वर्ध्यातून भाजपाचे रामदस तडस आघाडीवर असण्याचा अंदाज आहे. तर शरद पवार गटाचे अमर काळे पिछाडीवर राहण्याचा अंदाज TV9 पोलस्ट्राटच्या एक्झिट पोलने वर्तवला आहे.
हिमाचल प्रदेशातील लोकसभेच्या चारही जागांवर भाजप पुन्हा विजयी होताना दिसत आहे. मात्र, एका जागेवरील स्थिती अनिश्चित आहे. हिमाचल प्रदेशमध्ये लोकसभेच्या सातव्या आणि शेवटच्या टप्प्यात आज १ जून रोजी मतदान झाले. येथे मंडी लोकसभा मतदारसंघात भाजपची अभिनेत्री कंगना रणौत आणि काँग्रेसचे विक्रमादित्य सिंह यांच्यात चुरशीची लढत पाहायला मिळत आहे. केंद्रीय मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांनी हमीरपूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली आहे. कांगडा आणि शिमला या जागांवरही काँग्रेस आणि भाजपमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळाली. 2014 आणि 2019 च्या लोकसभा निवडणुकीत हिमाचल प्रदेशातील चारही जागा भाजपने जिंकल्या होत्या.
झारखंडमधील 14 जागांपैकी भाजप आघाडी 12 जागा जिंकेल, तर काँग्रेसच्या नेतृत्वाखालील इंडिया आघाडीला दोन जागा मिळू शकतात.
तामिळनाडूतील 39 जागांपैकी भाजपला 10 तर द्रमुकला 29 जागा मिळतील असा अंदाज आहे. 2019 च्या निवडणुकीत द्रमुक आघाडीने 39 पैकी 38 जागा जिंकल्या. एनडीए आघाडीच्या खात्यात केवळ एक जागा आली.
आजच्या चाणक्य एक्झिट पोलनुसार कर्नाटकात भाजपला 24 जागा मिळू शकतात. तर, काँग्रेसला 4 जागा मिळण्याची शक्यता आहे. कर्नाटकमध्ये 26 एप्रिल आणि 7 मे रोजी दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यात मतदान झाले.
चाणक्य एक्झिट पोलनुसार, हरियाणात भारतीय जनता पक्षाचे मोठे नुकसान झाल्याचे एक्झिट पोलमध्ये दिसून आले आहे. हरियाणातील लोकसभेच्या 10 जागांपैकी भाजप आघाडीला 6 जागा मिळू शकतात. काँग्रेस 4 जागा जिंकू शकते. 2019 च्या निवडणुकीत हरियाणातील सर्व 10 जागांवर भाजपचे नियंत्रण होते.
चाणक्य एक्झिट पोलमध्ये दिल्लीतील सातपैकी 6 जागांवर भाजपचा विजय दिसून येत आहे. काँग्रेस आणि आम आदमी पार्टीच्या युतीला एक जागा मिळू शकते. गेल्या दोन निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाने दिल्लीतील सातही लोकसभेच्या जागा जिंकल्या आहेत, मात्र यावेळी त्यांना एका जागेचा फटका बसू शकतो.
आजच्या चाणक्य एक्झिट पोलनुसार, यावेळी भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी - NDA 18 व्या लोकसभेत पुन्हा सरकार स्थापन करणार आहे. उत्तराखंडमधील सर्व 5 जागा भाजपला मिळतील, असे सांगण्यात येत आहे. काँग्रेससह अन्य पक्षांना शून्य जागा दाखविण्यात आल्या आहेत. मात्र, यापैकी एका जागेचा निकाल वाढू शकतो किंवा कमी होऊ शकतो. मतांच्या टक्केवारीबद्दल बोलायचं झालं तर उत्तराखंडमध्ये भाजपला ५९ टक्के मते मिळाली आहेत. काँग्रेसला 32 टक्के मते मिळण्याची शक्यता आहे. गेल्या दोन निवडणुकांमध्ये येथे भाजपने बाजी मारली आहे.
