Lok Sabha Election 2024 result Tejashwi Yadav predicts India alliance will form government PM Modi BJP  
देश

Lok Sabha Election : ‘इंडिया’ आघाडीचेच सरकार येणार! बड्या नेत्याने व्यक्त केला विश्‍वास

निवडणुकीत कमी जागा मिळणार असल्याच्या शक्यतेने‘ इंडिया’ आघाडी फुटणार असल्याची चर्चाही त्यांनी फेटाळून लावली.

सकाळ वृत्तसेवा

पाटणा, ता. १ (पीटीआय): केंद्रात ‘इंडिया’ आघाडीचेच सरकार स्थापन होईल, असा ठाम विश्‍वास बिहारचे माजी उपमुख्यमंत्री आणि राजदचे नेते तेजस्वी यादव यांनी व्यक्त केला. सत्तारुढ भाजप सत्तेतून हद्दपार होणार आहे, असा दावा त्यांनी केला.

बिहारमध्ये विरोधी पक्षाच्या आघाडीचे नेतृत्व करणारे तेजस्वी यादव यांनी मतदान केल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला. अतिपरिश्रमामुळे तेजस्वी यादव यांच्या मणक्याला मार लागला असल्याने तेजस्वी यादव यांना सध्या व्हिलचेअरवरून फिरावे लागत आहे. प्रचाराच्या रणधुमाळीतही त्यांनी व्हिलचेअरवरूनच प्रचार केला.

पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, चार जूनच्या निकालानंतर केंद्रात ‘इंडिया’ आघाडीचे सरकार येईल. टिव्हीवरच्या सर्वेक्षणात कॉंग्रेसचे प्रतिनिधी सहभागी होत नसल्याबद्दल विचारले असता यादव यांनी देखील एक्झिट पोलवरच्या आकडेवारीवर संशय व्यक्त केला. ते म्हणाले, एक्झिट पोल कोण करत आहेत, तुम्हीच मला सांगा आणि आम्ही कोणाला गांभीर्याने घ्यायला पाहिजे. वास्तविक आम्ही जनतेत काम करत आहोत आणि त्यांच्या कलाचा आम्हाला अनुभव आहे.

निवडणुकीत कमी जागा मिळणार असल्याच्या शक्यतेने‘ इंडिया’ आघाडी फुटणार असल्याची चर्चाही त्यांनी फेटाळून लावली. या बैठकीला मी उपस्थित राहणार आहे आणि त्यानंतरच या बैठकीचा अजेंडा काय होता, ते सांगू, असे त्यांनी स्पष्ट केले.कन्याकुमारी येथील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बहुचर्चित ध्यान शिबिराबाबत बोलताना त्यांनी ‘फोटो काढण्याची संधी’ म्हणून आम्ही त्याच्याकडे पाहतो, अशी प्रतिक्रिया तेजस्वी यादव यांनी दिली.

राज्यघटना वाचविण्यासाठी आणि बेरोजगारीची सत्ताधाऱ्यांना शिक्षा देण्यासाठी मतदान करणाऱ्यांना देखील पंतप्रधानांची भूमिका आवडलेली नाही, असेही यादव म्हणाले. यादरम्यान, मतदान होताच ते कन्या आणि पत्नीसह दिल्लीला रवाना झाले. तसेच आमदार तेज प्रताप यादव म्हणाले, बेरोजगारी, महागाई आणि गरिबी या मुद्दयावर मी मतदान केले आहे. मोदी यांची गॅरंटी फेल आहे. मोदी यंदा नापास झाले आहेत आणि ‘इंडिया’ आघाडीचे सरकार स्थापन होत आहे. पाटलीपूत्र मतदारसंघातून मीसा भारती विजयी होणार असल्याचा दावा त्यांनी केला. पाटलीपुत्र येथे लालूप्रसाद यादव यांची कन्या मिसा भारती आणि भाजपचे रामकृपाल यादव यांच्यात लढत होत आहे तर पाटणासाहिब येथे भाजपचे रविशंकर प्रसाद आणि कॉंग्रेसचे अंशुल अविजित यांच्यात मुकाबला आहे.

तेजस्वी आणि तेज प्रताप यांचे मतदान

लोकसभा मतदारसंघासाठी तेजस्वी यादव आणि राजदचे आमदार तेजप्रताप यादव यांनी मतदान केले. पाटलीपूत्र लोकसभा मतदारसंघासाठी पाटण्याच्या पशुवैद्यकीय महाविद्यालयातील बूथ क्रमांक १७० वरत्यांनी मतदान केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

परप्रांतीयांच्या मतांचा गठ्ठा कुणाच्या पारड्यात? मतदारांना गोंजारण्यासाठी घेतल्या बैठका, कोण ठरणार वरचढ?

Accident : भरधाव इको कारची ट्रकला धडक, 6 जणांचा जागीच मृत्यू, 4 जण गंभीर जखमी

Latest Marathi News Updates : वंचितचे उमेदवार अविनाश शिंदे यांच्या गाडीला अपघात

IND vs AUS: ऑस्ट्रेलियाशी दोन हात करण्याआधी भारतीय संघातील सराव सामना का महत्त्वाचा? कोचनेच केला खुलासा

आधी मनसे आता भाजप? महायुतीला मत द्या म्हटल्याने सायली संजीव ट्रोल; नेटकऱ्यांनी अभिनेत्रीला सुनावलं

SCROLL FOR NEXT