Latest Marathi News Live Update Esakal
देश

Latest Marathi News Update: दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

देशासह राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर.

सकाळ डिजिटल टीम

अजित पवारांच्या पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळावा, अशी मागणी

अरुणाचल प्रदेशमध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाला तीन जागांवर विजय मिळाला असून या विजयामुळे अजित पवार गटाचे आता देशातील तीन राज्यात आमदार असून यात महाराष्ट्र, नागालँड आणि आता अरुणाचल प्रदेश या राज्यांचा समावेश आहे. त्यामुळे पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळावा, अशी मागणी आयोगाकडे पक्षाकडून करण्यात येणार आहे.

मुलीची छेड काढल्याप्रकरणी दोन तरुणांना अटक

जळगावमध्ये मुलीची छेड काढल्याप्रकरणी गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. आता या प्रकरणी पोलिसांनी दोन तरुणांना ताब्यात घेतलं आहे.

बारामती शहरात वादळी वाऱ्यासह पावसाने लावली हजेरी

बारामती शहरात संध्याकाळी सहा वाजण्याच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पावसाने जोरदार हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली.

शिवाजी आढळराव पाटील चेअरमन राहिलेल्या पुणे म्हाडा कार्यालयात ACB ची धाड

शिवाजी आढळरावपाटील चेअरमन राहिलेल्या पुणे म्हाडा कार्यालयात ACB ची धाड पडली आहे. पुणे म्हाडा मधील प्रोजेक्ट मँनेजर याने तक्रारदार यांच्याकडे २ लाख ७० हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले आहे. लाचेच्या मागणीची पाच दिवस पडताळणी केल्यानंतर पुणे म्हाडाचे प्रोजेक्ट मँनेजरवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अभिजीत जिचकार असं लाचेची मागणी करुन स्विकारणा-या म्हाडा प्रोजेक्ट मँनेजरचे नाव आहे. जिचकार यांची खाजगी इसम म्हणुन पुणे म्हाडात नेमणूक आहे. म्हाडाचे मुख्याधिकारी यांच्यासाठी २ लाख २० हजार तर प्रोजेक्ट मँनेजर यांनी स्वतःसाठी ५० हजार रुपयांची मागणी केली त्यानंतर २ लाख ७० हजार रुपयांची लाच स्वीकारताना पंचासमोर अटक करण्यात आलीय.

अरविंद केजरीवाल तिहार जेलमध्ये दाखल; अंतरिम जामीन संपला

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना मंजुर केलेला अंतरिम जामीनाचा आज शेवटचा दिवस होता. आज त्यांनी आत्मसमर्पण केलं आहे. ते तिहार जेलमध्ये दाखल झाले आहेत.

उत्तर प्रदेशातील सोनभद्र येथे बसले भूकंपाचे धक्के

उत्तर प्रदेशातील सोनभद्र येथे आज दुपारी ३:४९ वाजता ३.९ रिश्टर स्केलचा भूकंपाची नोंद झाली. राष्ट्रीय भूकंपविज्ञान केंद्राकडून याबद्दलची माहिती देण्यात आली आहे.


अरविंद केजरीवाल दिल्लीतील पक्ष कार्यालयात पोहोचले; आज करणार सरेंडर

दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल दिल्लीतील पक्ष कार्यालयात पोहोचले असून 10 मे रोजी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी सर्वोच्च न्यायालयाने दिलेला अंतरिम जामीन संपल्यानंतर अरविंद केजरीवाल आज तिहार तुरुंगात आत्मसमर्पण करणार आहेत. त्यांना 2 जून रोजी तिहार तुरुंगात शरण येण्यास सांगण्यात आले होते.

Arunachal Pradesh: अरुणाचल प्रदेशमध्ये अजित पवार गटाच्या एका उमेदवाराचा दोन मतांनी पराभव

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने अरुणाचल प्रदेशमध्ये पाच जागा लढल्या होत्या. त्यातील तीन जागा जिंकण्यात यश आलं आहे, तर एका जागेवर दोन मतांनी पराभव झाला आहे.

Delhi Chief Minister Arvind Kejriwal's surrender: अरविंद केजरीवाल आज तिहार जेलमध्ये जाऊन आत्मसमर्पण करतील- आतिषी

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आज तिहार जेलमध्ये जाऊन आत्मसमर्पण करतील अशी माहिती आप नेत्या आतिषी यांनी दिली आहे.

