Latest Marathi News Live Update Esakal
देश

Maharashtra Breaking News Updates : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

सकाळ वृत्तसेवा

घराची भिंत कोसळून एका ८ वर्षीय मुलीचा मृत्यू

मुंबईतल्या लोअर परळ येथे घराची भिंत कोसळून एका ८ वर्षीय मुलीचा मृत्यू झाला आहे. तर एक जण जखमी झाला आहे. जखमीवर केईएम रूग्णालयात उपचार सुरु आहेत.

मराठा आरक्षणासाठी 19 वर्षीय तरुणाने घेतला गळफास

मराठा आरक्षणासाठी 19 वर्षीय संदीप रोहिदास गायकवाड या तरुणाने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना शनिवारी घडली आहे. सेलू तालुक्यातील देऊळगाव गात येथे ही घटना घडली आहे. आत्महत्या पूर्वी मयत तरुणाने चिठ्ठी लिहली आहे.नौकरी आणि आरक्षणात आरक्षण नसल्याने आपण आत्महत्या करत असल्याचं तरुणाने चिठ्ठीत नमूद केलं आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संत तुकाराम महाराज पालखीचे केले सारथ्य

निगडीमध्ये संत तुकाराम महाराजांची पालखी आल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या पालखीचे सारथ्य केले.

मुलुंड पश्चिमेस १७ वर्षीय मुलाची हत्या

मुलुंड पश्चिमेस १७ वर्षीय मुलाची हत्या करण्यात आली आहे. गुटखा खाण्यास पैसे दिले नाही म्हणून वाद झाला होता. हुसेन ताज हुसैन खान (वय १७) असे मृत मुलाचे नाव आहे. या प्रकरणी एकूण ३ आरोपींना अटक करण्यात आलेली आहे.

अंमळनेरमध्ये घराचे छत कोसळले, मुलगी जखमी

जळगावच्या अंमळनेरमध्ये वादळामुळे घराचे छत कोसळून मुलगी जखमी झाली आहे. अमळनेर शहरातील कसाली मोहल्ला येथे ही घटना घडली.

Vasant Gitte Live : वसंत गित्तेंच्या कार्यालयावर अतिक्रमणाची कारवाई

माजी आमदार वसंत गित्ते यांच्या संपर्क कार्यालयावर नाशिक महानगरपालिकेने अतिक्रमणाची कारवाई केली आहे. राजकीय सुडापोटी ही कारवाई केल्याचा आरोप गित्ते समर्थकांनी केलाय. लोकसभा निवडणुकीचा निकाल जिव्हारी लागल्याने मध्य नाशिकच्या भाजपच्या आमदार देवयानी फरांदे यांच्या सांगण्यावरून ही कारवाई होता असल्याचा आरोप देखील करण्यात आला आहे.

Mumbai Live : फेक पासपोर्टप्रकरणी ३२ जणांविरोधात गुन्हा दाखल

Navi Mumbai Live: SRPF भरती प्रक्रियेदरम्यान उमेदवाराचा मृत्यू

तळोजा डायघर येथे सुरु असलेल्या एसआरपी पोलीस भरती प्रक्रिया सुरू असताना एका उमेदवाराचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. अक्षय बिऱ्हाडे असे या मृत्यू झालेल्या उमेदवाराचे नाव असून धावपट्टीवर धावत असताना तो मैदानातच कोसळला होता. अक्षयला तातडीने कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आले मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. अक्षय हा जळगावचा रहिवासी असून नवी मुंबईतील तळोजा येथे भरती प्रक्रियेत सहभागी झाला होता. 500 मीटर धावपट्टी पूर्ण होण्याआधीच अक्षय मैदानात कोसळल्याने तत्काळ त्याला रुग्णालयात आणण्यात आले मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

Beed Live - हल्ला प्रकरणात कुंडलिक खांडेंना 3 दिवसांची पोलीस कोठडी

शिवसेना शिंदे गटाचे उपजिल्हाप्रमुख माऊली खांडे यांच्यावर हल्ला केल्याप्रकरणी कुंडलिक खांडे यांना ३ तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यामुळं आधीच अटकेत असणाऱ्या आणि नुकतीच शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखपदावरून हकालपट्टी झालेल्या कुंडलिक खांडे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. आज पहाटे त्यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर न्यायालयात हजर केले असता त्यांना न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

Arvind Kejriwal Live : केजरीवालांची 12 जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडीत रवानगी

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची 12 जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. केजरीवाल सध्या दिल्ली मद्य घोटाळ्याप्रकरणी सीबीआयच्या अटकेत आहेत. त्यांना आज दिल्लीच्या राऊस अव्हेन्यू कोर्टानं न्यायालयीन कोठडी सुनावली.