देशभरात लोकसभा निवडणूक २०२४ पूर्ण झाल्यानंतर आज एक्झिट पोल समोर आले आहेत. बहुतांश एक्झिट पोलमध्ये 25 लोकसभेच्या जागा असलेल्या राजस्थानमध्ये भाजप पुन्हा एकदा आघाडीवर असल्याचे दिसत आहे, परंतु काही एक्झिट पोलनेही आश्चर्यकारक निकाल दिले आहेत. राजस्थानमध्ये काँग्रेस 10 वर्षांनंतर पुन्हा एकदा आपले खाते उघडताना दिसत आहे. एबीपी-सी व्होटरच्या एक्झिट पोलनुसार, राजस्थानमध्ये भाजप विजयी होताना दिसत आहे. एनडीएला 25 पैकी 21-23 जागा मिळतील, तर इंडिया आघाडीलाही 2-4 जागा मिळण्याची अपेक्षा आहे. टाईम्स नाऊ-ईटीजी सर्वेक्षणानुसार, राजस्थानमध्ये भाजपला 18 आणि काँग्रेसला 7 जागा मिळण्याची शक्यता आहे. त्याचवेळी, इंडिया टुडे-ॲक्सिस माय इंडियाच्या एक्झिट पोलने भाजपला 16-19 जागा दिल्या आहेत, तर काँग्रेसला 5-7 जागा दिल्या आहेत. त्याचबरोबर इतरांनाही १-२ जागा मिळण्याची शक्यता आहे. तथापि, हा केवळ अंदाज आहे. 4 जून रोजी निवडणूक निकालानंतर परिस्थिती पूर्णपणे स्पष्ट होईल.
स्कूल ऑफ पॉलिटिक्स एजन्सीच्या सर्वेक्षणात बिहारमध्ये एनडीएच्या बंपर विजयाचा दावा करण्यात आला आहे. या सर्वेक्षणात भाजप, जेडीयू आणि मित्रपक्षांना 38 जागा मिळतील, तर आरजेडी आणि काँग्रेसच्या महाआघाडीला केवळ दोन जागा मिळण्याचा अंदाज आहे. आज तक ॲक्सिस माय इंडियाच्या एक्झिट पोलनुसार, बिहारमध्ये एनडीएला 29-33 जागा मिळतील तर महाआघाडीला 7-11 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
सर्वप्रथम स्कूल ऑफ पॉलिटिक्सचा एक्झिट पोल समोर आला आहे. उत्तर प्रदेशमध्ये एनडीएला 62 तर सपा-काँग्रेस आघाडीला 18 जागा मिळताना दिसत आहेत. अमेठीमधून स्मृती इराणी पराभूत होत आहेत. तर राहुल गांधी रायबरेलीतून विजयी होत आहेत.
संभाजीनगरमध्ये संदीपान भुमरे विरुद्ध चंद्रकांत खैरे यांच्यात लढत झाली. तर, एमआयएमचे उमेदवार इम्तियाज जलील हे देखील आघाडीवर होते. मात्र, टीव्ही 9 -पोलस्ट्रॅटच्या एक्झिट पोलनुसार संभाजीनगरमध्ये ठाकरे गटाचे चंद्रकांत खैरे आघाडीवर आहेत. तर, शिंदे गटाचे संदीपान भुमरे आणि एमआयएमचे उमेदवार इम्तियाज जलील पिछाडीवर आहेत.
मराठवाड्यातील हायहोल्टेज लोकसभा मतदारसंघ असलेल्या बीडच्या लढतीकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. बीडमध्ये भाजप उमेदवार पंकजा मुंडे विरुद्ध मविआचे बजरंग सोनावणे अशी लढत झाली. टीव्ही 9 -पोलस्ट्रॅट च्या एक्झिट पोलनुसार पंकजा मुंडे आघाडीवर दिसत आहेत. तर, बजरंग सोनावणे पिछाडीवर आहेत.
