Loksabha Election 2024 esakal
देश

Loksabha Election 2024 : प्रचारसभांमध्ये ‘दोन शहजादे’, ‘मंगळसूत्र’, ‘मच्छी व मटण’, ‘भटकती आत्मा’चा बोलबाला

लोकसभा निवडणुकीसाठीच्या प्रचारात नेत्यांनी एकमेकांविरुद्ध तुफान टोलेबाजी केली.

पीटीआय

नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीसाठीच्या प्रचारात नेत्यांनी एकमेकांविरुद्ध तुफान टोलेबाजी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, नेते राहुल गांधी यांनी सभांचा धडाका लावला. दिवसाकाठी दोन ते तीन सभा घेणाऱ्या नेत्यांनी आपल्या विरोधकांवर शेलक्या शब्दांत टीका केली. या शेलक्या शब्दांची चर्चा झाली. राजकीय वातावरण तापविणाऱ्या शब्दांचा थोडक्यात आढावा -

विषगुरू

मोदी हे प्रचारसभांमध्ये ज्या भाषेत बोलतात ती भाषा एखाद्या विश्‍वगुरूची नाही, तर ‘विषगुरू’ची आहे, अशी टीका काँग्रेसचे जयराम रमेश यांनी केली.

मंडी में भाव

हिमाचल प्रदेशमधील मंडी मतदारसंघातून भाजपने अभिनेत्री कंगना राणावत यांना उमेदवारी दिल्यावर काँग्रेसच्या प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत यांनी सोशल मीडियावर कंगना यांचे एक छायाचित्र प्रसिद्ध करत ‘मंडी मे क्या भाव चल रहा है’ असा टोमणा मारला होता. यावरून श्रीनेत यांच्यावर प्रचंड टीका झाली होती आणि त्यांना आपले विधान मागेही घ्यावे लागले होते.

स्वयंघोषित भगवान

‘मला परमात्म्यानेच पाठविले आहे, असे मला वाटत आहे,’ या मोदींच्या विधानावर टीका करताना रमेश यांनी मोदी यांना ‘स्वयंघोषित भगवान’ म्हणून टोमणा मारला होता.

अनुभवी चोर

दिल्लीतील मतदानापूर्वी दिलेल्या एका मुलाखतीमध्ये पंतप्रधान मोदी यांनी मद्यधोरण गैरव्यवहारप्रकरणी आरोप असलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना उद्देशून ‘अनुभवी चोर’ या शब्दांचा वापर केला.

मुजरा

मुस्लिम नागरिकांची मते मिळविण्यासाठी ‘इंडिया’ आघाडीचे नेते ‘मुजरा’ करत असल्याची टीका मोदींनी केली होती.

मच्छी आणि मटण

श्रावण सुरू असतानाच राहुल गांधी आणि तेजस्वी यादव हे मासे खात असतानाचा व्हिडिओ प्रसिद्ध झाल्यानंतर मोदींनी विरोधकांची मनोवृत्ती मुघलांची असल्याची टीका केली. भावना दुखावण्यासाठीच ‘मच्छी व मटण’ खात असल्याचे मोदी म्हणाले.

मंगळसूत्र

हिंदू महिलांचे मंगळसूत्र हिसकावून घेत घुसखोरांना त्याचे वाटप करण्याचे आश्‍वासन काँग्रेसने त्यांच्या जाहीरनाम्यात दिले आहे, असा आरोप मोदींनी केला होता. या मुद्द्यावरून बरेच आरोप-प्रत्यारोप झाले.

दो शहजादे

उत्तर प्रदेशमधील एका सभेत बोलताना पंतप्रधान मोदी यांनी,‘लांगुलचालनाचे राजकारण करण्यासाठी दोन शहजादे एकत्र आले आहेत,’ अशी टीका केली होती. त्यांचा रोख राहुल गांधी आणि ‘सप’चे प्रमुख अखिलेश यादव यांच्याकडे होता.

‘कळसूत्री राजा’

काँग्रेसला अदानी आणि अंबानींकडून टेम्पो भरून पैसे मिळाल्याचा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला होता. त्यावर टीका करताना काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी मोदी हे ‘टेम्पो अब्जाधीशां’चा ‘कळसूत्री राजा’ असा टोला मारला होता.

गाजलेले इतर शब्द

  • झुठों का सरदार : मल्लिकार्जुन खर्गे यांनी मोदींना उद्देशून

  • अमूल बेबी : हिमंता बिस्व सरमा यांनी प्रियांका आणि राहुल गांधींना उद्देशून

  • कागदी मुख्यमंत्री : मोदी यांनी भगवंत मान यांना उद्देशून

  • बडा पप्पू, छोटा पप्पू : कंगना राणावत यांनी राहुल गांधी व विक्रमादित्य सिंह (उमेदवार) यांना उद्देशून

  • घोटाळेबाजांचे संमेलन: पंतप्रधान यांनी ‘इंडिया’ आघाडीला उद्देशून

  • भटकती आत्मा: मोदींचे शरद पवारांना उद्देशून वक्तव्य

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: “....परत म्हणू नका दादा तुम्ही बोललाच नाहीत”; अजित पवारांचं सांगता सभेत भावनिक आवाहन

Latest Maharashtra News Updates : ७५ पेक्षा जास्त सभा घेतल्या, सरकारनं केलेली कामं लोकांसमोर मांडत गेलो; मुख्यमंत्र्यांनी सांगितला प्रचाराचा लेखाजोखा

IND vs AUS: 'रोहितच्या जागेवर असतो, तर मी पण...', ऑस्ट्रेलियाच्या हेडचं हिटमॅनच्या सुट्टीवर भाष्य

AUS vs PAK : पँट सांभाळू की चौकार ...? संकटात सापडला पाकिस्तानचा खेळाडू, Video Viral

Ajit Pawar: अजित पवारांच्या सभेत मुलगी हरवली; दादांनी स्वतः दिला आवाज अन् मुलगी पुढे आली

SCROLL FOR NEXT