om birla
om birla eSakal
देश

Lok Sabha Speaker Election: 18 व्या लोकसभेच्या अध्यक्षपदाची निवडणूक ओम बिर्ला जिंकले; आवाजी मतदानानं झाली निवड

Amit Ujagare (अमित उजागरे)

Lok Sabha Speaker Election: लोकसभा अध्यक्षपदासाठी सभागृहात निवडणूक पार पडली. यामध्ये भाजपप्रणित सत्ताधारी एनडीएचे उमेदवार ओम बिर्ला हे निवडून आले आहेत. आवाजी मतदानानं यासाठी सभागृहात मतदान घेण्यात आलं. यामध्ये बिर्ला यांना १३ पक्षांनी पाठिंबा दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः बिर्ला यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला होता. त्यांच्याविरोधात इंडिया आघाडीचे उमेदवार के. सुरेश हे उमेदवार होते. (Lok Sabha Speaker Election Om Birla wins Lok Sabha Speaker election)

लोकसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत ओम बिर्ला हे जिंकल्याची घोषणा प्रोटेम स्पिकर भतृहरी महताब यांनी केली. त्यानंतर बिर्ला यांना पंतप्रधान मोदी, लोकसभेचे विरोधीपक्ष नेते राहुल गांधी आणि संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजूजी यांनी अध्यक्षपदाच्या खुर्चीपर्यंत नेलं आणि विराजमान होण्याची विनंती केली.

दरम्यान, ओम बिर्ला यांच्या नावाचा प्रस्ताव प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मांडला होता. त्याला हिंदुस्तान आवाम मोर्चाचे अध्यक्ष जितनराम मांझी यांनी अनुमोदन दिलं. बिर्ला यांच्या नावासाठी १३ पक्षांनी पाठिंबा दर्शवला. तर के सुरेश यांच्या नावाचा प्रस्ताव शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी मांडला. त्याला इंडिया आघाडीनं पाठिंबा दर्शवला. लोकसभेत एनडीएकडं बहुमत असल्यानं ओम बिर्ला हे अध्यक्षपदाची निवडणूक जिंकले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Worli Hit And Run Case: वरळीत 'हिट अँड रन'प्रकरणातील आरोपीने बारमध्ये पिलं इतक्या हजारांचं मद्य, बिलाचा फोटो व्हायरल

ICC Champions Trophy Ind vs Pak : चॅम्पियन्स ट्रॉफीबाबत मोठी अपडेट, भारत पाकिस्तानला देणार धक्का?

Maharashtra Live News Updates : आषाढीच्या पार्श्वभूमीवर विठ्ठलाचे व्हीआयपी दर्शन बंद

Dharmaveer 2 : "ज्याच्या घरातली स्त्री दुःखी, त्याची बरबादी नक्की!" ; 'धर्मवीर २' चा जबरदस्त टीझर प्रेक्षकांच्या भेटीस

Sunita Williams Space Mission: सुनीता विल्यम्सच्या परतीबद्दल नासाने दिली खुशखबर! फक्त एवढ्या दिवसात पृथ्वीवर परतणार अंतराळवीर

SCROLL FOR NEXT