देश

CM बघेल एअरपोर्टवर बसले धरणे देत; प्रियांकांच्या भेटीसाठी जाताना अडवलं

विनायक होगाडे

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरीमध्ये (lakhimpur kheri violence) झालेल्या नृशंस हिंसाचारात चार शेतकरी ठार झाले आहेत. या घटनेतील पीडितांच्या नातेवाईकांचे सांत्वन करण्यासाठी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या प्रियांका गांधी (congress leader priyanka gandhi) गेल्या असता त्यांना ताब्यात घेण्यात आलं आहे. गेल्या 30 तासांपेक्षा जास्त काळ त्या उत्तर प्रदेश पोलिसांच्या ताब्यात आहेत. आणि आता शांतता भंग केल्याच्या आरोपाखाली प्रियांका गांधींसह ११ जणांविरोधात (FIR against priyanka gandhi) एसएचओ हरगाव पोलिस ठाण्यात (SHO Hargaon police station) एफआयआर दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे उत्तर प्रदेशात तणाव निर्माण झाल्यामुळे कलम १४४ लागू करण्यात आले आहे.

या दरम्यानच छत्तीसगढचे मुख्यमंत्री भूपेश बघेल प्रियांका गांधींना भेटाया लखनऊला भेटायला निघाले असता, त्यांना एअरपोर्टवरच अडवण्यात आलं आहे. त्यानंतर भूपेश बघेल यांनी त्या ठिकाणीच जमिनीवर बसून धरणे आंदोलन सुरु केलं आहे. सीतापूर येथे प्रियांका गांधीजींना भेटण्यासाठी मी लखनौला आलो. पण मला विमानतळ सोडण्याची परवानगी दिली जात नाहीये, असं छत्तीसगडचे मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते भूपेश बघेल म्हणाले आहेत.

तर दुसरीकडे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी चिदंबरम यांनी म्हटलंय की, हा घटनाक्रम पूर्णपणे अवैध आणि लज्जास्पद आहे. प्रियांका गांधींना सकाळी सूर्योदयापूर्वी एका पुरुष पोलिसाने अटक केली आहे. त्यांना न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर अजूनही हजर करण्यात आलं नाहीये.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT