Loksabha Election 2024 BJP  esakal
देश

Loksabha Election : मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी 'अब की बार 400 पार' घोषणेसह भाजप उतरणार निवडणूक रिंगणात!

लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Elections) पार्श्वभूमीवर भाजपने (BJP) आपले घोषणावाक्य निश्चित केले आहे.

सकाळ डिजिटल टीम

लोकसभा निवडणुकीत राम मंदिराचा मुद्दाही व्यापक प्रमाणात हाती घेण्याचा निर्णय भाजपने केला आहे.

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Elections) पार्श्वभूमीवर भाजपने (BJP) आपले घोषणावाक्य निश्चित केले असून ‘तिसरी बार मोदी सरकार, अब की बार ४०० पार’ या घोषणेसह भाजप निवडणुकीला सामोरे जाणार आहे. लोकसभेच्या निवडणुकीला चार महिन्यांचा कालावधी बाकी राहिला असून सर्वच पक्ष या निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत.

भाजपच्या बैठकीत लोकसभा निवडणुकीतील प्रचारासंदर्भात नियोजन करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. विधानसभा स्तरावर नवीन मतदारांसाठी संमेलन तसेच महिलांसाठी संमेलन घेण्याचे पक्षाने ठरविले आहे. पहिल्यांदा मतदान करणारे मतदार, युवक आणि महिला मतदारांवर विशेष लक्ष केंद्रित केले जाणार आहे.

प्रदेश, लोकसभा आणि विधानसभा स्तरावर संयोजक आणि सह संयोजकांच्या नावांची निश्चिती या बैठकीत केल्याचे समजते. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह तसेच भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या देशव्यापी दौऱ्यांचे आयोजन करण्यात आले आहे.

दर्शनासाठी मदत करणार

लोकसभा निवडणुकीत राम मंदिराचा मुद्दाही व्यापक प्रमाणात हाती घेण्याचा निर्णय भाजपने केला आहे. मंदिरातील मूर्तीची प्राण प्रतिष्ठापना येत्या २२ तारखेला होणार आहे. त्यावेळी देशात दिवाळीसारखे वातावरण तयार करण्यासाठी झटण्याचे आदेश पक्षाध्यक्ष नड्डा यांनी कार्यकर्त्यांना दिले. अयोध्येतील राम मंदिराचे दर्शन घडवून आणण्यासाठी भाविकांना कार्यकर्त्यांनी मदत करावी, असे निर्देश देण्यात आले आहेत.

तर मंदिर उद्घाटनानंतर २५ जानेवारी ते २५ मार्च या कालावधीत बूथ स्तरावर अभियान हाती घेतले जाणार आहे. तसेच देशभरातील लोकांना राम मंदिराचे दर्शन घडवून आणण्याची मोहीम हाती घेतली जाईल. याची सुरुवात जानेवारीच्या अखेरीस होईल. अयोध्येला कसे जायचे इथपासून ते तिकीट काढून देण्यापर्यंत लोकांना मदत केली जाणार आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी अतिरिक्त रेल्वेगाड्या सोडण्यात येणार आहेत.

अशी रणनीती

  • आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपकडून घोषवाक्य जाहीर

  • राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या अध्यक्षतेखालील भाजपच्या बैठकीत दीडशे पदाधिकारी सहभागी

  • निवडणुकीसाठीच्या रणनीतीवर दोन तासांपेक्षा अधिक काळ चर्चा

  • राज्य, लोकसभा, विधानसभा पातळीवर संयोजक आणि सह संयोजकांची नियुक्ती

  • पंतप्रधान मोदी, अमित शहा, जे.पी.नड्डा, राजनाथसिंह दौरे सुरू करणार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

''बिहारमध्ये नितीश कुमारांना भाजपने शब्द दिला होता, पण महाराष्ट्रात तसं काही नाही'' केंद्रातील नेत्याचं विधान

WI vs BAN: वेस्ट इंडिजचा तब्बल २०१ धावांनी विजय अन् WTC पाँइंट्स टेबलमधील अखेर शेवटचं स्थान सोडलं

Chief Minister : आमचाच नेता ‘सीएम’ व्हायला हवा! एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्त्यांत रस्सीखेच

Ease of Doing Business: जागतिक बँकेच्या 'ईझ ऑफ डुईंग बिझनेस' अहवालात भारताची मोठी झेप; जाणून घ्या काय आहेत कारण?

Kalyan Fire News: कल्याणमध्ये गगनचुंबी इमारतीला भीषण आग; घटनास्थळी अग्निशमन दलाच्या ९ गाड्या दाखल

SCROLL FOR NEXT