नांदेडमध्ये भाजपा महायुतीचे उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर आघाडीवर आहेत. तर, काँग्रेसचे वसंत चव्हाण पिछाडीवर असल्याचे TV9 पोलस्ट्राटच्या एक्झिट पोलनुसार समोर आले आहे.
tv9 पोल-पीपल्स इनसाइटस एक्झिट पोलनुसार, सांगलीतून अपक्ष उमेदवार विशाल पाटील आघाडीवर आहेत. तर, भाजपचे संजय पाटील आणि शिवसेनेचे चंद्रहार पाटील पिछाडीवर आहेत.
एक्झिट पोलनुसार, ठाण्यातून ठाकरे गटाचे राजन विचारे आघाडीवर आहेत. तर शिंदे गटाचे नरेश म्हस्के पिछाडीवर असल्याचे पहायला मिळत आहे.
एक्झिट पोलचे आकडे समोर आले असून देशात ३७१ जागा एनडीएला मिळणार असल्याचा अंदाज जन की बातच्या एक्झिट पोलने व्यक्त केलाय. तर, इंडिया आघाडीला १२५ मिळतील असं म्हटलं आहे.
चंद्रपूरमध्ये मविआच्या उमेदवार काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर आघाडीवर आहेत. तर, भाजपाचे सुधीर मुनगंटीवर पिछाडीवर असल्याचे दिसत आहेत. इथे क्लिक करा
एक्झिट पोलनुसार, उत्तर मध्य मुंबईतून काँग्रेसच्या वर्षा गायकवाड आघाडीवर आहेत. भाजपाचे उज्वल निकम पिछाडीवर जाताना दिसत आहेत.
tv9 पोल-पीपल्स इनसाइटस एक्झिट पोलनुसार, मविआच्या उमेदवार प्रणिती शिंदे आघाडीवर आहेत. भाजपा महायुतीचे उमेदवार राम सातपुते पिछाडीवर आहेत. तर माढ्यातून महाविकास आघाडीचे शरद पवार गटाचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील आघाडीवर आहेत. महायुतीचे उमदेवार रणजीतसिंह नाईक निंबाळकर पिछाडीवर असल्याचे दिसत आहे.
एक्झिट पोलनुसार, सिंधुदुर्गात भाजपा महायुतीचे उमेदवार नारायण राणे आघाडीवर तर ठाकरे गट मविआचे उमेदवार विनायक राऊत पिछाडीवर आहेत.
एक्झिट पोलनुसार, बारामतीत शरद पवार गटाच्या मविआच्या उमेदवार सुप्रिया सुळे आघाडीवर आहेत. सुनेत्रा पवार पिछाडीवर असल्याचे पहायला मिळत आहेत. इथे क्लिक करा
एक्झिट पोलनुसार नागपूरमधून भाजपाचे नितीन गडकरी आघाडीवर आहेत. तर काँग्रेसचे विकास ठाकरे पिछाडीवर आहेत.
एक्झिट पोलनुसार, साताऱ्यातून शरद पवार गटाचे शशिकांत शिंदे आघाडीवर आहेत. तर इथे भाजप उमेदवार उदयनराजे भोसले हे पिछाडीवर दिसत आहेत.
एक्झिट पोलनुसार, महाराष्ट्रात अजितदादा गटाला एकही जागा मिळताना दिसत नाही. तर, शिंदे गटाला ४ जागा मिळण्याचा अंदाज आहे. शरद पवार यांच्या गटाला ६ जागा मिळण्याचा अंदाज आहे. शिवसेना १४ तर भाजपला १८ जागा मिळण्याचा अंदाज आहे. इथे क्लिक करा
स्कूल ऑफ पॉलिटिक्स अर्थात SOP ने केलेल्या सर्वेक्षणाने भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील NDA साठी मोठी बातमी आहे. एसओपीच्या सर्वेक्षणात एनडीए 2024 मध्ये दोन तृतीयांश बहुमताने सरकार स्थापन करणार आहे. SOP च्या एक्झिट पोलनुसार, राष्ट्रीय लोकशाही आघाडी म्हणजेच NDA 11 राज्यांमध्ये क्लीन स्वीप करत असल्याचे दिसते. यामध्ये छत्तीसगड, दिल्ली, गोवा, गुजरात, हिमाचल प्रदेश, कर्नाटक, मध्य प्रदेश, त्रिपुरा, दादर आणि नगर हवेली, अरुणाचल प्रदेश आणि उत्तराखंड या राज्यांचा समावेश आहे. या सर्व राज्यांतील एकूण जागांची संख्या 118 आहे.
