No-Confidence Motion Sakal
देश

No-Confidence Motion: सरकारविरोधातील अविश्वासाचा प्रस्ताव फेटाळला, सभागृहात नेमकं काय घडलं? वाचा सविस्तर

तिसऱ्या आणि अखेरच्या दिवशी अविश्वासाच्या प्रस्तावाला पंतप्रधान मोदी यांनी उत्तर दिलं.

सकाळ डिजिटल टीम

नेमकं काय झालं सभागृहात? वाचा सविस्तर

विरोधकांनी दाखल केलेला अविश्वासाचा ठराव लोकसभा अध्यक्षांनी फेटाळला आहे. तब्बल तीन दिवस या प्रस्तावावर चर्चा सुरू होती.

मोदी सरकारविरोधातील अविश्वासाचा प्रस्ताव फेटाळला, अधीर रंजन चौधरी यांचं निलंबन

विरोधी पक्षांच्या आघाडीने मोदी सरकारविरोधात मांडलेला अविश्वासाचा प्रस्ताव लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडून फेटाळण्यात आला आहे. त्याचबरोबर काँग्रेसचे नेते खासदार अधीर रंजन चौधरी यांचं निलंबन करण्यात आलं आहे. त्यामुळे ते उद्या लोकसभेच्या कामकाजावेळी हजर नसणार आहेत.

अखेर मणिपूरवर बोलले पंतप्रधान मोदी

काँग्रेसच्या काळात मणिपूरच्या नागरिकांवर अत्याचार झाले. १९२६ च्या भारत चीन युद्धावेळी पंडित नेहरू रेडिओवरून काय बोलले होते? आसामच्या जनतेला त्यांनी त्यांच्या परिस्थितीवर सोडून दिलं होतं. जाणूनबुजून त्यांनी त्या भागाचा विकास केला नाही असा आरोप नरेंद्र मोदी यांनी केला.

पुर्वोत्तर राज्यातील समस्याचं कारण काँग्रेस आहे. आमच्या सरकारने पुर्वोत्तर राज्यातील विकासांचं काम हाती घेतलं. आमचं सरकार या राज्याच्या विकासासाठी प्रयत्नशील आहे.

सबका साथ सबका विकास हा आमचा फक्त नारा नाही तर ही आमची कमिटमेंट आहे. ईशान्य भारताला आजवर जे मिळालं नाही ते देण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे असं मोदी म्हणाले.

मोदींचं भाषण सुरू असताना विरोधकांचा सभात्याग

  • मोदींचं भाषण सुरू असताना विरोधकांनी सभात्याग केला आहे. मणिपूर मुद्द्यावर मोदी काहीच बोलत नसल्यामुळे विरोधकांनी सभात्याग केला आहे. देशाच्या भल्यासाठी मणिपूर प्रकरणावर तोडगा काढला. या मुद्द्यावर अमित शहा यांनी काल सविस्तर सांगितलं असल्याचं त्यांनी यावेळी सभागृहात सांगितलं आहे.

  • मणिपूरचे अनेक कुटुंब रस्त्यावर आले आहेत. मणिपूर हिंसाचाराच्या दोषींना कडक शिक्षा होणार आहेच पण मणिपूरच्या प्रत्येक बांधवासोबत देश आहे, अनेकांनी आपले कुटुंबीय गमावले, त्यांचं दु:ख मोठ आहे. अमित शहा यांनी मणिपूरच्या जनतेचा आधार देण्याचं काम केलं.

  • काँग्रेसचा इतिहास भारतमातेला छिन्नविछिन्न करणारा, मी गावांशी नागरिकांशी भावनेनं जोडलो गेलो आहे, मी देशातील गावात गेलेला माणूस आहे.

  • काँग्रेसने मिझोरमच्या जनतेवर वायूसेनेद्वारे हल्ला केला. आजही मिझोरममध्ये ५ मार्च रोजी शोक व्यक्त केला जातो. मिझोरमचे नागरिक भारताचे नागरिक नव्हते का? या हल्ल्याचं सत्य काँग्रेसने देशापासून लपवलं. मिझोरम काँग्रेसला कधीच माफ करणार नाही.

  • पुर्वोत्तर भारतात कमी जागा त्यामुळे तिकडे काँग्रेसचे लक्ष कमी होतं. त्यांच्या या धारणेमुळे पुर्वोत्तर भारताचा विकास झाला नाही. पण आमच्यासाठी हा भाग काळजाचा तुकडा आहे

घमंडिया आघाडी देशाची अर्थव्यवस्था बुडवणारी

घमंडिया आघाडी देशाची अर्थव्यवस्था बुडवणारी आहे असा टोला नरेंद्र मोदी यांनी केली आहे. निवडणुकात जिंकण्यासाठी कधीही पूर्ण न होणारे आश्वासने देणे सुरू असल्याचंही ते म्हणाले आहेत.

