारसंघातून गोविंद करजोल यांना तिकीट देण्यात आले आहे. नवनीत राणा यांना भाजपने त्यांच्या चिन्हावर संधी देऊ नये, असे सांगत प्रहार जनशक्ती पक्षाचे आमदार बच्चू कडू तसेच शिवसेनेच्या आनंदराव अडसूळ यांनी तीव्र विरोध चालविला होता. राणा यांना तिकीट जाहीर झाल्याच्या पार्श्वभूमीवर आपण त्यांच्याविरोधात प्रचार करु, असे आ. कडू यांनी सांगितले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Assembly Elections: 'एम' फॅक्टरचा कौल MVAच्या बाजूने, सर्वात मोठ्या संघटनेच्या पाठिंब्यानं बळ वाढलं, महायुतीला टेन्शन

Mohammad Shami ने ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी ठोकली दावेदारी; गोलंदाजीनंतर फलंदाजीतही दाखवली चमक

Goa Tourism : जाऊ फुलपाखरांच्या गावा! गोव्यात बटरफ्लाय कंझर्व्हेटरीला नक्की भेट द्या, फि,वेळ आणि ठिकाण जाणून घ्या सर्वकाही

Vinod Tawde : अजित पवारांना सोबत घेतल्याचे भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी स्पष्टच सांगितले कारण...

Vinod Tawde: पुन्हा शरद पवार पावसात भिजले; भाजपचे तावडे म्हणाले, हा जिंकण्याचा 'भ्रम'...

SCROLL FOR NEXT