Madhya Pradesh gets two Deputy Chief Ministers Jagdish Devda Rajendra Shukla named deputy CM Narendra Singh Tomar knp94 
देश

MP News: मध्य प्रदेशला मिळाले दोन उपमुख्यमंत्री; नरेंद्र सिंह तोमर यांनाही महत्वाची जबाबदारी

मध्य प्रदेशातील मुख्यमंत्रीपदाबाबतचा सस्पेन्स संपला आहे. आमदार मोहन यादव हे मध्य प्रदेशचे नवे मुख्यमंत्री असणार आहेत

कार्तिक पुजारी

भोपाळ- मध्य प्रदेशातील मुख्यमंत्रीपदाबाबतचा सस्पेन्स संपला आहे. आमदार मोहन यादव हे मध्य प्रदेशचे नवे मुख्यमंत्री असणार आहेत. तर, राज्याला दोन उपमुख्यमंत्री देण्यात आले आहेत. जगदीश देवडा आणि राजेश शुक्ला यांना उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. तसेच माजी केंद्रीय मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांना विधानसभा अध्यक्ष करण्यात आलं आहे.

58 वर्षीय मोहन यादव यांच्या हाती मध्य प्रदेश राज्याचे सूत्र देण्यात आले आहेत. पक्षाच्या बैठकीमध्ये याबाबत निर्णय घेण्यात आला. नरेंद्र सिंह तोमर यांनी आमदार झाल्यानंतर केंद्रीय मंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. त्यांना विधानसभा स्पीकरची जबाबदारी देण्यात आली आहे. (Madhya Pradesh gets two Deputy Chief Ministers Jagdish Devda Rajendra Shukla named deputy CM Narendra Singh Tomar)

अर्थ मंत्री आणि मंदासोर मतदारसंघाचे दोन वेळचे आमदार जगदीश देवडा आणि जनसंपर्क मंत्री राजेंद्र शुक्ला या दोघांना उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. मुख्यमंत्रीपदासाठी निवड झाल्यानंतर मोहन यादन म्हणाले की, मी एक छोटा कार्यकर्ता आहे. राज्य आणि केंद्रातील नेतृत्वाने दाखवलेल्या विश्वासाबाबत धन्यवाद. तुमचे प्रेम आणि पाठिंब्याने मी माझी जबाबदारी योग्य रीत्या निभावण्याचा प्रयत्न करेन.

मोहन यादव हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विश्वासातले मानले जातात. शिवराज सिंह चौहान सरकारमध्ये ते शिक्षणमंत्री होते. भाजप पक्षाच्या भोपाळमधील बैठकीमध्ये शिवराज सिंह चौहान यांनीच त्यांच्या नावाची शिफारस केल्याचे समजते. भाजपने मोहन यादव यांची नियुक्ती करुन धक्कातंत्राचा वापर केला असल्याचं बोललं जातं. कारण, मुख्यमंत्रीपदासाठी चौहान हे प्रबळ दावेदार होते. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kannad Assembly Election 2024 Result Live: पतीविरुद्धच्या लढतीत पत्नीची बाजी, संजना जाधवांची हर्षवर्धन जाधवांना धोबीपछाड

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्यासाठी निघाले

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates : डॉ. हिकमत उढाण यांचा 2309 मतांनी विजय, सहाव्यांदा टोपेंचा विजय रोखला

Pune: राहुल कुल यांच्या विजयाचा जल्लोष करताना माजी उपसरपंचाचा मृत्यू

Islampur Assembly Election 2024 Results : इस्लामपूर मतदारसंघावर जयंत पाटलांचंच वर्चस्व! निशिकांत पाटलांचा केला 'करेक्ट कार्यक्रम'

SCROLL FOR NEXT