कारमधील सर्व जण अमरावतीहून आपापल्या घरी परतत होते.
Betul Road Accident : मध्य प्रदेशातील बैतूल (Madhya Pradesh Betul) जिल्ह्यामधील झल्लार भागात शुक्रवारी सकाळी झालेल्या भीषण अपघातात 11 जणांचा मृत्यू झाला. भरधाव वेगात आलेल्या तवेरा कारनं (Tavera Car) बसला जोरदार धडक दिल्यानं हा अपघात झाला. या भीषण अपघातात 5 पुरुष, 4 महिला आणि दोन लहान मुलांचा जागीच मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, कारमधील सर्व जण अमरावतीहून (Amravati) आपापल्या घरी परतत होते. कार चालकाला डुलकी लागली आणि कारवरील नियंत्रण सुटलं. त्यानंतर कार विरुद्ध दिशेनं येणाऱ्या बसला धडकली. ही धडक इतकी भीषण होती की, कारचा चक्काचूर झाला. माहिती मिळताच बैतूलचे जिल्हाधिकारी आणि एसपीसह अन्य अधिकारी घटनास्थळी पोहोचले.
बैतूल परतवाडा रस्त्यावरील झल्लार गावात गुरुवारी दुपारी 2 वाजताच्या सुमारास बस आणि तवेरा कार यांच्यात झालेल्या धडकेत 11 जणांचा मृत्यू झाला. बैतूलचे पोलीस अधीक्षक सिमाला प्रसाद यांनी सांगितलं की, झल्लार परिसरात बस क्रमांक एमपी 48 पी 0193 आणि तवेरा कार यांच्यात धडक झाली. गाडीतील सर्व लोक मजूर आहेत, हे सर्वजण महाराष्ट्रातील कळंबा येथून आपल्या गावाकडं जात होते. महाराष्ट्रात काम करणारे हे मजूर दिवाळी आणि छठ पूजानिमित्त आपापल्या घरी गेले होते आणि आता सण संपवून तवेरा गाडीनं घरी परतत होते. या अपघातात प्राण गमावलेल्या मजुरांची माहिती लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.