'सोनिया गांधी यांनी १९९९ च्या लोकसभा निवडणुकीत कर्नाटकातील बळ्ळारी येथून भाजपच्या दिवंगत नेत्या दिवंगत सुष्मा स्वराज यांचा पराभव केला होता.'
बंगळूर : काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांना राज्यातून राज्यसभेसाठी उमेदवारी दिली जाऊ शकते, असा दावा करणारे प्रसार माध्यमांनी दिल्यानंतर ते वृत्त प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार (D. K. Shivakumar) यांनी मंगळवारी फेटाळून लावले.
सोनिया गांधी आगामी लोकसभा निवडणूक लढवणार (Loksabha Election) नाहीत आणि त्यांना कर्नाटकमधून राज्यसभेची जागा दिली जाऊ शकते, असे वृत्त प्रसिद्धी माध्यमातून आले होते. त्यावर ते म्हणाले, ‘‘ही सर्व माहिती खोटी आहे. अशी कोणतीही चर्चा झालेली नाही.
सोनिया गांधी यांनी १९९९ च्या लोकसभा निवडणुकीत कर्नाटकातील बळ्ळारी येथून भाजपच्या दिवंगत नेत्या दिवंगत सुष्मा स्वराज यांचा पराभव केला होता.’’ दरम्यान, मंड्या जिल्ह्यातील केरागोडू गावात १०८ फूट उंच ध्वजस्तंभावर फडकणारा हनुमान ध्वज हटवण्याच्या विषयावर शिवकुमार यांनी भाजप आणि धजद यांच्यावर जोरदार टीका केली. कायदा व सुव्यवस्था बिघडवण्यासाठी अशा गोष्टी केल्या जात असल्याचे ते म्हणाले.
केरागोडू येथील पंचायतीने राष्ट्रध्वज आणि कन्नड ध्वजाशिवाय दुसरे काहीही फडकवणार नाही, असे आश्वासन दिले आहे, असे सांगून ते म्हणाले की, सरकार राष्ट्रध्वज आणि संविधानाचे संरक्षण आणि आदर करण्यासाठी वचनबद्ध आहे, असे ते म्हणाले.
‘‘हनुमान ध्वज हटवल्याच्या विरोधात मंड्या येथील जिल्हा मुख्यालयात झालेल्या निदर्शनात सामील झाल्याबद्दल धजद नेते एच. डी. कुमारस्वामी यांचा खरपूस समाचार घेत शिवकुमार म्हणाले, कुमारस्वामी त्यांचा पक्ष भाजपमध्ये जवळजवळ विलीन केला आहे, असे दिसते. भाजपला मंड्यामध्ये आधार नाही, म्हणून ते तिथे धजदची ताकद वापरत आहेत. आता तेथे कोण कोणाला खातो ते पाहूया.’’
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.