Siddhartha Chattopadhyaya Ludhiana Court Bomb Blast Siddhartha Chattopadhyaya
देश

लुधियाना कोर्ट बॉम्बस्फोट प्रकरण : पोलिसानेच रचलेलं कारस्थान

सकाळ डिजिटल टीम

लुधियाना : पंजाबमधील लुधियाना कोर्ट बॉम्बस्फोटाने (Ludhiana court bombing case) हादरला होता. यात एकाचा मृत्यू तर तर पाच जण जखमी झाले होते. माजी पोलिस कर्मचारी गगनदीप सिंग यांनीच हे स्फोट घडवले (Police conspiracy) होते, असे तपासात पुढे आले आहे. त्याला २०१९ मध्ये सेवेतून बडतर्फ करण्यात आले होते. अंमली पदार्थांच्या तस्करी प्रकरणात अटक झाल्यानंतर दोन वर्षे तुरुंगात घालवली होती, अशी माहिती पंजाबचे डीजीपी सिद्धार्थ चटोपाध्याय यांनी (Siddhartha Chattopadhyaya) दिली. पंजाब विधानसभा निवडणूक जवळ आल्याने राजकारण तापले असतानाच लुधियाना कोर्टातील बॉम्बस्फोटाने खळबळ उडाली होती. (Ludhiana Court Bomb Blast)

लुधियाना कोर्ट बॉम्बस्फोट प्रकरणी (Ludhiana court bombing case)धक्कादायक माहिती समोर आली आहे. बॉम्बस्फोटात ठार झालेल्या व्यक्तीची ओळख पटवण्यात यश आले आहे. त्याचे नाव गगनदीप सिंग असे होते. त्याला पंजाब पोलिस दलातून बडतर्फ करण्यात आले होते, हे विशेष... त्यानेच हा स्फोट घडवून आणल्याचे तपासातून पुढे आले आहे.

लुधियाना कोर्टातील बॉम्बस्फोटाने एकच खळबळ उडाली होती. या घटनेवरून अनेक दावे केले गेले आणि राजकारणही तापले. या स्फोटात पाकिस्तानचा हात असल्याचे बोलले जात होते. तसा तपासही केला जात होता. केंद्र सरकारकडूनही या घटनेची गंभीर दखल घेण्यात आली होती. केंद्रीय गृहमंत्रालयाकडून घटनेबाबत पंजाब सरकारकडे अहवाल मागण्यात आला होता. अधिक तपासासाठी एनएसजी आणि एनआयए पथकही लुधियानात पाठवण्यात आले होते. तपासातून माजी पोलिस कर्मचारी गगनदीप सिंग यांनीच स्फोट घडवल्याचे (Police conspiracy) समोर आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जनसंघ पक्ष म्हणून १९६२मध्ये निवडणुकीत उतरला; पहिल्या प्रयत्नात ० जागा, नंतर 'फिनिक्स'झेप, २०२४ मध्ये भाजपचा चढता आलेख किंगमेकर ठरला!

Maharashtra Assembly Election Result: भाजप पुन्हा नंबर वन, जवळपास ७० टक्के जागा जिंकण्याचा घडविला विक्रम

Maharashtra Election 2024: पंतप्रधान मोदींनी शिंदे-फडणवीस-पवारांचे केले अभिनंदन, म्हणाले, महाराष्ट्रात सत्याचा विजय

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: निकालाच्या दिवशी मुंबईत नक्की काय घडलं? वाचा एका क्लिकवर!

Daund Election Result 2024 : दौंड- राहुल कुल यांची हॅटट्रिक, १३ हजार मतांच्या फरकाने विजयी..!

SCROLL FOR NEXT