Loksabha Special Session sakal
देश

Loksabha Special Session : विरोधक सरकारला घेरण्याची शक्यता

नरेंद्र मोदी ३.० सरकारच्या कार्यकाळातील पहिले अधिवेशन २४ जूनपासून सुरू होणार असून पहिल्याच विशेष अधिवेशनात विरोधकांकडून सरकारला घेरले जाण्याची शक्यता आहे.

सकाळ वृत्तसेवा

नरेंद्र मोदी ३.० सरकारच्या कार्यकाळातील पहिले अधिवेशन २४ जूनपासून सुरू होणार असून पहिल्याच विशेष अधिवेशनात विरोधकांकडून सरकारला घेरले जाण्याची शक्यता आहे. राष्ट्रपतींचे अभिभाषण, नवनिर्वाचित खासदारांचा शपथविधी, लोकसभा अध्यक्षांची निवड हा या अधिवेशनाचा प्रमुख अजेंडा आहे. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर संसदेच्या अधिवेशनाची तीन जुलै रोजी सांगता होईल.

येत्या २४ ते २६ जून या कालावधीत नवनिर्वाचित खासदारांना हंगामी अध्यक्षांकडून शपथ दिली जाईल. त्यानंतर २७ तारखेला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे उभय सदनातील सदस्यांसमोर अभिभाषण होईल. याच दिवशी राज्यसभेच्या कामकाजाला सुरुवात होणार असल्याची माहिती संसदीय कार्य मंत्री किरेन रिजिजू यांनी बुधवारी सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली.

यावेळी लोकसभा निवडणुकीत ‘इंडिया’ आघाडीचे बळ वाढले आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेदरम्यान विरोधकांकडून मोदी सरकारची कोंडी केली जाऊ शकते. विरोधकांनी भाजपला स्वबळावर सरकार स्थापन करण्यापासून रोखले होते. यामुळे अर्थातच ‘इंडिया’ आघाडीचे मनोबल उंचावलेले  राहणार आहे.

राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील (एनडीए) घटक पक्ष असलेल्या तेलगू देसम पक्ष आणि संयुक्त जनता दलाने अध्यक्षपदावर दावा ठोकला आहे. त्यामुळे सरकार यातून कशा प्रकारे मार्ग काढणार, हे पाहण्यासारखे ठरणार आहे. सतराव्या लोकसभेत उपाध्यक्षपदावर कोणालाही नेमण्यात आले नव्हते. त्यामुळे यावेळी उपाध्यक्ष नेमण्याची मागणी विरोधी पक्षांकडून केली जाऊ शकते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT