rahul gandhi Sakal
देश

इंधनाच्या दरांवरील 'लॉकडाऊन' हटवला; राहुल गांधींचा केंद्रावर हल्लाबोल

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : उत्तर प्रदेश, पंजाबसह पाच राज्यांमध्ये नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत दारूण पराभवाला सामोरे जावे लागलेल्या काँग्रेसने मंगळवारी पेट्रोल, डिझेल आणि स्वयंपाकाच्या गॅसच्या किमतीत वाढ केल्यानंतर केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. याबाबत राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी ट्वीट करत इंधनाच्या किमतींवर लागू करण्यात आलेला 'लॉकडाऊन' हटवण्यात आल्याचे म्हंटले आहे. (Rahul Gandhi Tweet After Fuel Prices Hike)

पेट्रोल, डिझेल आणि स्वयंपाकाच्या गॅसच्या किमतीत वाढ केल्यानंतर राहुल यांनी ट्वीट करत म्हटले आहे की, ''गॅस, डिझेल आणि पेट्रोलच्या किमतींवर लागू करण्यात आलेला 'लॉकडाऊन' उठवण्यात आला आहे. आता सरकार दर सातत्याने 'विकास' करणार असून, महागाईच्या साथीबद्दल पंतप्रधानांना विचारा, ते थाळी वाजवा असे सांगतील, असे खोचक विधान केले आहे.

महा महागाई, भाजपाने आणली : रणदीप सुरजेवाला

पक्षाचे मुख्य प्रवक्ते रणदीप सुरजेवाला (Randeep Surjewala) यांनी ट्वीट केले की, 'महा-महागाई, भाजपाने आणली! आता गॅस सिलेंडरच्या दरामध्ये 50 रुपयांची वाढ झाली आहे. गॅस सिलिंडर - दिल्ली आणि मुंबईत 949.50 रुपये, लखनऊमध्ये 987.50 रुपये, कोलकात्यात 976 रुपये आणि चेन्नईमध्ये 965.50 रुपये मोजावे लागणार आहे. या महागाईनंतर त्यांनी सरकारवर ताशेरे ओढत 'लोक म्हणत आहेत की, कोई लौटा दे वो सच्चे-सस्ते दिन, नहीं चाहिए (नरेंद्र) मोदी जी के अच्छे दिन.’

आणखी एक ट्वीटमध्ये सुरजेवाला म्हणाले की, "भाजपच्या विजयाने मोदीजींचे "महागडे दिवस" ​परत आले आहेत. भाजपला विजयाचा दिलासा मिळताच महागाईने जनतेचे जगणे हैराण केले आहे. उत्तर प्रदेशमध्ये अमित शहांनी निवडणुका जिंका आणि होळीच्या दिवशी मोफत गॅस सिलिंडर मिळवा, असे म्हटले होते. फुकट देत नाही, पण आता महागात देत असल्याची टीका सुरजेवाला यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

China: चीनमध्ये प्रदर्शित होणार पहिला भारतीय चित्रपट; तमिळच्या रहस्यपटाचा परदेशात डंका

Maharashtra Assembly Election 2024 Result : शिवसेना, राष्ट्रवादीपेक्षा काँग्रेसला अधिक मते; मात्र, त्या तुलनेत काँग्रेसने जागा कमी जिंकल्या

''बिहारमध्ये नितीश कुमारांना भाजपने शब्द दिला होता, पण महाराष्ट्रात तसं काही नाही'' केंद्रातील नेत्याचं विधान

WI vs BAN: वेस्ट इंडिजचा तब्बल २०१ धावांनी विजय अन् WTC पाँइंट्स टेबलमधील अखेर शेवटचं स्थान सोडलं

Chief Minister : आमचाच नेता ‘सीएम’ व्हायला हवा! एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्त्यांत रस्सीखेच

SCROLL FOR NEXT