chirag paswan Esakal
देश

Bihar Politics: ढवळ्यापाशी बांधला पवळा; महाराष्ट्रानंतर बिहारमध्येही काका विरुद्ध पुतण्या

Bihar Politics LJP: बिहारमध्येही रंगणार काका विरुद्ध पुतण्या संघर्ष

सकाळ डिजिटल टीम

Chirag Paswan likely to go in NDA:सध्या देशाच्या राजकारणात काका विरुद्ध पुतण्या असं संघर्षचित्र उभं राहताना दिसतंय. महाराष्ट्रात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अजित पवारांनी आपले काका शरद पवार यांची साथ सोडून भाजपसोबत सत्तेत सामील झाल्याने राजकीय वादळं निर्माण झालं होतं. त्यानंतर या काका-पुतण्या संघर्षाचा ओघ बिहारमध्ये देखील पोहोचल्याची चिन्ह दिसत आहेत.

बिहारमध्ये रामविलास पासवान यांचा पक्ष लोक जनशक्ती पार्टीमध्ये काका पशुपतीनाथ पारस आणि चिराग पासवान यांच्यामध्ये देखील जागावाटपामुळे संघर्ष बघायला मिळू शकतो.

नॅशनल डेमोक्रेटिक अलायंस आणि लोक जनशक्ती पार्टीमध्ये पुन्हा मैत्री होण्याचे संकेत मिळता आहेत. त्याचबरोबर महाराष्ट्रापाठोपाठ बिहारमध्येही काका विरुद्ध पुतण्या असे समीकरण दिसायला लागलंय. बिहारमध्ये काका पशुपतीनाथ पारस आणि पुतण्या चिराग पासवान यांच्यात जागा वाटपावरुन खटका उडू शकतो.

राजकीय वर्तुळात चर्चा आहेत की चिराग पासवान यांच्याशी नव्या भागीदारीला सुरुवात करण्यासाठी सरकारकडून चिराग पासवान यांच्याशी संपर्क केला जातोय. तसेच, चिराग पासवान देखील दिल्लीला गेले होते, यावरुन ते गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेऊ शकतात अशी शक्यता वर्तवली जात होती.

गृहराज्य मंत्री नित्यानंद राय आणि चिराग यांच्यात बिहारची राजधानी असेलेल्या पटनामध्ये दीर्घकाळ चर्चा झाली. परंतू, अमित शाह यांच्या भेटीबद्दल लोक जनशक्ती पार्टी किंवा पासवान यांच्याकडून कोणतीही अधिकारिक घोषणा करण्यात आलेली नाही. भारतीय जनता पक्ष आणि लोक जनशक्ती पार्टीमध्ये पुन्हा युतीच्या मुद्द्यावरुन बऱ्याच काळापासून अटकळ सुरु आहे.

जागा वाटपावर होऊ शकते चर्चा

भारतीय जनता पक्षासमोर जागा वाटपासाठी पासवान यांच्याकडून काही अटी ठेवण्यात आल्या होत्या, असं सांगितल्या जातंय. २०१९मध्ये त्यांच्या पक्षाच्या लोकसभेवर ६, तर राज्यसभेवर एक जागा निवडून आली होती. सध्या आपल्या पक्षात पासवान एकमात्र खासदार आहेत. त्यांच्यामते ५ टक्के पासवान समर्थनाच्या आधारे त्यांना २०१९ इतक्याच जागा मिळाल्या पाहिजेत.

माध्यमांच्या अहवालानुसार, पासवान म्हणाले होते की, "भारतीय जनता पक्षासोबत सुरु असलेल्या चर्चा योग्य दिशेने जात आहेत. आज नित्यानंद राय यांच्यासोबत झालेली भेट देखील त्याच प्रक्रियेचा भाग आहे. माझ्या पक्षाने युती संबंधीचे सर्व अधिकार मला दिले आहेत. मी योग्य वेळ आल्यावर तुम्हाला सांगेल." पासवान देखील काही दिवसात एनडीएमध्ये सामील होऊ शकतात, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

काकांनी आधीच साथ सोडली

विशेष गोष्ट म्हणजे, २०२१मध्ये काका पशुपतीनाथ कुमार पारस यांच्या नेतृत्वाखाली पक्षाचे ५ खासदार आधीच पासवान यांची साथ सोडून निघून गेलेत. त्यांनी वेगळं होऊन एनडीएची वाट धरली. सध्या, पारस प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या सरकारमध्ये केंद्रीय मंत्री आहेत. एनडीएमध्ये परत आल्यावर चिराग पासवान यांना देखील केंद्रीय मंत्रिपद मिळू शकतं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rickshaw meter fraud Video: रिक्षाच्या मीटरमध्ये कसा होते फ्रॉड? मुंबई पोलिसांचा लाईव्ह डेमो, क्षणात ओळखा फसवेगिरी

India vs Oman: भारताची विजयी हॅट्ट्रिक; Asia Cupच्या उपांत्य फेरीत धडक

Pune Crime : रविवार पेठेतील ज्वेलर्सच्या दुकानातून पावणेदोन कोटींचे दागिने चोरी

Pune Crime : पाषाण, सदाशिव पेठेतील ज्येष्ठ नागरिकांची ७० लाखांची फसवणूक

Pune Helmet mandatory: पुणे विभागात हेल्मेटसक्ती! विभागीय आयुक्तांचे निर्देश; दुचाकीवर मागे बसणारालाही नियम पाळावा लागेल

SCROLL FOR NEXT