llockdown worker made wooden car dragged pregnant wife and daughter 800 km hyderabad 
देश

अन् त्याने 800 किलोमीटर ओढली दोरी...

वृत्तसंस्था

हैदराबादः जगभरात कोरोना व्हायरसने धुमाकूळ घालायला सुरवात केल्यानंतर देशात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. लॉकडाऊनमुळे अनेकजण विविध ठिकाणी अडकून पडले असून, रोजगार बंद झाल्यामुळे अनेकांचे हाल होताना दिसतात. काळीज पिळवटावून टाकणारे व्हिडिओ, छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

देशभरात लॉकडाऊनमुळे प्रवासाचे साधन बंद झाल्यामुले अनेकजण हजारो किलोमीटर चालत आपल्या घरी जाताना दिसतात. हजारो किलोमीटर चालल्यामुळे अनेकांना जीव गमवावा लागला आहे. उन्हामध्ये अनेकजण आपल्या लहान मुलांना घेऊन चालत असल्याची छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल होत असून, अनेकजण प्रतिक्रियांच्या माध्यमातून व्यक्त होत आहेत. हैदराबादमधील एक छायाचित्र व्हायरल होत आहे. संबंधित छायाचित्र पाहून नेटिझन्स बापाचे कौतुक करत आहेत.

हैदराबादमध्ये एक दांपत्य कामानिमित्त आले होते. रामू असे या मजुराचे नाव आहे. लॉकडाऊनमध्ये काम बंद झाल्यामुळे रामूने आपल्या दोन वर्षांच्या मुलीला आणि गर्भवती पत्नीला घेऊन गावी जाण्याचा निर्णय घेतला. पण, प्रवासाचे साधन नसल्यामुळे काय करावे समजत नव्हते. शिवाय, हाताला काम नसल्यामुळे उपासमार होण्याच शक्यता होती. यामुळे त्यांनी बालाघाट या गावी जाण्याचा निर्णय घेतला. रामूने लाकडी गाडी तयार करून, त्यावर गर्भवती पत्नी व मुलीला बसवले आणि दहा-वीस नव्हे तर तब्बल 800 किलोमीटर प्रवासाला सुरवात केली. प्रवासादरम्यान अनेकजण त्यांच्याकडे पाहात होते. काहींचे मन हळहळत होते तर काहीजण मोबाईलमध्ये छायाचित्र काढत होते. प्रवासादरम्यान काहीजण खायला देत होते. तब्बल 17 दिवसांचा प्रवास करत हे दांपत्य आपल्या गाव पोहचले.

लांजीचे एसडीओपी नितेश भार्गव यांनी सांगितले की, "बालाघाट सीमेजवळ हे दांपत्य दिसले. लाकडी गाडीवर गर्भवती पत्नी आणि मुलीला बसवून तो गाडी ओढत असल्याचे पाहिले. शिवाय, लहान मुलीच्या पायात चप्पलही नव्हती. मुलीला चप्पल आणि बिस्किटे दिली, त्यानंतर त्यांना एक खासगी गाडीमधून सीमेजवळील खेड्यात पाठविले.'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Assembly Election: 'मराठी मुंबई हवी असेल, तर घरी बसवा 'पटेल'; मराठी एकीकरण समितीच्या घोषणेनं वातावरण तापलं!

Champions Trophy 2025: पाकिस्तानने POK वरून भारताची 'खोड' काढली! ICC ने त्यांना 'जागा' दाखवली

Devendra Fadnavis: फडणवीसांनी पण घेतली भर पावसात सभा; म्हणाले, "आता ही सीट निवडूनच येणार"

Bhosari assembly elections 2024 : भोसरी विधानसभा शांतता, सलोखा राखण्यासाठी प्रयत्न करणार : अजित गव्हाणे

Fact Check: शिवसेना (उबाठा) मुस्लिम महिलांना 6000 रुपये देणार, व्हायरल पोस्टमधील तो दावा खोटा

SCROLL FOR NEXT