Jammu & Kashmir: जम्मू-काश्मीरच्या गंजेरा टेकड्यांवर आग

जम्मू-काश्मीरच्या उधमपूर जिल्ह्यातील गंजेरा टेकड्यांवर आग लागल्याची घटना घडली आहे. तापमान वाढीमुळे वारंवार अशा घटना घडत आहेत.

Pune Accident: कल्याणीनगर अपघाताप्रकरणी आरोपीच्या आईला ५ जूनपर्यंत पोलीस कोठडी

कल्याणीनगर येथील हिट अँड रन प्रकरणामध्ये अल्पवयीन आरोपीची आई शिवानी अग्रवाल हिला ५ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. मुलानेच गाडी चालवल्याची आईने कबुली दिली आहे.

Post-cyclone situation: चक्रिवादळानंतरच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी PM मोदींची बैठक

चक्रिवादळानंतरच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी आज बैठक घेतली आहे.

Election Day: निकालाच्या दिवशी वरुणराजा बरसणार

निकालाच्या दिवशी म्हणजे ४ जूनला राज्यात वरुणराजा बरसणार आहे. या दिवशी राज्यात पाऊस पडेल अशी शक्यता आयएमडीने व्यक्त केली आहे.

rahul gandhi: हा एक्झिट पोल नाही, हा मोदींचा मीडिया पोल -  राहुल गांधी

काँग्रेस नेते राहुल गांधी म्हणतात, "हा एक्झिट पोल नाही, हा मोदींचा मीडिया पोल आहे. हा त्यांचा फँटसी पोल आहे."

भारत इंडिचा आघाडीच्या जागांच्या संख्येबद्दल विचारले असता ते म्हणतात, "तुम्ही सिद्धू मूस वालाचे 295? 295 गाणे ऐकले आहे का."

Arunachal Pradesh and Sikkim election results 2024 Live: अरुणाचलमध्ये भाजप 23 जागांवर विजयी, 23 वर आघाडीवर; सिक्कीममध्ये एसकेएमने जिंकल्या 11 जागा

Arunachal Pradesh and Sikkim election results 2024 Live: अरुणाचलमधील 60 पैकी 47 जागांवर भाजप आघाडीवर आहे, SKM सिक्कीममध्ये प्रचंड विजयाच्या मार्गावर आहे

अरुणाचल प्रदेशात भाजप सत्तेत परतल्यानंतर, भाजप कार्यकर्ते इटानगरमधील पक्ष कार्यालयाबाहेर फटाके फोडून आनंद साजरा करत आहेत. आतापर्यंत 60 पैकी 59 जागांसाठी निकाल आले आहेत, त्यापैकी सत्ताधारी भाजप 47 जागांवर आघाडीवर आहे

Arunachal Pradesh Election Result Live: अरुणाचलमध्ये भाजप एकतर्फी विजयाकडे, राष्ट्रवादी देखील आघाडीवर

आतापर्यंतच्या आलेल्या आकडेवारीनुसार भाजप 46 जागांवर पुढे आहे. एनपीपी सहा जागांवर, राष्ट्रवादी तीन जागांवर तर पीपीए दोन जागांवर आघाडीवर आहे.

Sikkim Election Result : सिक्कीम क्रांतीकारी मोर्चाचे पिंटसो लेपचा जोंगू विधानसभा मतदारसंघातून विजयी

सिक्कीम : सिक्कीम क्रांतीकारी मोर्चा (SKM) चे पिंटसो नामग्याल लेपचा जोंगू विधानसभा मतदारसंघातून विजयी झाले आहेत. लेपचा म्हणाले, "मला पाठिंबा देणाऱ्या आणि मला मोठ्या मताधिक्याने विजयी करणाऱ्या सर्व मतदारांचे मी आभार मानतो. ज्यांनी मला तिकीट दिले त्या पक्षाच्या अध्यक्षांचेही मी आभार मानतो..."

Arunachal Election Result : सुरवातीच्या ट्रेंडमध्ये 12 जागांवर विजय, भाजपने 32 जागांवर घेतली आघाडी

अरुणाचल प्रदेश विधानसभेसाठी सुरू असलेल्या मतमोजणीत भाजपने 12 जागा जिंकल्या आहेत, तर 32 जागांवर ट्रेंडमध्ये आघाडीवर आहे. एकंदरीत भाजप अजूनही 44 जागांवर आघाडीवर आहे.

