PM नरेंद्र मोदी यांच्या शपथविधीनंतर देशात सत्तास्थापन झाली. यानंतर आता लोकसभेच्या अध्यक्षपदी कोणाच्या नावाची मोहोर लागणार याची चर्चा जोर धरू लागली आहे. एनडीएचा मित्रपक्ष टीडीपी आपल्या नेत्याला अध्यक्ष पदावर आणण्याचा प्रयत्न करत आहे. लोकसभा अध्यक्षपदासाठी आंध्र प्रदेश भाजप अध्यक्ष आणि चंद्राबाबू नायडू यांच्या मेहुणी डी. पुरंदेश्वरी यांच्या नावाची चर्चा आहे.
लोकसभा अध्यक्षांची निवड करणे हे सत्तास्थापनेनंतर सर्वात पहिलं काम असतं. भारतीय संविधानातील कलम 93 मध्ये असे सांगितले गेले आहे की, लोकसभेच्या अध्यक्षपदाची खुर्ची रिकामी असेल तर त्वरीत याबद्दल बैठक घेऊन निवडून आलेल्या खासदारांपैकी दोघांची निवड करावी.
संसदेत सभापती पद शक्तिशाली असते. लोकसभेच्या कामकाजापासून ते खासदारांच्या सदस्यत्वापर्यंत सर्व काही सभापतीच ठरवतात. सभागृहात अल्पसंख्य असल्यास, सभापतींचे स्थान अधिक वाढते. अध्यक्ष कसे निवडले जातात. अध्यक्षपदासाठीची प्रक्रिया काय आहे, त्याचे नियम काय आहेत याबद्दल अधिक जाणून घेऊयात.
पहिल्या बैठकीआधी अध्यक्षपदाचे पद रिकामे होते
नव्या लोकसभेच्या पहिल्या बैठकीपूर्वी आधीच्या लोकसभेचे अध्यक्षपद रिक्त केले जाते. म्हणजेच सध्या लोकसभेचे अध्यक्ष असलेले ओम बिर्ला हे नव्या लोकसभेच्या पहिल्या बैठकीपूर्वीच अध्यक्षपादाचा राजिनामा देतील. स्पीकरच्या जबाबदाऱ्या स्पीकर प्रो टेम पार पाडतात जो निवडून आलेल्या खासदारांमध्ये सर्वात वरिष्ठ असतो.
त्यानंतर तात्पुरते पद सांभाळण्यासाठी प्रोटेम स्पीकर संसदेतील कामकाज चालवण्यासाठी मर्यादित कालावधीसाठी नियुक्त केला जातो. प्रोटेम स्पीकर नवीन लोकसभेच्या पहिल्या सभेचे अध्यक्षपद आणि नवीन सदस्यांना शपथ देण्याचे काम करतात. नवीन सभापतींची निवड होताच प्रोटेम स्पीकरचे पद संपुष्टात येते.
अध्यक्षांची निवड कशी केली जाते?
राज्यघटनेच्या कलम 93 मध्ये असे नमूद केले आहे की, सभापती पद रिक्त होताच. खासदारांनी आपल्यापैकी दोन खासदारांना सभापती आणि उपसभापती म्हणून निवडावे लागेल. ती व्यक्ती लोकसभेची सभासद असणे आवश्यक आहे. याशिवाय इतर कोणतेही वेगळे नियम यासाठी नाहीत.
मात्र, अध्यक्षपद भूषवणाऱ्या व्यक्तीसाठी देशाची घटना आणि कायदे समजून घेणे हा महत्त्वाचा गुण मानला जातो. सभागृहात उपस्थित असलेल्या सदस्यांचे साधे बहुमत आणि मतदान आवश्यक असते. मतदानानंतर सहसा सत्ताधारी पक्षाचाच खासदार अध्यक्श बनू शकतो.
जेव्हा लोकसभेच्या अध्यक्षपजाचा उमेदवार निश्चित केला जातो. तेव्हा त्याचे नाव पंतप्रधान किंवा संसदीय कामकाज मंत्री जाहीर करतात.
अध्यक्षांचे काम काय असते?
अध्यक्षांचे प्रमुख काम संसदेचे अध्यक्षपद व कामकाज चालवणे आहे. लोकसभेचे अध्यक्षही दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीचे अध्यक्षस्थान भुषवतात.
सभागृहाच्या एकूण सदस्यसंख्या कमी असेल तर सभापती सभा तहकूब करू शकतात किंवा सभा स्थगित करू शकतात.
सहसा अध्यक्ष कोणत्याही मुद्द्यावर मत देत नाही. पण संसदेत टाय झाल्यास ते मतदान करू शकतात. विश्वासदर्शक ठरावातील त्यांचे एक मतही खूप महत्त्वाचे ठरते.
सभागृहाच्या समित्या सभापतींद्वारे स्थापन केल्या जातात आणि त्यांचे कार्य सभापतींच्या निर्देशानुसार केले जाते.
सभापती हा सभागृह, त्याच्या समित्या आणि सदस्यांच्या अधिकारांचा आणि विशेषाधिकारांचा संरक्षक मानला जातो.
लोकसभा अध्यक्षाला हटवलं जाऊ शकतं का?
सभापतींचा कार्यकाळ अंदाजे 5 वर्षांचा असतो. लोकसभा विसर्जित झाल्यानंतरही त्यांनी आपले पद कायम ठेवले आहे. लोकसभा विसर्जित झाल्यानंतर पुढील लोकसभेच्या पहिल्या बैठकीपर्यंत सभापती आपले पद रिक्त करणार नाहीत. मात्र, 5 वर्षापूर्वी सभापतींनी राजीनामा देण्याची किंवा पदावरून दूर करण्याची तरतूद घटनेत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.