Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यानंतर सर्व पक्ष देशभरात उमेदवार जाहीर करत आहेत. मात्र देशात अशी एक हॉट सीट आहे जिथे भाजपला अजूनही उमेदवार देता आला नाही. या जागेसाठी उमेदवार निवडण्याचा निर्णय भारतीय जनता पक्षाने पंतप्रधान नरेंद्र मोदींवर सोडल्याचे बोलले जात आहे. त्याचबरोबर याबाबतचा निर्णय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी घ्यावा, अशी काँग्रेसचीही इच्छा आहे.
लोकसभा निवडणुकीत चंदीगड हे अतिशय चर्चेत राहिले आहे. विशेष म्हणजे आम आदमी पार्टी आणि काँग्रेसनेही चंदीगड जागेवर युतीची घोषणा केली आहे. नरेंद्र मोदी या जागेवर वैयक्तिक चर्चा करणा आहेत. या बैठकीत नरेंद्र मोदी, अमित शाह, जेपी नड्डा देखील उपस्थित राहतील. इंडियन एक्स्प्रेसने याबाबत वृत्त दिले आहे.
चंदीगड मतदारसंघ हॉट सीट होण्याचे कारण म्हणजे या ठिकाणी काँग्रेस-आप युती आहे. तर दुसर कारण म्हणजे महापौर निवडणूक आहे. महापौर निवडणुकीत कॅमेऱ्यात मत छेडछाडीचे प्रकरण समोर आले होते, त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने मतपत्रिकांची मोजणी केली.त्यानंतर निवडणुकीत भाजपचा उमेदवार महापौर म्हणून घोषित करण्यात आला. मते आप आणि काँग्रेस आघाडीचे उमेदवार कुलदीप कुमार यांच्या समर्थनार्थ असल्याचे तपासात समोर आले होते.
चंदीगड भाजपमध्ये दुफळी निर्माण झाली आहे. शहरातून स्थानिक व नवे उमेदवार उभे करण्याची मागणी होत असल्याचेही बोलले जात आहे. दरम्यान भाजपच्या नेत्यांना सांगण्यात आले आहे की, पंतप्रधान मोदी चंदीगडवर वैयक्तिकरित्या चर्चा करतील. मात्र याबाबत अधिकृतपणे काहीही सांगण्यात आलेले नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.