mayawati sakal
देश

BSP Party : बसपची अस्तित्वाची लढाई; मायावतींचा दबदबा झपाट्याने कमी होऊ लागला

कधीकाळी उत्तर प्रदेशच्या राजकारणावर निर्विवाद वर्चस्व गाजवलेल्या मायावतींचा दबदबा झपाट्याने कमी होऊ लागला आहे.

सागर पाटील

जौनपूर - कधीकाळी उत्तर प्रदेशच्या राजकारणावर निर्विवाद वर्चस्व गाजवलेल्या मायावतींचा दबदबा झपाट्याने कमी होऊ लागला आहे. लोकसभा निवडणुकीत मायावतींचा बहुजन समाज पक्ष (बसप) कोणत्याही आघाडीत सहभागी न होता स्वतंत्रपणे निवडणूक लढवत आहे. मात्र राज्यातील किती मतदारसंघात या पक्षाचे उमेदवार निवडून येणार हा खरा प्रश्न आहे.

२००९ च्या लोकसभा निवडणुकीत बसपाचे २१ खासदार निवडून आले होते. मात्र पुढील दहा वर्षात म्हणजे २०१९ च्या निवडणुकीत या पक्षाच्या जागा निम्म्याने कमी होत दहावर आल्या. विशेष म्हणजे दरम्यानच्या काळात २०१४ मध्ये झालेल्या निवडणुकीत पक्षाला खातेही उघडता आले नव्हते. समाजवादी पक्षाच्या (सप) उमेदवारांमुळे भाजपचा फायदा होत असल्याचा आरोप लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा होऊ लागला आहे.

मागील लोकसभा निवडणुकीत बसपने अखिलेश यादव यांच्या समाजवादी पक्षासोबत युती केली होती. याचा फायदा सपपेक्षा बसपला जास्त झाला होता. यावेळी मात्र बसपपेक्षा सपच्या उमेदवारांची सर्वत्र जास्त चर्चा आहे. बसपचा प्रभाव वेगाने घटत चालला असल्याचे या पक्षाचे नेते - कार्यकर्ते मान्य करतात.

बसप वाढविण्यासह नव्या दमाचे कार्यकर्ते जोडण्यासाठी मायावती यांनी आपले पुतणे आकाश आनंद यांना राष्ट्रीय समन्वयक बनवत मोठी जबाबदारी दिली होती. तथापि काही मुद्द्यांवरून बिनसल्याच्या पार्श्वभूमीवर अलीकडेच मायावती यांनी आकाश यांची पदावरून हकालपट्टी केली.

सोशल इंजिनिअरिंगचा मुस्लिम, दलित आणि ब्राह्मण समाजाला एकत्र आणत सोशल इंजिनिअरिंगचा यशस्वी प्रयोग मायावती यांनी केला होता. मात्र काळाच्या ओघात हा प्रयोग फोल ठरत चालला आहे. हक्काची दलित मते भाजपसह इतर पक्षांकडे जाऊ लागल्याने मायावती यांच्या चिंतेत भर पडली आहे. २०१९ च्या निवडणुकीत बसपला उत्तर प्रदेश वगळता इतर कोणत्याही राज्यात यश मिळाले नव्हते.

उत्तर प्रदेशात १९ टक्के मतांसह या पक्षाला १० जागा मिळाल्या होत्या. यावेळी उत्तर प्रदेशातील ८० पैकी ७९ मतदारसंघात बसपचे उमेदवार मैदानात असून त्यातील २० उमेदवार मुस्लिम समाजाचे आहेत. सपच्या मुस्लिम मतांवर बसपचा डोळा आहे. पक्षाने २३ ओबीसी उमेदवार रिंगणात उतरवले आहेत तर १८ उमेदवार उच्चवर्णीय समाजाचे असून सर्वात कमी १७ उमेदवार दलित समाजाचे आहेत.

इतर राज्यांतही प्रभावहीन

दिल्ली, पंजाब, राजस्थान, उत्तराखंड अशा काही राज्यांत बसपने प्रस्थापित पक्षांची झोप उडवली होती. मात्र या राज्यांत आता नावालाच पक्ष राहिला आहे. २०१३ च्या विधानसभा निवडणुकीवेळी छत्तीसगडमध्ये बसपला २.०९ टक्के मते मिळाली होती. तर राजस्थानमध्ये १.८२, मध्य प्रदेशात ३.४ टक्के आणि तेलंगणमध्ये १.३८ टक्के मते मिळाली होती. २०१८ च्या विधानसभा निवडणुकीत छत्तीसगड आणि मध्य प्रदेशात पक्षाचे प्रत्येकी दोन तर राजस्थानमध्ये सहा आमदार निवडून आले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जनसंघ पक्ष म्हणून १९६२मध्ये निवडणुकीत उतरला; पहिल्या प्रयत्नात ० जागा, नंतर 'फिनिक्स'झेप, २०२४ मध्ये भाजपचा चढता आलेख किंगमेकर ठरला!

Maharashtra Assembly Election Result: भाजप पुन्हा नंबर वन, जवळपास ७० टक्के जागा जिंकण्याचा घडविला विक्रम

Maharashtra Election 2024: पंतप्रधान मोदींनी शिंदे-फडणवीस-पवारांचे केले अभिनंदन, म्हणाले, महाराष्ट्रात सत्याचा विजय

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: निकालाच्या दिवशी मुंबईत नक्की काय घडलं? वाचा एका क्लिकवर!

Daund Election Result 2024 : दौंड- राहुल कुल यांची हॅटट्रिक, १३ हजार मतांच्या फरकाने विजयी..!

SCROLL FOR NEXT