JP Nadda, Narendra Modi and Amit Shaha Sakal
देश

Loksabha election 2024 : भाजपची दहावी यादी जाहीर, उदयनराजेंना प्रतीक्षा कायम; 'या' ९ उमेदवारांचा समावेश

भाजपने 9 उमेदवारांची यादी जाहीर केली असून चंदीगड मतदारसंघातून किरण खेर यांचे तर अलाहाबाद मतदारसंघातातून पक्षाने रिटा बहुगुणा यांचे तिकीट कापले आहे. दरम्यान, उत्तर प्रदेशातील मैनपुरी मतदारसंघात डिंपल यादव यांच्याविरोधात जयवीर सिंह यांना पक्षाने तिकीट दिले आहे.

सकाळ डिजिटल टीम

Lok sabha election 2024 : लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. भाजपने तीन राज्यातील ९ उमेदवारांची दहावी यादी बुधवारी जाहीर केली. या यादीमध्येही साताऱ्यातून इच्छूक अससलेले उदयनराजे यांचं नाव नाही. त्यामुळे त्यांची प्रतीक्षा कायम राहिली आहे.

भाजपने 9 उमेदवारांची यादी जाहीर केली असून चंदीगड मतदारसंघातून किरण खेर यांचे तर अलाहाबाद मतदारसंघातातून पक्षाने रिटा बहुगुणा यांचे तिकीट कापले आहे. दरम्यान उत्तर प्रदेशातील मैनपुरी मतदारसंघात डिंपल यादव यांच्याविरोधात जयवीर सिंह यांना पक्षाने तिकीट दिले आहे.

चंदीगडमध्ये अभिनेत्री किरण खेर यांच्याऐवजी संजय टंडन यांना पक्षाने निवडणुकीच्या मैदानात उतरवले असून अलाहाबादमध्ये रिटा बहुगुणा यांच्याऐवजी नीरज त्रिपाठी यांना संधी देण्यात आली आहे. त्रिपाठी हे भाजपचे ज्येष्ठ नेते स्व. केसरीनाथ त्रिपाठी यांचे पुत्र आहेत. बलिया मतदारसंघात वीरेंद्रसिंह मस्त यांचे तिकीट कापत माजी पंतप्रधान स्व. चंद्रशेखर यांचे पुत्र नीरज शेखर यांना संधी देण्यात आली आहे. फूलपूर मध्ये केसरीदेवी पटेल यांना डावलत आ. प्रवीण पटेल यांच्यावर विश्वास टाकण्यात आला आहे.

उत्तर प्रदेशातील कौशांबी मतदारसंघात विनोद सोनकर, मछली शहर मध्ये बी. पी. सरोज तर गाजीपूर मतदारसंघात पारसनाथ राय यांना तिकीट देण्यात आले आहे. राय यांची लढत सपाचे विद्यमान खासदार अफजाल अन्सारी यांच्याशी होईल. प. बंगालमधील आसनसोल मतदारसंघात भाजपने एस. एस. अहलुवालिया यांना तिकीट दिले आहे. भाजपची ही दहावी यादी असून त्यात चंदीगडमधील जागेशिवाय उत्तर प्रदेशातील सात तर प. बंगालमधील एका जागेचा समावेश आहे.

आसनसोल मतदारसंघासाठी याआधी भाजपने प्रसिध्द भोजपुरी अभिनेता पवन सिंह यांचे नाव जाहीर केले होते. मात्र नाव जाहीर झाल्याच्या चोवीस तासात त्यांनी निवडणूक लढवणार नसल्याचे स्पष्ट केले होते. या पार्श्वभूमीवर पक्षाने माजी केंद्रीय मंत्री एस. एस. अहलुवालिया यांच्यावर विश्वास टाकला आहे. अहलुवालिया यांची लढत तृणमूल काँग्रेसचे उमेदवार आणि प्रसिध्द अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांच्याशी होईल. अहलुवालिया यांनी गतवेळी वर्धमान-दुर्गापूर मतदारसंघातून विजय मिळवला होता. यावेळी प्रदेश भाजपचे अध्यक्ष दिलीप घोष वर्धमान-दुर्गापूरमध्ये लढत देत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: महायुतीची जोरदार मुसंडी; २०० हून अधिक जागांवर आघाडी

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: अंधेरी पूर्व विधानसभेत मुर्जी पटेल आघाडीवर

Karad South Assembly Election 2024 Results : कराड दक्षिणमध्ये पृथ्वीराज चव्हाणांना मोठा धक्का; अतुल भोसलेंनी घेतली 'इतक्या' मतांनी आघाडी

Sanjay Raut : हा जनतेचा कौल नसून, लावून घेतलेला निकाल; संजय राऊतांचा रोख कोणाकडे?

Amit Thackeray Maharashtra Assembly Election : अमित ठाकरे पहिल्यांदाच निवडणुकीत उतरले अन् तिरंगी लढतीच्या चक्रव्यूहात अडकले; ठाकरे ब्रँडचं काय होणार?

SCROLL FOR NEXT