Lok Sabha 2024 esakal
देश

Lok Sabha 2024: 'हनुमान' 24 मध्ये भाजपचे 25 चे स्वप्न भंग करणार? गेल्या निवडणुकीत ठरले होते किंगमेकर! काँग्रेसचा प्लॅन काय?

Lok Sabha 2024: लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यानंतर उमेदवारांच्या घोषणांचे सत्र सुरु आहे. काँग्रेसने राजस्थानमध्ये दोन उमेदवारांची घोषणा केली आहे.

Sandip Kapde

Lok Sabha 2024: लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यानंतर उमेदवारांच्या घोषणांचे सत्र सुरु आहे. काँग्रेसने राजस्थानमध्ये दोन उमेदवारांची घोषणा केली आहे. काँग्रेसने जयपूर ग्रामीण जागेसाठी अनिल चोप्रा आणि करौली धौलपूरसाठी भजनलाल जाटव यांना उमेदवारी दिली आहे. तर काँग्रेसने दोन जागा मित्रपक्षांसाठी सोडल्या आहेत.

काँग्रेसने नागौरची जागा हनुमान बेनिवाल यांच्या राष्ट्रीय लोकतांत्रिक पक्षाला आणि सीकर संसदीय जागा सीपीआय (एम) साठी सोडण्याची घोषणा केली आहे. नागौर सीटवर हनुमान बेनिवाल यांची चांगली पकड असल्याचे मानले जाते. त्यामुळेच यावेळी सर्वाधिक चर्चा नागौर सीट आणि आरएलपीचे अध्यक्ष हनुमान बेनीवाल यांची आहे. गेल्या दोन निवडणुकांमधला त्यांचा ट्रॅक रेकॉर्ड पाहता काँग्रेसने हा निर्णय घेतला आहे.

हनुमान बेनिवाल यांचा पक्ष आरएलपी 2019 च्या गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपसोबत NDA युतीचा भाग होता. त्यावेळी भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएने राजस्थानमधील सर्व 25 जागा जिंकल्या होत्या. तसेच 2014 च्या लोकसभा निवडणुकीत सर्व 25 जागा जिंकून भाजपने राजस्थानमध्ये झेंडा फडकवला होता. गेल्या दोन लोकसभा निवडणुकांचा ट्रॅक रेकॉर्ड पाहता भाजप राजस्थानमध्ये क्लीन स्वीप करत असल्याचे स्पष्ट होते. त्यामुळे काँग्रेसने हनुमान बेनीवाल यांच्यासोबत राजकीय डाव आखल्याचे समजते.

कारण राजस्थानमध्ये भाजपचा झेंडा फडकवण्यात हनुमान यांचा मोठा हात आहे. शेतकरी नेते म्हणून देखील त्यांची ओळख आहे.  2019 मध्ये बेनिवाल यांनी भाजपमध्ये प्रवेश केला तेव्हा नागौर व्यतिरिक्त जोधपूर, बाडमेर, राजसमंद, जालोर, पाली आणि अजमेर या जागांवर भाजपला फायदा झाला होता. हनुमान बेनिवाल यांनी भाजप उमेदवारांचा प्रचार केला होता.

आता हनुमान बेनिवाल यांनी काँग्रेसचा 'हात' धरला असून, त्याचा फायदा काँग्रेसला होणार आहे. जाट मतदारांना काँग्रेसकडे आणण्याचे कामही ते करणार आहेत. वेळोवेळी ते भाजपवर टीकाही करत आहेत. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर त्यांनी एनडीए सोडली. हनुमान बेनिवाल यांनी काँग्रेसला पाठिंबा दिल्यामुळे 2024 च्या निवडणुकीत भाजपला राजस्थानमध्ये क्लीन स्वीप करणे कठीण होणार आहे. याचा फायदा निवडणुकीत होईल, अशी आशाही काँग्रेसला आहे. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: “आजही तो कुटुंबासाठी काही बोलत नाही….”; सांगता सभेत अजित पवारांच्या आईचं पत्र दाखवलं वाचून

Sports Bulletin 18th November: गौतम गंभीरला हाय कोर्टाकडून दिलासा ते चेतेश्वर पुजारावर बॉर्डर-गावस्कर मालिकेत नवी जबाबदारी

Ajit Pawar: “....परत म्हणू नका दादा तुम्ही बोललाच नाहीत”; अजित पवारांचं सांगता सभेत भावनिक आवाहन

Champions Trophy पाकिस्तानमध्येच होणार, मागे हटणार नाही! PCB प्रमुखांचं रोखठोक मत; पाहा Video

Latest Maharashtra News Updates : सलमान खानच्या घरावर गोळीबार करणाऱ्या अनमोल बिश्नोईला अमेरिकेत अटक

SCROLL FOR NEXT