देश

Loksabha election 2024 : मायावतींच्या बसपाने घोषवाक्य बदललं; 'सर्वजन हिताय'च्या ऐवजी...

सकाळ वृत्तसेवा

लखनौः लोकसभेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मायावतींच्या बहुजन समाज पक्षाने (बसप) पक्षाने हक्काच्या मूळ मतदारांवर लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी पक्षाचे घोषवाक्य असलेल्या ‘सर्वजन हिताय, सर्वजन सुखाय’ मध्ये बदल करून ते ‘बहुजन हिताय, बहुजन सुखाय’ असे करण्यात आले आहे. ‘बसप’ ने २००७ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये सोशल इंजिनिअरिंगचा आधार घेत सत्ता मिळविली होती. यावेळी दलित मतपेढीप्रमाणेच उच्चवर्णीयांचाही पक्षाला पाठिंबा मिळाला होता.

‘बसप’ च्या बहुजन या संकल्पनेमध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्गीय (ओबीसी) आणि धार्मिक अल्पसंख्याक यांचा समावेश होतो. पक्षाच्या ताज्या प्रसिद्धीपत्रकावर देखील याच घोषवाक्याचा उल्लेख करण्यात आला आहे. ‘बसप’ला २००७ मध्ये ४०३ सदस्यसंख्या असलेल्या विधानसभेत २०६ जागांसह स्पष्ट बहुमत मिळाले होते.

त्यानंतर मात्र पक्षाचा जनाधार सातत्याने घटल्याचे दिसून येतो. त्यानंतर २०१२ च्या विधानसभा निवडणुकीत ‘बसप’चा दारुण पराभव झाला होता पण त्यावेळेसही ८० जागांसह ‘बसप’च प्रमुख विरोधी पक्ष बनला होता.

त्यानंतर मात्र पक्षाच्या मतांचा आलेख खालावलेला दिसून येतो. आता ‘बसप’च्या सदस्यांची संख्या १९ वर आली असून मतांची टक्केवारी देखील २० टक्क्यांवर येऊन ठेपली आहे. पक्षाला २०२२ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये जबर फटका बसला होता त्यामुळे आता पक्षाच्या नेतृत्वासमोर हक्काची मतपेढी टिकविण्याचे मोठे आव्हान असल्याचे अभ्यासकांचे म्हणणे आहे.

मागील लोकसभा निवडणूक ‘बसप’ने समाजवादी पक्षाशी युती करून लढविल्यानंतर समाजवादी पक्षाला १० दहा जागा मिळाल्या होत्या तसेच त्या पक्षाला मिळालेल्या मतांची संख्या १९ टक्क्यांवर पोचली होती. ‘बसप’ला २०१४ मध्ये एकही जागा मिळाली नव्हती पण त्या पक्षाच्या मतांचे प्रमाण मात्र तेवढेच कायम होते.

प. उत्तरप्रदेशातून फुंकणार रणशिंग

‘बसप’च्या सर्वेसर्वा मायावती या येत्या सोमवारपासून (ता.१४) पश्चिम उत्तरप्रदेशातून प्रचाराचे रणशिंग फुंकणार आहे. मुझफ्फरनगर, सहारणपूर, रामपूर, मुरादाबाद, बिजनौर, नगिना, गाझियाबाद, बागपत, अमरोहा, गौतमबुद्ध नगर, बुलंदशहर, मेरठ आणि हापूर येथे त्यांच्या सभांचे आयोजन करण्यात आले आहे. २०१९ मध्ये झालेल्या निवडणुकीत बिजनौर, नगिना, सहारणपूर आणि अमरोहातून ‘बसप’चे उमेदवार विजयी झाले होते. याच भागात दलित आणि अल्पसंख्याक यांचे प्राबल्य आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Parliament Session: संसदेचे हिवाळी अधिवेशन 25 नोव्हेंबरपासून, 'या' मुद्द्यांवरुन होणार घमासान

Olympic 2036 च्या आयोजनासाठी भारत सज्ज; IOC कडे पत्र पाठवून व्यक्त केली यजमानपदाची इच्छा

Nagpur AIIMS Recruitment: नागपूर एम्समध्ये विविध विभागांसाठी ‘ग्रुप-ए’ पदांची थेट भरती, पगार २ लाख रुपये; असा करा अर्ज

Gold Investment : महिला आणि संपत्ती: तरुणींमध्ये सोन्यात गुंतवणूक करण्याचा वाढता कल

Latest Marathi News Updates live : भाजप नवाब मलिक यांचा प्रचार करणार नाही

SCROLL FOR NEXT