नवी दिल्ली - लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडून राहुल गांधी यांची संरक्षण विषयक स्थायी समितीवर नियुक्ती करण्यात आली आहे. राहुल यांची खासदारकी रद्द झाल्यावर त्यांना या समितीवरून हटवलं होतं. आता पुन्हा नियुक्ती करण्यात आली आहे.
राहुल गांधी यांच्या व्यतिरिक्त अमर सिंग यांची देखील संरक्षणविषयक स्थायी समितीवर नियुक्ती करण्यात आली आहे. तर सुशील कुमार रिंकू यांची नियुक्ती शेती-पशुसंवर्धन आणि अन्न प्रक्रिया समितीवर करण्यात आली आहे. तर फैजल पी.पी. मोहम्मद यांची ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण समितीवर नियुक्ती करण्यात आली आहे.
राहुल गांधी यांची खासदारकी रद्द झाल्यानंत त्यांनी समितीवरून काढण्यात आले होते. आता राहुल गांधी यांची खासदारकी पुन्हा परत देण्यात आली आहे. आज लोकसभा अध्यक्षांनी नियुक्त्या जाहीर केल्या.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.