krishna advani vs Rajesh Khanna ESAKAL
देश

Lok sabha Election: लालकृष्ण अडवाणी विरुद्ध राजेश खन्ना लोकसभा लढत; कोण जिंकलं? जाणून घ्या रंजक किस्सा

lal krishna advani vs Rajesh Khanna : देशाच्या राजधानीतील नवी दिल्ली लोकसभा मतदारसंघ हा कायम चर्चेत राहिलेला आहे. कारण, या जागेवरुन नेहमी बड्या नेत्यांनी निवडणुका लढवल्या आहेत.

कार्तिक पुजारी

नवी दिल्ली- लोकसभा निवडणुका दोन महिन्यावर येऊन ठेपल्या आहेत. सर्व राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. देशाच्या राजधानीतील नवी दिल्ली लोकसभा मतदारसंघ हा कायम चर्चेत राहिलेला आहे. कारण, या जागेवरुन नेहमी बड्या नेत्यांनी निवडणुका लढवल्या आहेत. या मतदारसंघाचा इतिहास आणि एक रंजक किस्सा आपण जाणून घेऊया.

नवी दिल्ली लोकसभा मतदारसंघातून अटल बिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणी हे जिंकले आहेत. स्वातत्र्यानंतर या जागेवरुन सुचेता कृपलानी यांनी निवडणूक लढवली होती. या जागेवरुन निवडून येणाऱ्या त्या पहिल्या महिला उमेदवार होत्या. (Loksabha Election new delhi lal krishna advani vs Rajesh Khanna in 1991 just 1589 votes difference who win)

भाजपकडून बांसुरी स्वराज

नवी दिल्ली लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाने दिवंगत नेत्या सुषमा स्वराज्य यांची कन्या बांसुरी स्वराज यांना मैदानात उतरवलं आहे. दिल्लीमध्ये काँग्रेस आणि आम आदमी पक्ष एकत्र निवडणूक लढवत आहे. इंडिया आघाडीकडून आपचे उमेदवार सोमनाथ भारती यांना तिकीट देण्यात आलं आहे.

नवी दिल्ली लोकसभा मतदारसंघात अरविंद केजरीवाल यांचा विधानसभा मतदारसंघ देखील येतो. त्यामुळे या मतदारंसघाला खूप महत्त्व आहे. सुरुवातीच्या काळात काँग्रेसच्या उमेदवारांचा ताबा या मतदारसंघावर राहिला. मेहर चंद खन्ना हे देखील या जागेवरुन खासदार होते. पण, १९६७ च्या निवडणुकीत जनसंघाचे उमेदवार एमएल सौंधी यांचा विजय झाला होता.

अटल बिहारी वाजपेयी १९७७ आणि १९८० मध्ये या मतदारसंघातून निवडणूक लढले आणि जिंकले. दुसरीकडे १९८९ आणि १९९१ मध्ये अडवाणी देखील या जागेवरुन विजयी झाले होते. जगमोहन सर्वाधिक तीन वेळा या मतदारसंघातून खासदार होते. ते वाजपेयींच्या कॅबिनेटमध्ये देखील होते. त्यानंतर काँग्रेसचे अजय माकन दोन वेळा या मतदारसंघातून विजयी झाले. २०१४ मध्ये भाजपने मिनाक्षी लेखी यांना संधी दिली आणि त्या खासदार झाल्या.

सर्वाधिक रंजक लढत १९९१ मधील

नवी दिल्ली लोकसभा मतदारसंघात भाजप नेते लालकृष्ण अडवाणी आणि काँग्रेसचे उमेदवार व सुपरस्टार राजेश खन्ना हे आमनेसामने आले होते. १९९१ मध्ये या दोघांमध्ये चुरशीची लढत झाली होती. रथ यात्रेनंतर अडवाणी यांची प्रतिमा उंचावली होती. दुसरीकडे, राजेश खन्ना यांची लोकप्रियता अद्याप कायम होती. निकाल लागला तेव्हा, अडवाणी यांवी राजेश खन्ना यांना १५८९ मतांनी हरवलं होतं. यावरुन या चुरशीच्या लढतीबाबत कल्पना करता येईल. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT