Lok Sabha Result Esakal
देश

Lok Sabha Result: लोकसभा निवडणुकीत भाजपने उघडलं आपलं खातं, सुरतमध्ये उधळला विजयाचा गुलाल

अंकिता खाणे (Ankita Khane)

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुजरातमधून भारतीय जनता पक्षासाठी आनंदाची बातमी आली आहे. लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे खाते उघडलं आहे. काँग्रेसचे उमेदवार नीलेश कुंभानी यांचा उमेदवारी अर्ज रद्द झाल्याने उर्वरित उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने भाजपचे उमेदवार मुकेश दलाल हे बिनविरोध विजयी झाले.

सुरत लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस उमेदवाराचा अर्ज रद्द झाल्यानंतर उर्वरित 8 उमेदवारांनीही आपली नावे मागे घेतली असून, त्यानंतर भाजपचा बिनविरोध विजय निश्चित झाला आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत भाजपचे खातेही उघडले आहे. मुकेश दलाल येथून भाजपचे उमेदवार होते. भाजपने पहिला विजय मिळवला आहे.

सुरत लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार नीलेश कुंभानी हे त्यांच्या तीनपैकी एकही प्रस्तावक निवडणूक अधिकाऱ्यांसमोर मांडू शकले नाहीत, त्यानंतर निवडणूक अधिकाऱ्यांनी नीलेश कुंभानी यांचा उमेदवारी अर्ज रद्द केला.

सुरतमधील काँग्रेसचे पर्यायी उमेदवार सुरेश पडसाला यांचा उमेदवारी अर्जही अवैध ठरला आणि गुजरातच्या प्रमुख विरोधी पक्षाला शहरातील निवडणुकीच्या रिंगणातून बाहेर पडावे लागले.

त्यांच्या आदेशात, निवडणूक अधिकारी सौरभ पारधी यांनी सांगितले की, कुंभणी आणि पडसाळ यांनी सादर केलेले चार अर्ज फेटाळण्यात आले कारण प्रथमदर्शनी, प्रस्तावकांच्या स्वाक्षऱ्यांमध्ये तफावत आढळून आली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Big Breaking: Navdeep Singh च्या रौप्यपदकाचे 'सुवर्ण'मध्ये रुपांतर झालं; भारतीय खेळाडूचं नशीब चमकलं, पण नेमकं असं काय घडलं?

Simran Sharma: अवघ्या १० मिनिटांत भारताला दोन पदकं; दृष्टिहीन सिमरनची २०० मीटर शर्यतीत सर्वोत्तम कामगिरीसह बाजी

Ravikant Tupkar Fasting : रविकांत तुपकरांचे अन्नत्याग आंदोलन स्थगित ; शेतकरी महिलेच्या हस्ते सोडले उपोषण

X Down: भारतासह जगभरात तासभर ट्विटर पडलं होतं बंद! नेटकऱ्यांचा संताप अन् पुन्हा झालं सुरु

Rashmika Mandana at Beed: रश्मिका मंदाना बीडमध्ये! धनंजय मुंडेंनी आयोजित केलेल्या गणेशोत्सवाच्या कार्यक्रमाला लावली हजेरी

SCROLL FOR NEXT