महाराष्ट्रात महायुतीला २२ तर महाविकास आघाडीला २५ जागा मिळण्याचा अंदाज tv9 पोल-पीपल्स इनसाइटसने अंदाज वर्तवला आहे.
भाजपा - 18
शिवसेना - 4
राष्ट्रवादी - 00
काँग्रेस - 05
ठाकरे गट - 14
पवार गट - 6
कोल्हापुरात एक्झिट पोलनुसार, शाहू महाराज आघाडीवर आहेत, तर संजय मंडलिक पिछाडीवर असल्याचे चित्र आहे.
केरळ, तमिळनाडूत भाजपने चंचू प्रवेश केला आहे, तर या दोन राज्यात इंडिया आघाडी जोरदार मुसंडी मारताना दिसत आहे.
आंध्र प्रदेश - २१ ते २५ जागा एनडीएला मिळण्याची शक्यता
कर्नाटक - २३ ते २५ (एनडीए) इंडियाला 3 ते 4 जागा
केरळ- १ ते २ (एनडीए), १७ ते १९ (इंडिया)
तेलंगणा - ७ ते ९ (एनडीए) ७ ते ९ (इंडिया) समसमान
तमिळनाडू- ३९ जागा (इंडिया आघाडी)
आसाम - १० ते १२ (एनडीए), २ ते ४ (इंडिया)
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे उद्या मतमोजणीच्या रणनीतीवर चर्चा करण्यासाठी पक्षाच्या संसदीय उमेदवारांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधणार आहेत.
दिल्लीतील काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या घरी सुरू असलेली इंडिया अलायन्सची बैठक नुकतीच संपली आहे. बैठकीनंतर खरगे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, सर्व जागांचे मूल्यांकन केल्यानंतर असा अंदाज आहे की इंडिया अलायन्स किमान 295 जागा जिंकत आहे. यावेळी त्यांनी इंडिया आघाडी पूर्णपणे एकसंध असून त्यात फूट पाडण्याचा प्रयत्न करू नका, असे म्हटले आहे. इथे क्लिक करा
24 तासाच्या आत काँग्रेसने आपली भूमिका बदलली आहे. आज होणाऱ्या एक्झिट पोलच्या चर्चेत काँग्रेस सहभागी होणार असल्याचे समजते. आजच्या एक्झिट पोलच्या चर्चेत सहभागी होण्याचा INDIA आघाडीच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे. इथे क्लिक करा
लोकसभा निवडणुकीचा आज शेवटचा दिवस आहे. अशा परिस्थितीत काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी त्यांच्या निवासस्थानी महत्त्वाची बैठक बोलावली आहे. यामध्ये इंडिया आघाडीत समाविष्ट सर्वच पक्षांचे बडे नेते सहभागी होत आहेत. आतापर्यंत राहुल गांधी, अरविंद केजरीवाल, सीएम भगवंत मान, राघव चढ्ढा, अखिलेश यादव, तेजस्वी यादव, झारखंडचे मुख्यमंत्री चंपाई सोरेन, शरद पवार, फारुख अब्दुल्ला आदी बडे नेते या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी खरगे यांच्या निवासस्थानी पोहोचले आहेत. इथे क्लिक करा
लोकसभा निवडणुकीच्या 7 व्या टप्प्यात दुपारी 3 वाजेपर्यंत 49.68 टक्के मतदान झाले.
