stray dogs esakal
देश

Woman Killed By Dogs: भटक्या कुत्र्यांच्या भीषण हल्ल्यात महिलेचा मृत्यू, शरीराचे लचकेही तोडले!

सकाळ डिजिटल टीम

भोपाळ : रस्त्यावरील भटक्या कुत्र्यांनी एका महिलेवर भीषण हल्ला केल्याची घटना मध्य प्रदेशातील मुंदराई इथं घडली आहे. या हल्ल्यामध्ये या महिलेचा मृत्यू झाला असून तिच्या मृतदेहाचे लचके कुत्रे तोडत असल्याचं भयानक दृश्यही काही ग्रामस्थांनी पाहिलं. (Madhya Pradesh Woman Killed By Dogs Locals Saw Strays Eating Body)

रस्त्यानं जाणाऱ्या एका व्यक्तीला हे भयानक दृश्य दिसल्यानंतर त्यानं ग्रामस्थांना याची माहिती दिली त्यानंतर पोलिसांनाही माहिती दिली गेली. खबर मिळता पोलीस तातडीनं घटनास्थळी दाखल झाले पण महिलेचा मृत्यू झाला होता. त्यानंतर हा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला. याचा रिपोर्ट आल्यानंतर त्यात स्पष्ट झालं की, महिलेच्या शरिरावर कुत्रांनी चावा घेतल्यानं खोलवर जखमा झाल्यानं तिचा मृत्यू झाला. कारण इतर कुठल्याही जखमा तिच्या शरिरावर आढळलेल्या नाहीत. या घटनेचा फॉरेन्सिक रिपोर्ट समोर आल्यानंतर या मृत्यूबाबतचं खरं कारणंही समोर येईल.

दरम्यान, मृत महिलेच्या नातेवाईकांनी सांगितलं की, मृत्यू पावलेली महिला सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास शेताकडं कामांसाठी निघून गेली होती. पण त्यावेळी काही भटकी कुत्री तिच्या मार्गातील झाडांभोवती घुटमळत होती. यानंतर काही वेळातच रस्त्यानं जाणाऱ्या एका व्यक्तीनं पाहिलं की, कुत्रे या महिलेच्या शरिराचे लचके तोडत आहेत. त्यानंतर ही घटना समोर आली.

विभागीय अधिकाऱ्यांनी या घटनेबाबत सांगितलं की, कुत्र्यांनी या महिलेवर हल्ला केल्याचं प्रथमदर्शनी दिसतं आहे. पण तिच्यावर जंगली श्वापदांनी हल्ला केल्याचं दिसून आलेलं नाही. या गावापासून ५ किमीपर्यंतच्या त्रिज्येमध्ये कुठलंही वन किंवा जंगल नाही. तर गावातील काही लोकांनी असाही आरोप केला की, सिओनी महापालिकेनं शहरातील भटके कुत्रे पकडून आमच्या गावात आणून सोडले आहेत, त्यामुळंच ही परिस्थिती ओढवली. पण पालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की, शहरात कुत्रे पकडण्याची कुठलीही मोहिम राबवण्यात आलेली नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तो जगला, तरच देश जगेल

कृषिक्षेत्र आधुनिकतेच्या दिशेनं

जातिनिहाय जनगणनेची अपरिहार्यता

निवडणूक काश्मीरची; परीक्षा केंद्राची

संघ भाजपच्या मदतीला येणार...

SCROLL FOR NEXT