Murlidhar Mohol Oath Ceremony Sakal
देश

Parliament MP Oath : लोकसभेने अनुभवली देशातील भाषांची समृद्धी व विविधता

संसदेत आज झालेल्या शपथविधीदरम्यान नवनिर्वाचित खासदारांनी इंग्रजीसह संस्कृत, हिंदी, मराठी, डोगरी, हिंदी, बंगाली, आसामी, उडिया आदी भाषांमध्ये शपथ घेतली.

पीटीआय

नवी दिल्ली - संसदेत आज झालेल्या शपथविधीदरम्यान नवनिर्वाचित खासदारांनी इंग्रजीसह संस्कृत, हिंदी, मराठी, डोगरी, हिंदी, बंगाली, आसामी, उडिया आदी भाषांमध्ये शपथ घेतली. या निमित्ताने लोकसभेने देशातील भाषांची समृद्धी व विविधता अनुभवली.

पंतप्रधान मोदी यांच्याशिवाय केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षणमंत्री राजनाथसिंह, रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी, महिला व बाल कल्याण मंत्री अन्नपूर्णा देवी, दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य शिंदे आणि नागरी विकास मंत्री मनोहरलाल खट्टर यांनीही हिंदीमधून शपथ घेतली.

केंद्रीय शिक्षणमंत्री व ओडिशातील भाजप खासदार धर्मेंद्र प्रधान यांनी उडिया भाषेत शपथ घेतली. मात्र, प्रधान शपथ घेत असतानाच विरोधी खासदारांनी ‘नीट, नीट, अशी घोषणाबाजी केली. वैद्यकीय अभ्यासक्रमासाठीच्या राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षेतील (नीट) कथित गैरव्यवहाराचा संदर्भ या घोषणाबाजीला होता.

केरळमधून प्रथमच निवडून आलेले भाजप खासदार सुरेश गोपी यांनी १८ व्या लोकसभेचे सदस्य म्हणून मल्याळम भाषेत शपथ घेतली. शपथ घेण्यापूर्वी त्यांनी ‘कृष्णा’, ‘गुरुवायूरप्पा’ चा जयघोष केला. पर्यटन व पेट्रोलियम राज्यमंत्री असलेले गोपी यांच्या रूपाने केरळमध्ये भाजपचा खासदार प्रथमच निवडून आला आहे.

राज्यातील थ्रिसूर लोकसभा मतदारसंघाचे ते प्रतिनिधित्व करतात. उत्तर गोव्यातून सहाव्यांदा खासदार म्हणून निवडून आलेल्या श्रीपाद नाईक यांनी संस्कृतमध्ये शपथ घेतली. ते मोदी सरकारमध्ये अपारंपरिक ऊर्जा राज्यमंत्री आहेत.

मोहोळांची मराठीत शपथ

ईशान्य प्रदेश विकास व शिक्षण राज्यमंत्री सुकांता मजुमदार यांनी बंगालीत तर पुण्याचे खासदार व केंद्रीय हवाई वाहतूक व सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी मराठीत शपथ घेतली. केंद्रीय मंत्री आणि जम्मू व काश्मीरमधील उधमपूरचे खासदार जितेंद्रसिंह यांचा डोगरी तसेच केंद्रीय बंदर व जहाज बांधणीमंत्री सर्वानंद सोनोवाल यांचा आसामीत तर हवाई वाहतूक मंत्री राममोहन नायडू यांचा तेलुगू भाषेत शपथविधी झाला. पोलाद व अवजड उद्योगमंत्री एच.डी. कुमारस्वामी आणि ग्राहक व्यवहार मंत्री प्रल्हाद जोशी यानी कन्नडमध्ये शपथ घेतली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rickshaw meter fraud Video: रिक्षाच्या मीटरमध्ये कसा होते फ्रॉड? मुंबई पोलिसांचा लाईव्ह डेमो, क्षणात ओळखा फसवेगिरी

India vs Oman: भारताची विजयी हॅट्ट्रिक; Asia Cupच्या उपांत्य फेरीत धडक

Pune Crime : रविवार पेठेतील ज्वेलर्सच्या दुकानातून पावणेदोन कोटींचे दागिने चोरी

Pune Crime : पाषाण, सदाशिव पेठेतील ज्येष्ठ नागरिकांची ७० लाखांची फसवणूक

Pune Helmet mandatory: पुणे विभागात हेल्मेटसक्ती! विभागीय आयुक्तांचे निर्देश; दुचाकीवर मागे बसणारालाही नियम पाळावा लागेल

SCROLL FOR NEXT