मोदींची विरोधकांच्या आघाडीवर जोरदार टीका

  • काही दिवसांपूर्वी बंगळुरूमध्ये तुम्ही युपीएचे अंत्यसंस्कार केले. तुम्ही इंडियाचे तुकडे केले. तुम्हाला नवी आघाडी स्थापन करण्यासाठीसुद्धा NDA चा सहारा घ्यावा लागला. देशाचं नाव वापरल्यामुळे त्यांना वाटलं की. लोकांचा विश्वास मिळवता येईल पण तसं होत नाही. मी तेव्हाच संवेदना व्यक्त करायला हवी होती. ही इंडिया आघाडी नाही घमंडिया आघाडी आहे

  • विरोधकांमध्ये मॅग्नेटिक पावर आहे, ते चुकीच्या गोष्टी लगेच पकडतात. पश्चिम बंगाल, तामिळनाडूमध्ये काँग्रेसवर जनतेचा अविश्वास आहे.

  • चिन्ह आणि विचारही काँग्रेसने दुसऱ्यांकडून चोरलं, तिरंगा चोरण्याचं काम काँग्रेसने केलं, कोणतीच गोष्ट त्यांची स्वत:ची नाही. केवळ चष्मा बदलून विकासाचं चित्र दिसत नाही.

  • विरोधकांमध्ये एकी राहू शकत नाही. त्यांच्यातील सर्वांनाच पंतप्रधान व्हायचंय, सध्या परिस्थितीच अशी आहे म्हणून त्यांच्या हातात हात आहे. पश्चिम बंगालमध्ये विरोधात तर दिल्लीत एकत्र असं म्हणत त्यांनी काँग्रेसवर टीका केली आहे.

  • परिवारवाद हेच विरोधकांचं ध्येय, त्यांना परिवारवाद आणि दरबार वाद पसंत आहे.

  • काँग्रेसच्या परिवारवादामुळे सामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागला आहे. यांनी आपल्या राजकारणामध्ये अनेकांचा हक्क हिरावला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना काँग्रेसने दोन वेळा पराभूत केलं.

  • स्टॅच्यू ऑफ युनिटीमुळे सरदार पटेलांचं काम जनतेपर्यंत पोहोचवलं.

  • लंका हनुमानाने जाळली नव्हती, रावणाच्या अहंकाराने जाळली होती - राहुल गांधीच्या टीकेला मोदींचं प्रत्युत्तर

  • यांच्या वाढदिवसाचा केक विमानात कापला जायचा, आज सर्वसामान्य नागरिक विमानाने प्रवास करतात.

  • काँग्रेसच्या अहंकारामुळे काँग्रेस ४०० वरून ४० वर आली आहे. मनातलं बोला असं काहीजण म्हणाले पण त्यांच्या बुद्धीचीही वाईट अवस्था झाली आहे. बुडणाऱ्याला काडीचा आधार घ्यावा लागतो.

  • २४ तास काँग्रेसच्या स्वप्नात मोदी येतात, त्यांचं मोदीप्रेम मोठं आहे, ज्याचं डोकं आधुनिक राजासारखं चालतं त्यांना सामान्यांचा त्रास होतो.

  • काँग्रेसला एकच फेल प्रोडक्ट वारंवार लाँच करावं लागतंय असा टोला मोदींनी राहुल गांधींनी लावला आहे.

  • ते जमिनीवर उतरले नाहीत, त्यांनी गाडीतूनच गरिबी पाहिली.

  • राहुल गांधींना गाव माहिती नाही - भारत जोडो यात्रेवरून राहुल गांधींनी टोला

विरोधकांच्या सभागृहात "मणिपूर मणिपूर" अशा घोषणा

पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलत असताना विरोधकांनी मणिपूर मणिपूर अशा घोषणा दिल्या आहेत. तर मोदी यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे.

सभागृहाच्या कामकाजाची वेळ लोकसभा अध्यक्षांनी वाढवली.

