Maharashtra Ekikaran Samiti esakal
देश

मराठी भाषिकांवर दादागिरी! कन्नड सक्ती मागे घ्या, अन्यथा..; महाराष्ट्र एकीकरण समितीचा प्रशासनाला थेट इशारा

कन्नड फलक लावण्याबाबत सक्ती करून व्यापारी आणि दुकानदारांना धमकावण्याचा प्रयत्न सुरू आहे.

सकाळ डिजिटल टीम

पोटशूळ उठलेल्या एका कन्नड संघटनेच्या मोर्चाने पोलिस संरक्षणात समिती आणि मराठी भाषिकांविरोधात आगपाखड करण्याचा प्रयत्न केला.

बेळगाव : गेल्या काही दिवसांपासून शहर आणि परिसरात कन्नड फलक लावण्याबाबत सक्ती करून व्यापारी आणि दुकानदारांना धमकावण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे मराठी भाषिकांवर (Marathi Bhashik) दडपशाही करणाऱ्या व्यक्तींवर २५ जानेवारीच्या आत कठोर कारवाई करावी. तसेच कन्नड सक्ती मागे घ्यावी. अन्यथा भव्य मोर्चा काढून तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने (Maharashtra Ekikaran Samiti) जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आला आहे.

गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या अनेक भागांत दुकाने व व्यापारी आस्थापनांवर कन्नड भाषेतील (Kannada Organization) फलक लावा, अन्यथा कारवाई करू, असे सांगत दुकानदार व व्यापाऱ्यांना धमकावण्याचा प्रयत्न मोठ्या प्रमाणात सुरू झाला आहे. त्यामुळे प्रशासनाने तातडीने कन्नड सक्ती मागे घ्यावी, या मागणीसाठी समितीच्यावतीने मंगळवारी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.

यावेळी माजी आमदार मनोहर किणेकर यांनी १९५६ पासून मराठी भाषिक सीमाप्रश्न सुटावा आणि मराठी भाषिकांवरील अन्याय दूर व्हावा, यासाठी लढा देत आहेत. तसेच सातत्याने वेगवेगळ्या मार्गातून प्रश्न सुटावा, यासाठी प्रयत्न करण्यात आल्यानंतर देखील कर्नाटक सरकारकडून कोणत्याही प्रकारचे सहकार्य मिळत नसल्याने महाराष्ट्र सरकारने सीमाप्रश्र्नी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. याबाबत सुनावणी सुरू आहे. त्यामुळे सीमाप्रश्न प्रलंबित असताना कन्नड सक्ती करणे अतिशय चुकीचे आहे.

मराठी भाषिकांवर दादागिरी करणाऱ्या कन्नड संघटनांच्या कार्यकर्त्यांवर कारवाई करा, अन्यथा मराठी भाषिक स्वस्त बसणार नाहीत, तसेच रस्त्यावर उतरून आंदोलन सुरू केले जाईल, असा इशारा दिला. समिती नेते रमाकांत कोंडुसकर यांनी कन्नड फलक लावण्यासाठी दादागिरी सुरू आहे. तसेच मराठी व इतर भाषेतील फलकांची तोडफोड केली जात आहे. त्यामुळे मराठी भाषेवर आणि संस्कृतीवर गंडांतर आणू नका, अन्यथा मराठी भाषिक स्वस्थ बसणार नाहीत. येत्या काही दिवसांत कारवाई न झाल्यास मोठे आंदोलन छेडले जाईल. त्याला सर्वस्वी सरकार जबाबदार राहील, असा इशारा दिला.

हे निवेदन देतेवेळी मध्यवर्ती समितीचे सरचिटणीस मालोजी अष्टेकर, माजी आमदार दिगंबर पाटील, ॲड. राजाभाऊ पाटील, खजिनदार प्रकाश मरगाळे, रणजित चव्हाण पाटील, माजी महापौर शिवाजी सुंठकर, खानापूर समितीचे अध्यक्ष गोपाळ देसाई, नगरसेवक रवी साळुंखे, शिवाजी मंडोळकर, ॲड. एम. जी. पाटील, ॲड. सुधीर चव्हाण, विकास कलघटगी, मदन बामणे, गणेश दड्डीकर, युवा समितीचे सरचिटणीस श्रीकांत कदम, वासू सामजी, चंद्रकांत कोंडुसकर, राजू कदम, सचिन केळवेकर, शुभम शेळके, माजी नगरसेवक नेताजी जाधव.

तसेच मनोहर हलगेकर, विजय भोसले, अनिल पाटील, मुरलीधर पाटील, आर. आय. पाटील, आबासाहेब दळवी, प्रकाश चव्हाण, गोपाळ पाटील, मनोज पावशे, सुनील अष्टेकर, सतीश पाटील, दत्ता जाधव, सागर पाटील, कपिल भोसले, यशवंत बिर्जे, राजाराम देसाई, रामचंद्र मोदगेकर, शिवानी पाटील, निंगाप्पा मोरे, भाऊराव पाटील, कृष्णा हुंदरे, ज्योतिबा आंबोळकर, संजय पाटील, राजू किणेकर, संतोष बांडगी, आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

कन्नड संघटनेला पोटशूळ

कन्नड सक्ती विरोधात निवेदन देण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात हजर होते. त्यामुळे पोटशूळ उठलेल्या एका कन्नड संघटनेच्या मोर्चाने पोलिस संरक्षणात समिती आणि मराठी भाषिकांविरोधात आगपाखड करण्याचा प्रयत्न केला. तसेच समितीच्या कार्यकर्त्यांना अटक करा, असे सांगत घोषणाबाजी केली. मात्र, त्यांच्या घोषणाबाजीकडे कोणीही लक्ष दिले नाही. उलट समितीच्या कार्यकर्त्यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या जोरदार घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT