mahayuti maharastra  sakal
देश

Loksabha Election : महायुतीची खलबते होणार दिल्लीत; महायुतीच्या जागावाटपाचा तिढा सुटला नाही

भारतीय जनता पक्ष, शिवसेना (शिंदे गट) व राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) मधील जागावाटपाचा तिढा अद्यापही सुटला नसून यावर आता दिल्लीतच खलबते होणार आहे.

सकाळ न्यूज नेटवर्क / वृत्तसंस्था

नवी दिल्ली - भारतीय जनता पक्ष, शिवसेना (शिंदे गट) व राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) मधील जागावाटपाचा तिढा अद्यापही सुटला नसून यावर आता दिल्लीतच खलबते होणार आहे. दिल्लीत आज भाजपच्या महाराष्ट्र कोअर समितीची बैठक झाली. यात महाराष्ट्रात भाजपने लढवायच्या जागा व संभाव्य उमेदवारांच्या नावावर सखोल चर्चा झाली.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दोन दिवस महाराष्ट्रात येऊन विविध नेत्यांशी चर्चा केल्यानंतरही महायुतीच्या जागावाटपाचा तिढा सुटला नाही. मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अमित शहा यांची भेट घेऊन जागांचा प्रस्ताव समोर ठेवला आहे.

या दोन्ही पक्षांनी दिलेल्या प्रस्तावाला भाजपचा विरोध असून शिवसेनेकडे असलेल्या काही जागांवर भाजपने कंबर कसली आहे. यात मावळ, छत्रपती संभाजीनगर, रामटेक, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, नाशिक या मतदारसंघांचा प्रामुख्याने समावेश आहे.

भाजपने किमान ३५ जागांवर हक्क सांगितला आहे. या संदर्भात नेमके कोणते मतदारसंघ भाजपकडे ठेवावयाचे, भाजप महाराष्ट्राच्या कोअर समितीची बैठक आज केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या निवासस्थानी पार पडली.

या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मुंबई प्रदेश भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार, विधान परिषदेतील गटनेते प्रवीण दरेकर, माजी मंत्री चंद्रकांत पाटील उपस्थित होते. यात भाजपने किमान ३२ ते ३५ जागा लढविण्यावर सर्वांचे मैतक्य असल्याचे समजते.

उर्वरित १३ ते १६ जागा शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस या मित्रपक्षांना सोडण्यात याव्यात, असा सूर बहुतेक भाजप नेत्यांनी लावल्याचे सांगण्यात आले. या बैठकीनंतर या नेत्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा व भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची भेट घेऊन या संदर्भातील कोअर समिती सदस्यांचा निर्णय सांगितल्याचे समजते.

शिंदे व पवारही दिल्लीत येणार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार दोन दिवसांनी दिल्लीत येणार असल्याचे बोलले जात आहे. यावेळी ते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा व भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची भेट घेणार असल्याचे सांगण्यात आले. या बैठकीनंतर महायुतीच्या जागावाटपाचे चित्र स्पष्ट होणार आहे.

यामुळे आता महायुतीच्या जागावाटपाचे केंद्र आता मुंबईतून दिल्ली हलल्याचे दिसत आहे. जागावाटपाचा तिढा न सुटल्याने भाजपच्या दुसऱ्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीत महाराष्ट्रातील उमेदवारांच्या नावावर चर्चा होण्याची शक्यता धूसर झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: ..तर जाऊ शकते मनसेची मान्यता; राज ठाकरेंचे भवितव्य जनतेच्या हाती

Delhi Weather: दिल्लीची हवा बनली विषारी...! श्वास घेणंही कठीण; AQI 460 पार, GRAP-4 लागू...

Latest Maharashtra News Updates : प्रचाराच्या तोफा आज थंडावणार, पडद्यामागील घडामोडींना येणार वेग

Mallikarjun Kharge : उत्तरप्रदेशात आगीत 10 मुलांचा मृत्यू झाला तरी योगींच्या महाराष्ट्रातील सभा थांबल्या नाहीत, खर्गेंचा हल्लाबोल

आज सायंकाळी 6 वाजता थंडावणार प्रचाराच्या तोफा! मतदानापूर्वीच्या 30 तासातील हालचालींवर भरारी पथकांचा वॉच; बुधवारी सकाळी 7 ते सायंकाळी 6 पर्यंत मतदान

SCROLL FOR NEXT