Congress pledge sakal
देश

Congress Pledge : शेतकऱ्यांचे दोन लाखांपर्यंतचे कर्ज होणार माफ; काँग्रेसचे ‘वचनपत्र’

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कमलनाथ यांच्या हस्ते आज जाहीरनाम्याचे प्रकाशन करण्यात आले.

पीटीआय

भोपाळ - राज्यातील लोकांना २५ हजार रुपयांचे विमा संरक्षण आणि इतर मागासवर्गीयांना (ओबीसी) २७ टक्के आरक्षण आदी लोकप्रिय आश्वासनांचा समावेश असलेला जाहीरनामा (वचनपत्र) आज मध्य प्रदेशात काँग्रेस पक्षाकडून प्रसिद्ध करण्यात आला.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कमलनाथ यांच्या हस्ते आज या जाहीरनाम्याचे प्रकाशन करण्यात आले. विशेष म्हणजे या आश्वासनांच्या जंत्रीमध्ये राज्याच्या ‘आयपीएल’च्या टीमची स्थापना करण्याच्या घोषणेचाही समावेश आहे.

या १०६ पानांच्या जाहीरनाम्यामध्ये पक्षाकडून ५९ आश्वासने देण्यात आली असून महिला, शेतकरी आणि सरकारी कर्मचारी अशा विविध घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. राज्यातील सर्व लोकांना २५ लाखांचा आरोग्य विमा देण्याबरोबरच त्यामध्ये दहा लाख रुपयांच्या अपघात विम्याचा देखील समावेश असल्याचे कमलनाथ यांनी सांगितले. भविष्यामध्ये ‘इंडियन प्रिमिअर लीग’मध्ये मध्य प्रदेशच्या संघाचा देखील समावेश असेल हे सांगायला देखील ते विसरले नाहीत.

पाचशे रुपयांत सिलिंडर देणार

शेतकऱ्यांचे दोन लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ करण्यात येणार असून प्रत्येक महिलेला दरमहा दीड हजार रुपये एवढी मदत देण्यात येईल. पाचशे रुपयांमध्ये गॅस सिलिंडर देण्याचे आश्वासनही काँग्रेसकडून देण्यात आले आहे. मोफत शालेय शिक्षण, राज्यात जुन्या निवृत्तिवेतन योजनेची अंमलबजावणी, तरुणांसाठीच्या बेरोजगार भत्त्यामध्ये वाढ करून तो दीड हजारांवरून तीन हजार रुपये या आश्‍वासनांचाही जाहीरनाम्यात समावेश आहे.

अन्य आश्वासने

  • धान आणि गव्हाची रास्त दरामध्ये खरेदी

  • राज्य सरकार शेण खताचीही खरेदी करणार

  • राज्यामध्ये दोन लाख कर्मचाऱ्यांची भरती

  • मध्य प्रदेशाला उद्योगाचे केंद्र बनविणार

  • सिंचनासाठी शेतकऱ्यांना पाच अश्‍वशक्तीपर्यंत मोफत वीज

  • शेतकऱ्यांचे थकीत वीजबिल माफ करणार

  • दिव्यांगांचे निवृत्तिवेतन वाढवून ते दोन हजार करणार

  • राज्यामध्ये जातीनिहाय जनगणना करणार

  • सरकारी सेवा, योजनांत ओबीसींना २७ टक्के आरक्षण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जनसंघ पक्ष म्हणून १९६२मध्ये निवडणुकीत उतरला; पहिल्या प्रयत्नात ० जागा, नंतर 'फिनिक्स'झेप, २०२४ मध्ये भाजपचा चढता आलेख किंगमेकर ठरला!

Maharashtra Assembly Election Result: भाजप पुन्हा नंबर वन, जवळपास ७० टक्के जागा जिंकण्याचा घडविला विक्रम

Maharashtra Election 2024: पंतप्रधान मोदींनी शिंदे-फडणवीस-पवारांचे केले अभिनंदन, म्हणाले, महाराष्ट्रात सत्याचा विजय

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: निकालाच्या दिवशी मुंबईत नक्की काय घडलं? वाचा एका क्लिकवर!

Daund Election Result 2024 : दौंड- राहुल कुल यांची हॅटट्रिक, १३ हजार मतांच्या फरकाने विजयी..!

SCROLL FOR NEXT