वाराणसी (उत्तर प्रदेश): दोघांचे एकमेकांवर प्रेम. पण, प्रियकराचा विवाह ठरल्याचे समजल्यानंतर तिला मोठा धक्का बसला. प्रियकर तिला भेटलाही पण प्रेयसी म्हणाली, बास, मी आता जगूच शकत नाही, अन् तिने आत्महत्येचा निर्णय घेतला.
प्रेयसीने नदीत उडी मारून आत्महत्या केल्याची घटना येथे घडली आहे. यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. प्रिती प्रजापति असे आत्महत्या केलेल्या युवतीचे नाव आहे. तेलियाबाग क्षेत्रातील रनिया भागामधील एका शाळेत प्रिती ही शिक्षिका म्हणून काम करत होती.
प्रिती व रोहित गुप्ताचे गेल्या काही वर्षांपासून प्रेमसंबंध होते. परंतु, राहितचा विवाह ठरल्याचे समजल्यानंतर दोघांमध्ये चॅटींग व साडे तीन तास फोनवरून बोलणेही झाले. नैराष्यात गेलेल्या प्रितीने अखेर नदीत उडी मारून आत्मत्या केल्याची माहिती समोर आली आहे. प्रितीच्या आत्महत्येला जबाबदार म्हणून रोहितला धरले असून, त्याला ताब्यात घेण्यात आले आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.
पोलिस अधिकारी प्रभाकर चौधरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'प्रिती शाळेत शिकवण्याबरोबरच खासगी क्लासही घेत होती. रोहित व प्रितीचे गेल्या चार वर्षांपासून प्रेमसंबंध होते. दोघे विवाह करणार होते. परंतु, रोहितचा सात डिसेंबर रोजी एका युवतीसोबत विवाह ठरला. यामुळे प्रिती नैराष्यात गेली होती. रोहितचा विवाह ठरल्याचे समजल्यानंतरही दोघे तासन् तास फोनवरून बोलत होते. 11 डिसेंबर रोजी रोहित प्रितीला भेटण्यासाठी शाळेजवळ गेला होता. यावेळी दोघांमध्ये चर्चाही झाली. पण, प्रिती नाराज होती. अखेर, तिने मृत्यूपूर्वी चिठ्ठी लिहून आत्महत्येचे पाऊल उचलले. राजघाटावर जाऊन तिने पाण्यात उडी मारून आत्महत्या केली. राजघाटाच्या दिशेने जात असताना सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहे.'
पत्नी म्हणाली, तू फक्त नावाला नवरा म्हणून राहा...
आत्महत्येच्या दिवशी 21 कॉल...
प्रितीने आत्महत्या करण्यापूर्वी 21 वेळा साडेतीन तास रोहितसोबत बोलल्याचे माहिती उघड झाली आहे. शिवाय, चॅटींगमधूनही प्रेमाबद्दलची माहिती समोर आली आहे. नदीत उडी मारण्यापूर्वी शेवटच्या सीसीटीव्हीमध्ये तिचा चेहरा दिसला आहे.
युवती म्हणते, माझ्या होणाऱया बाळाचे चार बाबा...
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.