गेल्या पाच वर्षामध्ये साडे तेरा कोटी लोकं गरिबी रेषेबाहेर - मोदींची विरोधकांवर टोलेबाजी

  • देशातील गरिबी वेगाने कमी होत आहे. गेल्या पाच वर्षामध्ये साडे तेरा कोटी लोकं गरिबी रेषेबाहेर आले आहेत. भारताची निर्याच नवे उच्चांक गाठत आहे. देशातील परकीय गुंतवणूकही वाढत आहे. आम्ही देशाची प्रतिमा जगभरात उंचावण्याचे काम केले आहे. 'स्वच्छ भारत'मुळे तीन लाख लोकांचे जीव वाचले. स्वच्छ भारत अभियान आणि जलजीवन मिशनचं WHO कडून अभिनंदन झालं. आपल्या संकल्पना सिद्धीपर्यंत घेऊन जाण्याचा हाच काळ आहे.

  • जे सत्य जगाला दिसतंय ते विरोधकांना का दिसत नाही? काही लोकांकडून जगात भारताची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न सुरू आहे. गेले तीन दिवस विरोधकांनी अनेक अपशब्द वापरले गेले. अविश्वास आणि अहंकार विरोधकांच्या रक्तात आहे. मोदी तेरी कब्र खुलेगी असा नारा विरोधकांनी दिला.

  • विरोधकांना सिक्रेट वरदान मिळालंय, काहीजण शेतात जाऊन फोटोशूट करतात, यापूर्वीही HAL कंपनीच्या आवारात जाऊन असेच व्हिडिओ बनवले जायचे. HAL बाबतही विरोधकांनी प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न केला.

  • आम्ही डिजीटल इंडिया करण्याचं बोललो पण काही लोकं म्हणाले भारतातले लोकं अडाणी आहेत. त्यांना काही येत नाही पण आज भारत डिजीटल झाला.

  • आम्ही ज्या योजना आणल्या त्यावर विरोधकांनी टीका केल्या.

पंतप्रधान नरेंद्र मोदी

  • मागच्या तीन दिवसांपासून लोकसभा सदस्यांनी अविश्वास प्रस्तावावर सभागृहात विचार मांडले आहेत. जनतेचे आभार मानण्यासाठी मी इथे उभा आहे. देशाच्या जनतेने आमच्यावर वारंवार विश्वास दाखवला आहे.

  • देवाच्या आदेशाने विरोधकांनी अविश्वासाचा प्रस्ताव आणला. त्यासाठी मी देवाचे आभार मानतो. विरोधकांनी आणलेला अविश्वास आमच्यासाठी शुभ असतो. ही आमची नाही तर विरोधकांची बहुतमत चाचणी आहे. २०२४ ला मी जनतेच्या आशिर्वादाने पुन्हा सत्तेवर येणार... असं मोदी म्हणाले.

  • येणारा काळ हा तंत्रज्ञानाचा आहे, यावर किती गंभीर चर्चा होऊ शकते पण विरोधकांना ते सुचत नाही. त्यांना फक्त राजकारण करता येतं. त्यांना गरिबांची चिंता नाही, त्यांना फक्त राजकारण आणि सत्तेची चिंता आहे. मागच्या काही दिवसात दोन्ही सभागृहात अनेक बिल पास झाली. बिलावर चर्चा होणे अपेक्षित होतं पण राजकारण तुमच्यासाठी महत्वाच होतं... असा टोला मोदींनी लावला आहे.

  • अविश्वासाचा प्रस्ताव विरोधकांनी दिला पण चौकार आणि षटकार तर आमच्याकडून लागले. विरोधकांना आम्ही पाच वर्षे दिले तरी त्यांची तयारी नाही.

  • ज्यांचे स्वत:चे हिशोब बिघडलेत ते आम्हाला हिशोब विचारत आहेत. विरोधकांना गुळाचं गोबर कसं करायचं ते चांगलं माहितीये. अधीर चौधरी बाबूंना बाजूला का केलं माहिती नाही, कदाचित कोलकत्त्यावरून फोन आला असेल असा टोला मोदींनी लावला.

  • आत्ताची वेळ देशासाठी खूप महत्त्वाची आहे. सध्याच्या कालखंडाचा प्रभाव देशावर येणाऱ्या एक हजार वर्षासाठी राहील. भारताचे प्रत्येक स्वप्न पूर्ण करण्याचा हा कालखंड आहे. १४० कोटी जनतेची ताकद आपल्याला त्या उंचीवर घेऊन जाईल.

  • आम्ही भारतातील तरूणांना घोटाळेविरहीत सरकार दिलं. युवकांची स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी आमच्या सरकारने प्रयत्न केले. जगामध्ये भारताचं नाव आम्ही उंचावलं. युवकांच्या पंखांना उडण्यासाठी बळ दिलं, आम्हाला युवाशक्तीवर विश्वास ठेवून त्यांचं स्वप्न साकार करायचं आहे. असं मोदी लोसभेत म्हणाले.

पंतप्रधान मोदी सभागृहात पोहोचले; संबोधनाकडे देशाचे लक्ष

पंतप्रधान नरेंद्र मोदी सभागृहात पोहोचले असून ते मणिपूर प्रकरण आणि इंडिया आघाडीवर काय बोलतील याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेय

काँग्रेसचे एका खास समुदायावर प्रेम; राजवर्धन सिंह राठोड यांचा हल्लाबोल

भाजप नेते राजवर्धन सिंह राठोड यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. राहुल गांधींना राजस्थानमध्ये महिलांवरील अत्याचार दिसत नाहीत का? काँग्रेस नेते आणि त्यांच्या कुटुंबियातील सदस्यांवर अनेक गंभीर आरोप आहेत. त्याबाबत हे काही बोलणार नाहीत. हाच त्यांचा खरा चेहरा आहे, अशी टीका त्यांनी केली. एका खास समुदायाला वीज बिल माफ करण्यात आले. पण, हिंदूंना काही सवलत दिली नाही. काँग्रेसने भारताला तोडण्याची सुपारी घेतली आहे, असं ते म्हणाले.

२००८मध्ये सोनिया गांधी आणि राहुल गांधी चीनच्या कम्युमिस्ट पार्टीच्या नेत्यांना भेटायला आले होते. त्यांना देशद्रोहाची शिक्षा झाली पाहिजे- राजवर्धन राठोड

आणीबाणी लावणारे संविधानाची सुरक्षा करु शकत नाही. कितीही चेहरे बदला पण तुम्ही जनतेचे कधी होणार नाही, असं म्हणत ज्योतिरादित्य सिंधिया यांनी टीका केली.

भारताला तुकड्यात पाहण्याची विचारधारा काँग्रेसची; ज्योतिरादित्य सिंधिया यांची टीका

नरेंद्र मोदींचा 'आधंळा राजा' उल्लेख, सभागृहात राडा, अमित शाह आक्रमक!

निरव मोदी पैसे घेऊन पळून गेला. भाजप सरकारने काही केले नाही. आता मणिपूरमधील घटनेवरुन मला कळालं की निरव मोदी भारतातच आहे. नरेंद्र मोदींच्या रुपात निरव मोदी जिवंत आहे. नरेंद्र मोदी निरव मोदी बनून अजूनही गप्प बसले आहेत, असं म्हणत अधीर रंजन चौधरी यांनी टीका केली. त्यांच्या या वक्तव्यावर आक्षेप घेत भाजपने त्यांच्या माफीची मागणी केली आहे.

अधीर रंजन चौधरी यांचे भाषण ऐकण्यासाठी PM मोदी सभागृहात दाखल

लोकसभेत लोकसभेत अधीर रंजन चौधरी यांचे अविश्वास प्रस्तावावरील भाषण ऐकण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आले.

राहुल गांधींच्या फ्लाईंग किसवर शशी थरूर यांचे वक्तव्य

राहुल गांधींच्या 'फ्लाईंग किस' वादावर काँग्रेस खासदार शशी थरूर म्हणाले, "ते कोणी पाहिले नाही. मला वाटत नाही की त्याची कोणतीही नोंद आहे. मला विश्वास आहे की ते ही संसद टीव्हीवरही नाही. त्यामुळे आम्हाला काहीच कल्पना नाही."

अधीर रंजन चौधरी यांच्या भाषणावेळी PM मोदी राहणार उपस्थित

अधीर रंजन चौधरी लोकसभेत बोलणार आहेत. यादरम्यान पंतप्रधान मोदी सभागृहात उपस्थित राहणार आहेत. अविश्वास ठरावावरील चर्चा तिसऱ्या दिवशीही सुरूच आहे.

विरोधी खासदारांनी लोकसभेतून सभात्याग केला

अविश्वास ठरावावरील चर्चेचा आज तिसरा दिवस आहे. केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन यांनी लोकसभेत अविश्वास प्रस्तावावर आजच्या चर्चेला सुरुवात केली. यानंतर लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे खासदार अधीर रंजन चौधरी यांनी भाषण केले. सध्या AIMIM प्रमुख असदुद्दीन औवेसी यांचीही भाषण करत आहेत

लोकसभेचे कामकाज दुपारी १२ वाजेपर्यंत तहकूब झाल्यानंतर पुन्हा एकदा कामकाजाला सुरूवात झाली आहे.

