Lok Sabha Elections: देशाच्या लोकसंकख्येच्या तुलनेत आजही भारतात मतदानाची टक्केवारी कमी आहे. निवडणूक आयोग यासाठी अनेक जाहीराती, उपक्रम राबवते. मात्र तरी देखील परिस्थीती फारसी बदलत नाही. १९५२ मध्ये भारतात पहिल्या लोकसभेची निवडणूक झाली होती. आता २०२४ च्या लोकसभा निवडणुका जवळ आल्या आहेत.
या काळात अनेक लोकसभा आणि विधानसभा झाल्या ज्यात लोकांनी आपले नेते निवडून सरकार स्थापन केले. मात्र यावर काळात एक अशीही व्यक्ती आहे. ज्यांनी आतापर्यंत एकदाही मतदान केलं नाही. १९३२ मध्ये जन्मलेली ही व्यक्ती २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत पहिल्यांदाच मतदान करणार आहे.
या व्यक्तीने आतापर्यंत मतदान का केले नाही? याचे कारणही समोर आले आहे. झारखंडमधील साहिबगंज येथील हे प्रकरण आहे. येथे खलील अन्सारी हे राहतात. यांचा जन्म १९३२ मध्ये झाला. त्यांच्या जन्मापासून त्यांनी अनेक निवडणुका पाहीला. पण मतदान केलं नाही.
खलील अन्सारी यांनी सांगितले, आजपर्यंत त्यांचे नाव मतदार यादीत समाविष्ट झाले नव्हते, त्यामुळे त्यांना मतदान करता आले नाही. या प्रकरणाची दखल घेत झारखंडच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी शुक्रवारी खलील अन्सारी यांचे नाव मतदार यादीत त्वरित नोंदवावे, असे निर्देश जारी केले.
बडखोरी गावचे रहिवासी असलेले अन्सारी हे राजमहल लोकसभा मतदारसंघातील रहिवासी आहेत. येथे १ जून रोजी मतदान होणार आहे. झारखंडचे मुख्य निवडणूक अधिकारी के. रवी कुमार शुक्रवारी साहिबगंजमध्ये होते आणि त्यांनी राज्याची राजधानी रांचीपासून सुमारे ४५० किमी अंतरावर असलेल्या जिल्ह्यातील मुंद्रो ब्लॉकमधील मतदान केंद्रांची तपासणी केली. यादरम्यान त्यांनी अनेक गावांना भेटी देऊन ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग मतदारांची भेट घेतली. यावेळी त्यांना खलील अन्सारी भेटले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.