Now LPG Cylinder Latest Price is 750  esakal
देश

LPG Latest Price: रक्षाबंधन ठरतोय लकी ! गृहिणींना दिलासा; ७५० रुपयात मिळणार सिलेंडर

आता सगळ्यांसाठी मुख्यत: घरघुती महिलांसाठी सिलेंडरच्या दराबाबत दिलासा देणारी महत्वाची माहिती पुढे येतेय.

सकाळ डिजिटल टीम

रक्षाबंधनाच्या सणाची सगळे आतुरतेने वाट तर बघतच आहेत पण त्याचबरोबर तुम्हाला एलपीजी सिलेंडर दरात रक्षांबंधनाच्या दिवशी कपात होणार असल्याचे कळले तर तुमचा आनंद नक्कीच दुप्पट होणार आहे. होय ! गेल्या एक ऑगस्टला फक्त कमर्शियल सिलेंडरच्या दरातच कपात झाली होती. त्यावेळी घरघुती सिलेंडरच्या दरात काहीही बदल झाले नव्हते. मात्र आता सगळ्यांसाठी मुख्यत: घरघुती महिलांसाठी सिलेंडरच्या दराबाबत दिलासा देणारी महत्वाची माहिती पुढे येतेय. (Now LPG Cylinder Latest Price is 750)

आता सिलेंडरचं वजन असणार ७ किलो कमी

आपण ज्या सिलेंडरविषयी बोलतोय ते कंपोजिट सिलेंडर असणार आहे. हे सिलेंडर ७५० रुपयांच्या दरात मिळणार आहे. तब्बल ६ दशकानंतर आता घरघुती सिलेंडरमध्ये गॅस कंपनी बदल करतेय. बाजारात येणारं कंपोजिट सिलेंडर हे लोखंडी सिलेंडरपेक्षा वजनाने ७ किलो हलके असणार आहे. आपण आतापर्यंत वापरत असणारं घरघुती सिलेंडरचं वजन १७ किलो असायचं आणि त्यात गॅस भरल्यानंतर त्याचं वजन ३१ किलोच्या थोडं जास्त असायचं. आता कंपोजिट सिलेंडरचं वजन १० किलो असणार आहे. आणि त्यात गॅस १० किलो असणार.

दहा किलो वजन असणाऱ्या सिलेंडरचे शहरानुसार दर

  • दिल्ली - 750 रुपये

  • मुंबई - 750 रुपये

  • कोलकाता - 765 रुपये

  • चेन्नई - 761 रुपये

  • लखनऊ - 777 रुपये

  • जयपुर - 753 रुपये

  • पटना - 817 रुपये

  • इंदौर - 770 रुपये

  • अहमदाबाद - 755 रुपये

  • पुणे - 752 रुपये

  • गोरखपुर - 794 रुपये

  • भोपाल - 755 रुपये

  • आगरा - 761रुपये

  • रांची - 798 रुपये

वाढलेल्या एलपीजी सिलेंडरच्या दरामुळे दैनंदिन जीवनातील बऱ्याच गोष्टींचे दर वेगाने वाढले होते. मात्र आता नवे दर ऐकून निश्चितच गृहिणींना दिलासा मिळणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: भाजपाचे अतुल भातखळकर आघाडीवर

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पोस्टल मतमोजणीत युगेंद्र पवार आघाडीवर; अजित पवार पिछाडीवर

Maharashtra Assembly Elecation Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

Maharashtra Assembly Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

SCROLL FOR NEXT