आषाढी वारीत विस्कळित पाणी पुरवठ्याचे विघ्न

आषाढी वारीच्या निमित्ताने लाखो वारकरी पुण्यात विशेषतः मध्यवर्ती पेठांमध्ये दोन दिवस मुक्कामी असताना शहरावर विस्कळित पाणी पुरवठ्याचे विघ्न ओढवले आहे.

अरविंद केजरिवाल यांना १२ जुलैपर्यंत न्यायलयीन कोठडी सुनावली

दिल्ली न्यायालयाने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अबकारी धोरण प्रकरणाशी संबंधित सीबीआय प्रकरणात १२ जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

आरटीओत भ्रष्टाचार,विजय वडेट्टीवारांचा आरोप

प्रादेशिक परिवहन कार्यालये (RTO) भ्रष्टाचाराची माहेरघरं झाली आहेत. या आधी आरटीओचा घोटाळा काही नवीन नाही. पण आता आणखी एक मोठा घोटाळा समोर आला आहे.

शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांची पक्षातून हाकालपट्टी

शिवसेना शिंदे गटाचे बीड जिल्हा प्रमुख कुंडलिक खांडे यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. शिवसेना सचिव संजय मोरे यांनी तसं पत्र देखील काढले आहे. शिस्तभंग समितीच्या शिफारशीनुसार आणि शिवसेना मुख्यनेते एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने हकालपट्टी करण्यात आल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे..

Ashadhai Wari 2024 Live:मुख्यमंत्री पालखी प्रस्थासाठी आळंदीत दाखल

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पालखी प्रस्थानासाठी आळंदीत दाखल झाले आहे. काही वेळातच ज्ञानेश्वर महाराजांची पालखी पंढरपुरसाठी प्रस्थान करणार आहे. टाळांच्या गजरात आळंदीनगरी दुमदुमली आहे. मोठ्या संख्येने वारकरी येथे जमले आहे.

Typing Exam Scam : टायपिंग परीक्षेस बसलेल्या १५ डमी विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल

नंदुरबार जिल्ह्यातील शहादा शहरातील वसंतराव नाईक विद्यालयात मराठी टायपिंग परिक्षे दरम्यान चक्क १५ विद्यार्थी डमी आढळून आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता.

Ashadhi Wari 2024 Live :  संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी प्रस्थान सोहळ्याला सुरुवात

माऊलींच्या आषाढीवारी सोहळ्यात मानाच्या ५६ दिंड्या सहभागी झाल्या आहेत. या प्रत्येक दिंडीमध्ये ९० वारकरी संजीवन समाधी मंदिराच्या परिसरात दाखल झाले. त्यानंतर, रिंगण सोहळ्याला सुरुवात झाली. दोन ते अडीच तास हा सोहळा संजीवन समाधी मंदिर परिसरात रंगला. यावेळी वारकरी भक्तीमध्ये तल्लीन झाल्याचे दिसून आले.

Ashadhi Wari 2024 Live : संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात पाकीटमारांचा सुळसुळाट

आज जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची पालखी देहूतून पिंपरी-चिंचवडकडे मार्गस्थ होत असताना पोलिसांनी ५ पॉकेटमारांना ताब्यात घेतले आहे.

Vijay Wadettiwar Live : लाडकी बहिण योजनेवरुन हक्कभंग आणणार - विजय वडेट्टीवार

लाडकी बहीण योजनेची घोषणा आणि जीआर काढल्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये गोंधळ निर्माण झाला आहे. या योजनेवरून हक्कभंग आणणार असल्याचा इशारा विजय वडेट्टीवार यांनी दिला आहे.

Rajkot Airport Live : राजकोट विमानतळावर मोठी दुर्घटना; मुसळधार पावसामुळे छत कोसळले

गुजरातमध्ये मुसळधार पावसामुळे राजकोट विमानतळावर मोठी दुर्घटना घडली आहे. विमानतळ टर्मिनलच्या बाहेर पॅसेंजर पिकअप आणि ड्रॉप एरियामध्ये छत कोसळले आहे. या प्रकरणाचा सविस्तर अहवाल मागवला आहे.

