Lok Sabha election 2024  Esakal
देश

Lok Sabha Election 2024 : योगींच्या बालेकिल्यात यादवांची मुसंडी; उत्तरप्रदेश आणि महाराष्ट्रासारख्या मोठ्या राज्यात भाजप पिछाडीवर

Shraddha Kolekar

लोकसभा निवडणूक २०२४ : उत्तर प्रदेश जे सर्वात मोठे राज्य समजले जाते तसेच तिथे योगी आदित्यनाथ यांच्यामुळे जे भाजपचे वारे आहे असे समजले जाते परंतु तिथे आश्चर्य व्यक्त करावे त्याप्रमाणे इंडिया आघाडीवर आहे आणि भाजप सकाळपासूनच पिछाडीवर असल्याचे पहायला मिळाले. अग्निवीर भरतीच्या विरोधातील भाजप सरकारवरचा हा राग असल्याचेही बोलले जाते आहे. योगींच्या या बालेकिल्यात अखिलेश यादवांनी मुसंडी मारल्याचे पाहायला मिळत आहे.

पोस्टल मतदानापासून मतमोजणीला सुरुवात झाली असून सकाळी १० वाजेपर्यंत भाजप २८५ जागांवर आघाडीवर होता तर इंडिया आघाडी २२६ मतांवर आघाडीवर असल्याचे पाहायला मिळाले. दोनच दिवसांपूर्वी एक्झिट पोलचे आकडे आले होते त्यातील सर्वच एक्झिट पोलने भारतीय जनता पक्षाला २५० पेक्षा जास्त जागा मिळवेल असा अंदाज व्यक्त केला होता. तर काँग्रेसचे राहुल गांधी यांनी या एक्झिट पोललाच खोटे सांगत आम्ही २९५ जागा जिंकू असे सांगितले होते.

एकीकडे मोदींची लोकप्रियता आणि दुसरीकडे राहुल गांधी यांना वाटणारा प्रचंड आत्मविश्वास यामुळे यंदाची निवडणूक ही कुठल्याही एका पक्षाच्या बाजूने जाणारी नाही हे स्पष्ट आहे. त्यातच सकाळपासून येणारे आकडे हे अनेकांना आश्चर्याचा धक्का देणारे ठरत आहेत कारण एका क्षणाला नरेंद्र मोदी यांनी ज्यावरणासी मधून अर्ज भरला तिथे मोदी पाच हजार मतांनी पिछाडीवर असल्याचे पाहायला मिळाले.

सुरुवावतीलाच इंडिया आघाडी ही ज्या पद्धतीने वेग घेते आहे त्यावरून यंदा ४०० पारचा दावा खोटा ठरू शकतो अशी शक्यता निर्माण झाली आहे. पण भाजप तीनशेच्या आकडा तरी गाठू शकेल का? याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहे.

महाराष्ट्रात सुरुवातीपासूनच महाविकास आघाडीकडे नागरिकांचा कौल दिसून येतो आहे. मुख्य म्हणजे एके काळी महाराष्ट्राच्या राजकारणातील मुख्यमंत्रीपदाचे नाव असलेले अजित पवार यांच्या गटाला अद्याप कुठेही आघाडी मिळालेली नसल्याने हे सर्वच राजकारण १८० कोनात फिरणार का असा प्रश्न उपस्थित होतो आहे.

-----------

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Big Breaking: Navdeep Singh च्या रौप्यपदकाचे 'सुवर्ण'मध्ये रुपांतर झालं; भारतीय खेळाडूचं नशीब चमकलं, पण नेमकं असं काय घडलं?

Simran Sharma: अवघ्या १० मिनिटांत भारताला दोन पदकं; दृष्टिहीन सिमरनची २०० मीटर शर्यतीत सर्वोत्तम कामगिरीसह बाजी

Ravikant Tupkar Fasting : रविकांत तुपकरांचे अन्नत्याग आंदोलन स्थगित ; शेतकरी महिलेच्या हस्ते सोडले उपोषण

X Down: भारतासह जगभरात तासभर ट्विटर पडलं होतं बंद! नेटकऱ्यांचा संताप अन् पुन्हा झालं सुरु

Rashmika Mandana at Beed: रश्मिका मंदाना बीडमध्ये! धनंजय मुंडेंनी आयोजित केलेल्या गणेशोत्सवाच्या कार्यक्रमाला लावली हजेरी

SCROLL FOR NEXT