बिहार 42.95
चंदीगड 52.61%
हिमाचल प्रदेश 58.41%
झारखंड 60.14%
ओडिशा 49.77%
पंजाब 46.38%
उत्तर प्रदेश 46.83%
पश्चिम बंगाल 58.46%
आज मतदानाचा शेवटचा टप्पा संपताच संध्याकाळपर्यंत एक्झिट पोलचे निकाल जाहीर केले जातील. दरम्यान, बिहारचे माजी उपमुख्यमंत्री आणि आरजेडी नेते तेजस्वी यादव म्हणाले की, एक्झिट पोलचा दबाव आहे. कारण, ते फक्त एकतर्फी निकाल दाखवतात. इंडिया अलायन्स 300 हून अधिक जागा जिंकत आहे. बिहारमध्येही धक्कादायक निकाल लागतील.
राजकारणातील दिग्गज विश्लेषकांपैकी एक असलेल्या प्रशांत किशोर यांनी एक्झिट पोलपूर्वी निकालांचा अंदाज वर्तवला आहे. यावेळी भाजप 303 जागा जिंकेल, असे प्रशांत किशोर यांनी म्हटले आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीतही भाजपने तेवढ्याच जागा जिंकल्या होत्या. यावेळीही भाजप 303 जागा जिंकून सरकार स्थापन करणार असल्याचे प्रशांत यांनी म्हटले आहे. पूर्व आणि दक्षिणेकडील राज्यांमध्ये भाजपच्या मतांची टक्केवारी वाढण्याची शक्यता असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. आज मतदानाचा शेवटचा टप्पा संपताच संध्याकाळी 6.30 नंतर एक्झिट पोलचे निकाल जाहीर होतील.
Lok Sabha Election Exit Poll Results 2024 LIVE Updates : गेल्या महिन्याभरापासून सुरू असलेली लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी आता थांबण्याच्या मार्गावर आहे. सातव्या टप्प्यातील मतदान आज 1 जून रोजी होत आहे. मतदानाची वेळ संपल्यानंतर लगेचच विविध संस्था एक्झिट पोलच्या माध्यमातून या निवडणुकीचा संभाव्य निकाल व्यक्त करतील. कोण कोणत्या जागेवरून जिंकणार? याबाबतचे अंदाज या एक्झिट पोलमध्ये सांगितले जाणार आहेत.
मतदान झाल्यानंतर विविध संस्थांनी देशभरात सर्वेक्षण केलेले आहे. याच सर्वेक्षणाच्या आधारे हे एक्झिट पोलचे आकडे सांगितले जातात. आज साधारण संध्याकाळी 7 च्या आसपास हे एक्झिट पोल जाहीर होतील. विविध न्यूज चॅनल्स आणि रिसर्च एजन्सींकडून हे एक्झिट पोल जाहीर केले जातील. एक्झिट पोल हे केवळ निवडणूक निकालाचा अंदाज असतात.
या एक्झिट पोलच्या आकड्यांमधून जनमताचा कौल कोणाला मिळालाय? भाजपाप्रणित NDA की, काँग्रेसप्रणित INDIA ते समजणार आहे. त्यामुळं 4 जूनला मतमोजणीच्या दिवशी चित्र कसं असेल? त्याचा साधारण अंदाज या पोलवरुन आपल्याला समजणार आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर एक्झिट पोलचे आकडे काय सांगतायत? यावरही महाराष्ट्राचं राजकीय भवितव्य अवलंबून असणार आहे. मागच्या दोन टर्ममध्ये NDA आघाडीला महाराष्ट्रातून 40 पेक्षा जास्त जागा जिंकता आल्या होत्या. आता यावेळी काय स्थिती असणार आहे हे पोलवरुन स्पष्ट होणार आहे. आजचा केवळ हा अंदाज असणार आहे. मात्र, 4 जूनला याचं अधिक चित्र स्पष्ट होणार आहे. इथे क्लिक करा
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.