PMC Property Tax Live : 40% सवलतीबाबत पुणे महापालिकेने घेतले महत्वपूर्ण निर्णय; PT-3 अर्ज भरण्याची वाढवली मुदत

स्वतः राहत असलेल्या निवासी मिळकतीला ४०% सवलत प्राप्त करणेकरिता PT-३ अर्ज भरण्याची मुदत पुणे महापालिकेने दि. १५ ऑगस्ट २०२४ पर्यंत वाढवली आहे.

CM Eknath Shinde Live : CM शिंदेंची विधानसभेत जेष्ठ नागरिकांसाठी मोठी घोषणा

राज्यातील सर्व ज्येष्ठ नागरिकांना तीर्थस्थळांचे दर्शन घडविण्यासाठी 'मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना' सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत केली. या योजनेसंदर्भात आमदार प्रताप सरनाईक यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती.

Jitendra Awhad Live : पुन्हा छत्रपती शिवाजी महाराजांचं चारित्र्य बदनाम करणाऱ्यांचा इतिहास पुढे आणायचाय का?

सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगुंटीवार म्हटले आहेत की छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती तारखेनुसार होण्याऐवजी तिथीनुसार करण्यात येईल, आता पुन्हा एकदा तिथीनुसार करायचा आणि पुन्हा शिवाजी महाराज यांचं चारित्र्य बदनाम करणारे पुरंदरे आणि जेम्स लेन यांचा इतिहास पुढे आणायचा आहे का?

Maharashtra Vidhan Sabha Session LIVE : विधानभवनातल्या गर्दीवर अध्यक्षांचा मोठा निर्णय

विधानसभेचं पावसाळी अधिवेशन 2024 सुरू आहे. विधानभवनात जास्त गर्दी होत असल्यानं अध्यक्षांनी महत्वाचा निर्णय घेतला आहे. विधानभवनात येणाऱ्या अभ्यांगतांना फक्त मंगळवारी, गुरुवारी प्रवेश दिला जाईल.

Priyanka Chaturvedi Live :  केंद्रीय एजन्सीच्या गैरवापराबद्द्ल काय म्हणाल्या प्रियांका चतुर्वेदी

UBT शिवसेनेच्या राज्यसभा खासदार प्रियांका चतुर्वेदी म्हणाल्या, "शिक्षण मंत्री त्यांच्या जबाबदारीपासून पळ काढत आहेत... ते विद्यार्थ्यांच्या समस्या ऐकायला तयार नाहीत... NEET चा मुद्दा..चर्चेपासून दूर आहे. केंद्रीय एजन्सीच्या गैरवापराच्या निषेधात आपण सर्वांनी सहभाग घेतला पाहिजे..."

Eknath Shinde Live: अमली पदार्थ विक्रेत्यांवर कारवाई करण्याची मुख्यमंत्री शिंदे यांची घोषणा

अमली पदार्थ विक्रेते आणि साठेबाज यांच्यावर राज्यभरात कारवाई करण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. अनधिकृत धंदे बंद करण्याची राज्यव्यापी कारवाई सुरु राहिल. शहरं अमली पदार्थ मुक्त होत नाहीत तोपर्यत ही कारवाई सुरुच राहणार असल्याचे शिंदे म्हणाले.

Pune Pub Live: परवाना रद्द असतानाही मद्याची विक्री, पुण्यात प्लिंक पबवर कारवाई

पुण्यातील येरवड्यात परवाना रद्द असतानाही मद्य विक्री केल्यामुळे पोलिसांनी प्लिंक पबवर कारवाई केली आहे.

CBI Raids Live: NEET UG गैरव्यवहार प्रकरणी गुजरातमध्ये सात ठिकाणी छापे

NEET UG मधील कथित अनियमिततेशी संबंधित प्रकरणाच्या संदर्भात अहमदाबाद आणि गोध्रासह चार जिल्ह्यांमध्ये सीबीआयने सात वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकले आहेत.

Maharashtra BJP Live: महाराष्ट्र भाजपच्या बैठकीला केंद्रातील नेते दाखल

केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव, अश्विनी वैष्णव आणि भाजपचे इतर नेते पक्षाच्या कोअर कमिटीच्या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी मुंबईतील भाजप कार्यालयात दाखल झाले आहेत.