लोकसभेचे कामकाज दुपारी १२ पर्यंत तहकूब

लोकसभेचे कामकाज दुपारी १२ पर्यंत तहकूब करण्यात आले आहे.

राहुल गांधी यांच्या विरोधात भाजपचे आंदोलन

सभागृहातच फ्लाईंग किस दिल्याचा आरोप करत भाजपने राहुल गांधी यांच्या विरोधात आंदोलन सुरू केलं आहे. काल सभागृहात राहुल गांधी यांनी फ्लाईंग किस केलं होतं.

मोदी सरकारच्या विरोधात मतदान करण्यासाठी राष्ट्रवादीचे दोन व्हीप

संसदेच्या पावसाळी अधिवेशनात विरोधकांच्या इंडिया या आघाडीने सरकारवर अविश्वासाचा प्रस्ताव दाखल केला. त्यानंतर आता सरकारच्या विरोधात किती मते पडतील याच्याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने दोन व्हीप निघाले आहेत. शरद पवार गट आणि अजित पवार गटाने हे व्हीप काढले असून लोकसभा अध्यक्ष कुणाला परवानगी देणार याकडे लक्ष लागलेले आहे.

रजनी पाटील बाईट ऑन फ्लाईंग किस -

"मी स्वतः प्रेक्षक गॅलरीत बसून होते, मी ते सगळं पाहिलं. त्यांनी प्रेमाची झप्पी म्हणून तो किस दिला त्याचा चुकीचा अर्थ काढला गेला. राहुल गांधी यांचे कागद खाली पडले होते, ते उचलत असताना भाजपचे खासदार हसत होते. तेंव्हा त्यांनी उत्तर न देता फक्त हसत फ्लाईंग किस दिला आता त्यावरून भाजप टीका करत आहे." असं रजनी पाटील म्हणाल्या आहेत.

आंदोलन करणे हे चुकीचं आहे. स्मृती इराणी यांना प्रश्न आहे की, मणिपूर जळत असताना त्यावर बोलत नाही. राहुल गांधी यांच्यावर बोलायला मुद्दा नाही म्हणून असं करता का तुम्ही? असा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे.

मुळात कलावती ताई बुंदेलखंड नाही तर विदर्भातील आहेत.अमित शाह यांनी चुकीचा उल्लेख केला. खोटं बोला पण रेटून बोला ही भाजपची नीती आहे. त्या कलावती ताई यांना घराची चावी दिली तेंव्हा मी स्वतः तिथं उपस्थित होते. आम्ही जे करतो त्याचा गाजावाजा करत नाही. राहुल गांधी यांनी निर्भयाच्या भावाला पायलट केलं पण त्यावर मात्र कधी जाहीर भाष्य केलं नाही असंही त्या म्हणाल्या.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज लोकसभेत देणार उत्तर

काल झालेल्या राहुल गांधी यांच्या भाषणावर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभेत उत्तर देणार आहे. दुपारी चार वाजता ते बोलणार आहेत.

अविश्वासाच्या प्रस्तावावर सत्ताधारी-विरोधकांत घमासान

विरोधकांच्या 'इंडिया' आघाडीने लोकसभा अधिवेशनात अविश्वासाचा प्रस्ताव दाखल केला. त्याचबरोबर राहुल गांधी यांना खासदारकी परत मिळाल्यावर त्यांनी काल सभागृहात सरकारला चांगलंच धारेवर धरलं. तर सत्ताधारी सदस्यांनी त्यांच्या भाषणात अनेकदा गोंधळ घातला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Share Market Closing: सेन्सेक्स-निफ्टी घसरणीसह बंद; निफ्टी बँकेत तेजी, कोणते शेअर्स तेजीत?

IND vs AUS : विराट कोहलीला खुणावतोय राहुल द्रविडचा विक्रम; ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर हव्यात फक्त १०२ धावा

तर 'कुछ कुछ होता हैं' मध्ये राणी मुखर्जी ऐवजी दिसली असती ऐश्वर्या राय; 'या' कारणामुळे दिलेला नकार, म्हणालेली-

Stock Market: कोण आहेत FPI आणि FII? त्यांच्यामुळे शेअर बाजार कोसळतो अन् तेजीत येतो?

महाराष्ट्रात गलिच्छ राजकारण सुरू, 'अदृश्य' शक्तीने कारस्थान रचून दोन पक्ष फोडले; सुप्रिया सुळेंचा भाजपवर हल्ला

SCROLL FOR NEXT