शहरामध्ये काळ्या दिनी मोठ्या प्रमाणात फेरी काढण्यात येणार आहे. तर खानापूर व निपाणी येथे धरणे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
बेळगाव : काळा दिनी (Black Day) काढण्यात येणाऱ्या फेरीच्या जनजागृतीला वेग आला आहे. यासंदर्भात ठिकठिकाणी बैठका घेऊन हजारोंच्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले जात आहे. त्यामुळे काळा दिनी हजारोंच्या संख्येने मराठी भाषिक एकवटण्याची शक्यता आहे.
भाषावार प्रांतरचना करण्यात आल्यानंतर सीमाभागातील मराठी भाषिकांवर मोठ्या प्रमाणात अन्याय करण्यात आला. मराठीबहुल गावे अन्यायाने कर्नाटकात डांबण्यात आली होती. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून मराठी भाषिक आपल्या मायबोलीच्या राज्यात जाण्यासाठी लढा देत आहे.
तसेच एक नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे (Maharashtra Ekikaran Samiti Belgaum) आयोजित केल्या जाणाऱ्या फेरीत हजारो मराठी भाषिक सहभागी होऊन पुन्हा एकदा महाराष्ट्रात जाण्याचा निर्धार करीत असतात. बुधवारी काळ्या दिनाची फेरी काढण्यात येणार असून, समितीने ठिकठिकाणी बैठका घेऊन फेरीमध्ये मोठ्या संख्येने सहभागी होण्यासाठी जनजागृती सुरू केली आहे.
विविध ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या बैठकांना मोठा प्रतिसाद मिळत असून युवक-युवतीसह आबालवृद्ध फेरीमध्ये सहभागी होण्याचा निर्धार करीत आहे. फेरीमध्ये महाराष्ट्रातील नेते मंडळींनी सहभागी व्हावे. तसेच मार्गदर्शन करावे यासाठी समितीतर्फे महाराष्ट्रातील नेते मंडळी व विविध पक्षांच्या नेत्यांना पत्र पाठविण्यात आले आहे.
शहरामध्ये काळ्या दिनी मोठ्या प्रमाणात फेरी काढण्यात येणार आहे. तर खानापूर व निपाणी येथे धरणे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. काळा दिन यशस्वी करण्यासाठी कार्यकर्त्यांनी प्रयत्न सुरू केले असून, जनजागृतीला कमी वेळ शिल्लक आहे. त्यामुळे प्रत्येक कार्यकर्त्याने आपल्यापरीने जनजागृती करावी, असे आवाहन समितीतर्फे करण्यात आले आहे.
शहरी भागासह ग्रामीण भागातील युवकांनी गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावरून अधिक प्रमाणात जनजागृती करण्यास सुरुवात केली आहे. त्याला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे. काळ्या दिनाबाबत सर्वच ठिकाणी बैठका घेता येत नाहीत. त्यामुळे कार्यकर्त्यांनी जास्तीत जास्त प्रमाणात सोशल मीडियावरून जनजागृती करावी, अशी सूचना समितीतर्फे करण्यात आली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.