Gajanan Maharaj: गजानन महाराजांची पालखी परभणीत दाखल

आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरकडे पायी वारी घेऊन निघालेल्या शेगावच्या संतश्रेष्ठ गजानन महाराजांच्या पालखी परभणी जिल्ह्यात दाखल झाली आहे.

Shivsena ubt live : विनायक राऊत यांना विधान परिषदेवर संधी मिळणार?

माजी खासदार विनायक राऊत यांना विधान परिषदेवर संधी मिळण्याची शक्यता आहे. त्यांच्या नावाला खुद्द पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची पसंती असल्याचे सूत्रांकडून समजते.

Vidhansabha 2024 Live: येत्या विधानसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडी 200 च्या वर जागा जिंकेल

येत्या विधानसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडी 200 च्या वर जागा जिंकेल असा विश्वास शिवसेनेचे नेते माजी खासदार सुभाष वानखेडेंनी व्यक्त केला.विधानसभेत महाविकास आघाडीलाच चांगलं यश मिळेल.पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मला नांदेड जिल्ह्यातून कुठल्याही विधानसभा क्षेत्रातून निवडणूक लढवण्यास सांगतील त्या विधानसभा क्षेत्रातून मी निवडणूक लढण्यास तयार आहे. असेही ते म्हणाले.

Dog bite Latest Update: तरापूरमध्ये भटक्या श्‍वानांचा २७ जणांना चावा

TARAPUR: भटक्या श्‍वानांच्या टोळ्या नागरिकांवर हल्ले चढवत आहेत. अशातच बोईसर शहरात एकाच दिवशी २७ जणांना भटक्या श्‍वानाने चावा घेतल्याने नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

Iran News President Election Live: इराणचा नवा अध्यक्ष आज जाहीर होणार

इराणमध्ये शुक्रवारी अध्यक्षपदासाठीच्या निवडणुका पार पडल्या. शनिवारी नवा अध्यक्ष जाहीर होईल. अध्यक्ष रईसी यांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू झाला होता. त्यानंतर या निवडणूका घेण्यात आल्या.

Sharad Pawar On Rahul Gadhi Live: राहुल गांधी कष्ट करणारे, नव्या पिढीचे नेतृत्व करतील- शरद पवार

काँग्रेस नेते राहुल गांधी हे कष्ट करणारे नेते आहेत. ते नव्या पिढीचे नेतृत्व करतील असं शरद पवार म्हणाले आहेत. आज सकाळी पत्रकार परिषदेमध्ये ते बोलते होते.

Rain Update Live: पुणे, रायगड जिल्ह्यात पावसाचा ऑरेंज अलर्ट

राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. मुंबई-नवी मुंबई परिसरात पुढील दोन दिवस चांगला पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुणे, रायगड जिल्ह्यात पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

Pune Zika Patient Live: पुण्यात झिकाचा चौथा रुग्ण सापडला

पुण्यात झिकाचा प्रादुर्भाव वाढत असल्याचं दिसत आहे. पुण्यातील मुंढवा भागात झिकाचा चौथा रुग्ण आढळून आला आहे. त्यामुळे चिंता वाढली असून प्रशासन सतर्क झालं आहे.

राज्यात अनेक ठिकाणी आज पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. राज्याचा बजेट सादर झाला असून यावर आजही प्रतिक्रिया येण्याची शक्यता आहे.  विरोधक आणि सत्ताधारी यांच्यामध्ये यावरून आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Sexual Assault Case: पुणे पुन्हा हादरले! घरात घुसून नराधमाने केला महिलेवर अत्याचार

Tirupati Balaji Prasad Video: तिरुपती बालाजीच्या प्रसादात आता आढळले किडे, पाहा धक्कादायक व्हिडिओ

Whatsapp Username Feature : मोबाईल नंबर नसतानाही व्हॉट्सॲपवर करता येणार चॅटिंग; काय आहे युजरनेमचं भन्नाट फीचर?

Mumbai Local: नवीन वेळा पत्रामुळे रेल्वे प्रवाशांची दाणादाण!

Bigg Boss Marathi 5 : "हा अन्याय आहे..." व्होटिंग ट्रेंडमध्ये धक्कादायक बदल ; प्रेक्षकांचा मेकर्सवर घणाघाती आरोप

SCROLL FOR NEXT