Tirumala Tirupati Devasthan Trust Property : तिरुमला तिरुपती देवस्थान (TTD), या जगातील सर्वात श्रीमंत मंदिर ट्रस्टने अखेर त्यांच्या एकूण मालमत्ता किती याबद्दल माहिती उघड केले आहे. समोर आलेल्या माहितीनुसार मंदिराची संपत्ती ही मेघालय, मिझोरम, नागालँड आणि सिक्कीम या पाच राज्यांच्या एकत्रीत बजेटपेक्षा बालाजी मंदिराची संपत्ती ही जास्त असल्याचे समोर आले आहे. मंदिराच्या ट्रस्टकडून याबद्दलची माहिती देण्यात आली आहे.
TTD चे अध्यक्ष YV सुब्बारेड्डी यांनी सांगितले की, मंदिर ट्रस्टच्या आज देशभरात एकूण 960 ठिकाणी मालमत्ता आहेत तसेच या मालमत्ता 7,123 एकरमध्ये पसरलेल्या आहेत तसेच त्यांची किंमत 85,705 कोटी रुपये इतकी आहे.
वायव्ही सुब्बा रेड्डी यांनी पत्रकारांना सांगितले की, 1974 ते 2014 दरम्यान, वेगवेगळ्या सरकारांच्या अंतर्गत वेगवेगळ्या TTD ट्रस्टने वेगवेगळ्या कारणांसाठी मंदिर ट्रस्टच्या 113 मालमत्ता निकाली काढल्या होती. त्यांनी स्पष्ट केले की 2014 पासून एकाही TTD मालमत्ता निकाली काढली गेली नाही.
दरवर्षी श्वेतपत्रिका जारी करण्याचा ठराव
सुब्बा रेड्डी म्हणाले की, राज्य सरकारच्या निर्देशानुसार, माझ्या अध्यक्षतेखालील मागील TTD विश्वस्त मंडळाने दरवर्षी TTD मालमत्तेवर श्वेतपत्रिका जारी करण्याचा निर्णय घेतला होता. गेल्या वर्षी पहिली श्वेतपत्रिका प्रसिद्ध झाली होती. तर सर्व मालमत्तेचे तपशील आणि मूल्यांकन असलेली दुसरी श्वेतपत्रिका आता TTD वेबसाइटवर अपलोड करण्यात आली आहे. ट्रस्टचे अध्यक्ष पुढे म्हणाले की, भक्तांच्या भावनांनुसार पारदर्शक प्रशासन देण्यावर आमचा विश्वास आहे आणि मंदिर ट्रस्टच्या मालमत्तेचे रक्षण करण्याचा आम्ही संकल्प करतो.
14,000 कोटींची फिक्स डिपॉझीट
हे लक्षात घेण्यासारखे आहे की देवस्थानाच्या अनेक राष्ट्रीय बँकांकडे 14,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त मुदत ठेवी आहेत तर सोन्याचा साठा 14 टनांपेक्षा जास्त आहे. TTD आधीच जगातील सर्वात श्रीमंत हिंदू मंदिर ट्रस्ट म्हणून ओळखले जाते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.