Lok Sabha Election 2024 7th Phase Voting Records 59 percent Provisonal Turnout marathi news  
देश

Lok Sabha 7th Phase Voting : देशात सातव्या टप्प्यात ५९ टक्के मतदान! पश्चिम बंगालात सर्वाधिक तर यूपीत सर्वात कमी मतदान

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली, ता. १ः लोकसभा निवडणुकीच्या सातव्या टप्प्यात ५९ टक्के मतदान झाले आहे. सर्वाधिक मतदान पश्चिम बंगालमध्ये ६९ टक्के तर सर्वाधिक कमी मतदान उत्तर प्रदेशात ५५.५७ टक्के मतदान झाले आहे.

देशातील ५७ लोकसभा मतदारसंघात आज सायंकाळी मतदान संपले असून आज मतदान झालेल्या प्रमुख मतदारसंघांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाराणशी मतदारसंघाचाही समावेश आहे. या मतदारसंघात आज केवळ ५६.३५ टक्के मतदान झाले. देशातील सहा राज्ये व एक केंद्रशासित प्रदेशात आज मतदान संपले. सायंकाळी सहा वाजेपर्यंत मिळालेल्या माहितीनुसार उत्तर प्रदेशात सर्वात कमी मतदानाची नोंद झाली आहे. या राज्यात केवळ ५५.५७ टक्के लोकांना मतदानाचा अधिकार बजावला. यानंतर हिमाचल प्रदेशातील चार लोकसभा मतदारसंघांमध्ये ६७.१४ टक्के, झारखंडमध्ये ६८.८२ टक्के, ओडीशामध्ये ६२.७६ टक्के, पंजाबमध्ये ५५.६५ टक्के तर केंद्रशासित प्रदेश असलेल्या चंदीगडमध्ये ६२.८० टक्के मतदानाची नोंद झाली.

पंजाबमधील सर्व १३ लोकसभा मतदारसंघात आज एकाच टप्प्यात मतदान पार पडले. कॉँग्रेस, आप, भाजप व शिरोमणी अकाली दल या चार पक्षांत खरी लढत आहे. कांही ठिकाणी तिरंगी लढतीही असल्याने चुरशीची लढाई अपेक्षित आहे. उत्तर प्रदेशातही १३ लोकसभा मतदारसंघासाठी मतदान झाले. आज झालेल्या राज्यांपैकी सर्वात कमी मतदान उत्तर प्रदेशातच झाले आहे. बिहारमध्ये या टप्प्यात आठ मतदारसंघात मतदान पार पडले. एक केंद्रीय मंत्री, तीन माजी केंद्रीय मंत्री, एक राज्यसभा खासदार मैदानात आहेत. तेथे आज सायंकाळी पाचपर्यंत ५०.५६ टक्के मतदान झाले होते. यात सर्वात अधिक मतदान पाटलीपुत्र मतदारसंघात तर सर्वात कमी मतदान पाटणासाहिब येथे झाले होते. या शेवटच्या टप्प्यात मुख्यमंत्री नितीशकुमार व माजी मुख्यमंत्री व राजदचे नेते लालूप्रसाद यादव यांनीही मतदान केले.

विरोधकांची इंडी आघाडी लोकांचा विश्वास प्राप्त करू शकली नाही. एनडीए कार्यकर्ता आमची मोठी ताकद आहे. या निवडणुकीत युवक व महिलांच्या शक्तीचा सहभाग उत्साहवर्धक राहिला. या निवडणुकीत मतांचा अधिकार बजावणारांचे आभार. मतदारांचा सहभाग ही लोकशाही प्रणालीची सर्वात मोठी ताकद असते.
- पंतप्रधान नरेंद्र मोदी (मॅक्सवर)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तो जगला, तरच देश जगेल

कृषिक्षेत्र आधुनिकतेच्या दिशेनं

जातिनिहाय जनगणनेची अपरिहार्यता

निवडणूक काश्मीरची; परीक्षा केंद्राची

संघ भाजपच्या मदतीला येणार...

SCROLL FOR NEXT