lovers boy found in tree at uttar pradesh 
देश

'त्या' अवस्थेतही दोघे एकमेकांकडेच पाहात होते...

वृत्तसंस्था

पिलीभित (उत्तर प्रदेश): दोघांचे एकमेकांवर प्रेम होते. दोघांचे मृतदेह एका झाडाला लटकलेल्या स्थितीत आढळून आले असून, त्या अवस्थेततही डोळे एकमेकांकडे होते. या घटनेची चर्चा परिसरात रंगली आहे.

बिलसंडा गावातील रामलखन (वय 19) याचे गावातील एका 15 वर्षीय मुलीसोबत प्रेमसंबंध होते. दोघांच्या प्रेमसंबंधाबाबत समजल्यानंतर मुलीच्या कुटुंबियांनी रामलखनला मारहाण केली होती. यानंतर रामलखन गाव सोडून नोकरीसाठी दिल्लीला गेला होता. मात्र, यानंतरही दोघांचे फोनवर बोलणे सुरू होते. होळसाठी रामलखन गावाला आला होता. यावेळी दोघांची भेट झाली. काही वेळानंतर दोघेही बेपत्ता झाले होते. दोघांचा शोध घेण्यात आला. परंतु, ते आढळून आले नाहीत. दुसऱया दिवशी गावापासून एक किलोमीटर अंतरावर दोघांचे मृतदेह एका झाडाला लटकलेल्या स्थितीत आढळून आले. याबाबतची माहिती पोलिसांना दिल्यानंतर पोलिस घटना घटनास्थळी दाखल झाले होते. मृतदेह शवविच्छेदन अहवालासाठी रुग्णालयात पाठविण्यात आले आहेत.

पोलिसांनी सांगितले की, शवविच्छेदनाचा अहवाल हाती आल्यानंतर कारण समजू शकेल. सध्यातरी प्रेमप्रकरणातून आत्महत्या केल्याचे दिसत आहे. याबाबतचा पुढील तपास करत आहोत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vote Jihad: भाजपच्या ‘वोट जिहाद’ प्रचाराला शरद पवारांचं जोरदार प्रत्युत्तर; म्हणाले, भाजपला पुण्यात विशिष्ट समाज...

Beed VBA: बीडमधील अपक्ष उमेदवाराला काळं फासून मारहाण! वंचितच्या पदाधिकाऱ्यांचं कृत्य; भाजपला पाठिंबा दिल्यानं आक्रमक

हिवाळ्यात कंबरदुखीपासून आराम मिळवायचा आहे? उपाशी पोटी या पदार्थाचा करा सेवन

Maharashtra Election: उमेदवारांचा प्रचार नागरिकांच्या जीवावर! काँग्रेसच्या प्रचार रॅलीत फटाके फोडल्यानं ९ वर्षाचा मुलगा गंभीर जखमी

तिलक-संजूची शतकं, अल्लू अर्जूनसारखी स्टाईल, जर्सी नंबरचं सिक्रेट अन् कॅप्टन रोहितला स्पेशल मेसेज; BCCI चा खास Video

SCROLL FOR NEXT