Sikkim Election Result : सिक्कीमचे मुख्यमंत्री 'या' दोन्ही मतदारसंघातून आघाडीवर, एसकेएमने 29 जागांवर घेतली आघाडी

सिक्कीमचे मुख्यमंत्री आणि सिक्कीम क्रांतीकारी मोर्चा (SKM) प्रमुख प्रेमसिंग तमांग हे रेनॉक आणि सोरेंग-चकुंग मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवत आहेत, ते दोन्ही जागांवर आघाडीवर आहेत.

एसकेएमने अर्धा टप्पा ओलांडला : 29 जागांवर पक्ष आघाडीवर आहे. सिक्कीम विधानसभेत 32 पैकी 17 जागांवर बहुमताचा आकडा आहे.

Nagpur Weather : नागपुरात आज सकाळपासून ढगाळ वातावरण

नागपुरात आठवडाभरापासून उन्हाचा तडाख्यानंतर आज सकाळपासून ढगाळ वातावरण पहायला मिळत आहे. सध्या शहराचे तापमान 45 अंश सेल्सियसपर्यंत गेलेल्या तापमानामुळे नागपूरकरांची लाही लाही झाल्यानंतर आज ढगाळ वातावरण आहे.

Delhi Water Crisis दिल्लीत पाण्याची मोठी समस्या, टँकरद्वारे नागरिकांना पाणीपुरवठा

दिल्ली : जलसंकटामुळे राष्ट्रीय राजधानीतील अनेक भागात लोकांना समस्यांना सामोरे जावे लागत आहे. नागरिकांना टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. सध्या दिल्लीत पाण्याची मोठी समस्या निर्माण झाली आहे.

Sikkim Election Result : सत्ताधारी सिक्कीम क्रांतीकारी पक्षानं विधानसभेच्या 32 पैकी 31 जागांवर घेतली आघाडी

सिक्कीम विधानसभा निवडणुकीसाठी सुरू असलेल्या मतमोजणीत सर्व 32 जागांचा कल आता हाती आला आहे. यामध्ये सत्ताधारी सिक्कीम क्रांतीकारी पक्ष विधानसभेच्या 32 पैकी 31 जागांवर आघाडीवर आहे, तर विरोधी पक्ष एसडीएफ केवळ 1 जागेवर आघाडीवर आहे. इथे क्लिक करा

Valmiki Corporation Scam : वाल्मिकी महामंडळ घोटाळाप्रकरणी दोन अधिकाऱ्यांना एसआयटीकडून अटक

बंगळूर : वाल्मिकी विकास महामंडळातील घोटाळ्याप्रकरणी विशेष तपास पथकाने (एसआयटी) दोन अधिकाऱ्यांना अटक केल्याचे वृत्त समोर आले आहे. एसआयटी अधिकाऱ्यांनी वाल्मिकी विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक पद्मनाभ आणि महामंडळाचे लेखापाल परशुराम यांना अटक केली आहे.

Sikkim Assembly Election Results : मतमोजणीत विरोधी पक्ष एसडीएफला मोठा धक्का, ट्रेंडमध्ये पक्ष केवळ 1 जागेवर आघाडीवर

सिक्कीम विधानसभा निवडणुकीसाठी सुरू असलेल्या मतमोजणीत विरोधी पक्ष एसडीएफला मोठा धक्का बसला आहे. आतापर्यंतच्या ट्रेंडमध्ये पक्ष केवळ 1 जागेवर आघाडीवर आहे. फुटबॉलपटू बायचिंग भुतियाचा हमारा सिक्कीम पक्ष 2023 मध्ये पक्षात विलीन झाला होता, परंतु ट्रेंड पाहता पक्षाला त्याचा फारसा फायदा झाला नसल्याचे दिसते.

Arunachal and Sikkim Election Result : अरुणाचलमध्ये भाजपला बहुमत, सिक्कीममध्ये एसकेएमला मोठी आघाडी

अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीममध्ये मतमोजणी सुरू आहे. सुरुवातीच्या ट्रेंडमध्ये, सिक्कीममध्ये एसकेएमला बहुमत मिळाले आहे. एसकेएम 26 जागांवर आघाडीवर आहे. येथे बहुमतासाठी केवळ 17 जागांची आवश्यकता आहे. तर अरुणाचल प्रदेशात भाजपने मोठी आघाडी घेतली आहे. 35 जागांचे ट्रेंड समोर आले आहेत. त्यात भाजप ३० आणि एनपीपी २ वर आघाडीवर आहे. भाजपने येथे 10 जागा बिनविरोध जिंकल्या आहेत.

Goods Train : माधोपूरजवळ दोन मालगाड्यांची जोरदार टक्कर, दोन लोको पायलट जखमी

पंजाब : आज सकाळी सरहिंदमधील माधोपूरजवळ दोन मालगाड्यांची जोरदार टक्कर झाली असून यात दोन लोको पायलट जखमी झालेत. त्यांना फतेहगढ साहिब सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

Sikkim Assembly Election: सिक्कीममध्ये सत्ताधारी पक्ष 30 पैकी 29 जागांवर आघाडीवर

सिक्कीम विधानसभेच्या 30 जागांवर झालेल्या निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. येथे आतापर्यंत हाती आलेल्या कलानुसार सत्ताधारी सिक्कीम क्रांतीकारी मोर्चा 29 जागांवर आघाडीवर आहे.

NCP Arunachal Pradesh: अजित पवारांची राष्ट्रवादी अरुणाचलमध्ये 'इतक्या' जागांवर आघाडीवर

अरुणाचल प्रदेशात विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. यामध्ये 60 जागांपैकी 10 जागा भाजपने जिंकल्या असून, ते 20 जागांवर आघाडीवर आहेत. तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे 2 उमेदवार आघाडीवर आहेत.

Sikkim Assembly Result 2024: सिक्कीममध्ये सत्ताधारी क्रांतीकारी मोर्चाने पार केला बहुमताचा आकडा

सिक्कीम विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. सत्ताधारी सिक्कीम क्रांतीकारी मोर्चाने (SKM) आतापर्यंत अर्धा टप्पा ओलांडला असून ते 24 जागांवर आघाडीवर आहेत. सिक्कीम विधानसभेत 32 पैकी 17 जागांवर बहुमताचा आकडा आहे.

Arunachal Pradesh Assembly Result: भाजप बहुमताच्या दिशेने

अरुणाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. निवडणूक आयोगानुसार भाजप 6 जागांवर आघाडीवर आहे. तर नॅशनल पीपल्स पार्टी 2 जागांवर आघाडीवर आहे. विधानसभेच्या 60 पैकी 31 जागा जिंकणाऱ्या पक्षाला बहुमत मिळणार आहे. भाजपने यापूर्वीच 10 जागा बिनविरोध जिंकल्या आहेत.

Arunachal Pradesh And Sikkim: अरुणाचल प्रदेश, सिक्कीममध्ये सुरुवातीच्या ट्रेंडमध्ये भाजपा आघाडीवर

अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीम विधानसभा निवडणुकीची मतमोजणी आज (२ जून) होत आहे. अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीम या दोन्ही ठिकाणी भाजप आघाडीवर असल्याचे सुरुवातीचे ट्रेंड दाखवत आहेत.

Assembly Election Result: अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीम विधानसभा निवडणुकीसाठी मतमोजणी सुरू

अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीम विधानसभा निवडणुकीसाठी झालेल्या मतदानाची मतमोजणी सुरू झाली आहे. दरम्यान अरुणाचल प्रदेशमध्ये ६० सदस्यीय विधानसभेत भाजपने आधीच १० जागा बिनविरोध जिंकल्या आहेत.

Arunachal Pradesh: सिक्कीम, अरुणाचल प्रदेशमध्ये आज मतमोजणी

देशात लोकसभा निवडणुकीसाठी नुकतेच शेवटच्या टप्प्यातील मतदान पार पडले. आता या निवडणुकीचा निकाल 4 जून रोजी लागणार आहे. दरम्यान काल शेवटच्या टप्प्यातील मतदान पार पडल्यानंतर एक्झिट पोल समोर आले आहे. यामध्ये जवळपास सर्व एक्झिट पोलमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हॅट्रिक करण्यात यशस्वी होतील असे सांगितले जाद आहे.

दरम्यान लोकसभा निवडणुकीबरोबर सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेश या राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका पार पडल्या. आज या निवडणुकांचे निकाल जाहीर होणार आहेत.

यासह देशासह राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT