पेट्रोल पंप चालकांचा संपाचा कुठलाही विचार नाही, त्यामुळं नागरिकांनी पेट्रोल पंप बंद राहणार असल्याच्या अफवांवर विश्वास ठेऊ नये, असं आवाहन पेट्रोल-डिझेल असोसिएशननं केलं आहे.
जपानमध्ये झालेल्या भूकंपानंतर इशिकावा प्रांतातील 32 हजारांहून अधिक घरांचा वीजपुरवठा खंडित झाला आहे.
येणारी लोकसभा निवडणूक आपण शेतकऱ्यांच्या प्रश्नावर लढवणार असून ही लढाई लोकवर्गणीतून होईल, असं रविकांत तुपकर यांनी स्पष्ट केलं.
येत्या १३ जानेवारी रोजी बीडमध्ये ओबीसी नेते तथा मंत्री छगन भुजबळ सभा घेणार आहेत. ओबीसी बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला.
भारत-पाकिस्तानमध्ये आण्विक माहितीचे आदानप्रदान करण्यात आले आहे. १९९२ पासून ही माहिती एकमेकांना दिली जाते.
नागपूरमध्ये वेगळ्या विदर्भासाठी विदर्भवादी आक्रमक झाले आहेत. त्यांनी वेगळ्या विदभासाठी संविधान चौकात रास्ता रोको केला. सरकारला विदर्भवाद्यांनी ३१ डिसेंबरपर्यंतचा वेळ दिला होता.
जपानमधील भारतीय नागरिकांसाठी दुतावासाकडून एमरजेन्सी संपर्क क्रमाक जारी करण्यात आले आहे. त्सुनामीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आलाय.
बुलढाण्यात शेतकऱ्यांचा ट्रॅक्टर पोलिसांनी अडवला. गेल्या एक तासांपासून हा मोर्चा अडवून ठेवण्यात आला आहे.
जपानमध्ये ७.५ रिश्टर स्केलचा भूकंप झाला आहे. भूकंपाची तीव्रता जास्त असून त्सुनामीची पहिली लाट जपानमध्ये धडकली आहे. जपान सरकारने अलर्ट जारी केला असून नागरिकांना उच्च ठिकाणांवर जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे. भूकंपाच्या ३०० किलोमीटर अंतरापर्यंत त्सुनामी येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे
नव्या कायद्यांविरोधात ट्रक चालकांनी चक्का जाम केला आहे. ट्रक चालकांचा नव्या कायद्याला विरोध आहे
कोरेगाव भीमामध्ये पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. ३०० सीसीटीव्ही, ६ ड्रोन कॅमेऱ्यांची नजर परिसरात आहे.
जपानमधील उत्तर-पूर्व भागात ७.५ रिश्टर स्केलचा मोठा भूकंप झाला आहे. त्यामुळे जपानमध्ये त्सुनामीचा इशारा देण्यात आला आहे.
थंडीसोबतच धुके आणि प्रदूषणाचाही परिणाम दिल्ली-एनसीआरवर मोठ्या प्रमाणावर होताना दिसत आहे. 2023 च्या शेवटच्या दिवशी उत्तर भारतातील सात राज्यांमध्ये कडाक्याची थंडी होती. नवीन वर्षाची सुरुवातही कडाक्याच्या थंडीने झाली आहे. अनेक भागात दाट धुक्यामुळे रेल्वे, हवाई आणि रस्ते वाहतूक प्रभावित झाली आहे.
मुंबईत मद्यपान करून वाहन चालवणाऱ्या २७५ वाहनचालकांविरोधात पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. तर ठाण्यात २९७ जणांविरोधात कारवाई करण्यात आली आहे. नवीन वर्ष २०२४चं स्वागत करण्यासाठी मुंबईकरांसह, ठाण्यातील नागरिकांनी ३१ डिसेंबर २०२३ला रात्री मोठा जल्लोष केला.
राज्यात गेल्या सात दिवसांत कोविड-१९च्या सक्रिय रुग्णांच्या संख्येत सहा पटीने वाढ झाली आहे. २३ डिसेंबरपर्यंत १०३ सक्रिय रुग्ण होते, ती संख्या ३० डिसेंबरला ६२० झाली आहे. त्यातील २२ टक्के रुग्ण मुंबईत आहेत.
४ जानेवारी रोजी दिल्लीला राहुल गांधी काँग्रेसची महत्वाची बैठक घेणार आहेत. येवेळी सर्वच राज्यातील प्रदेशाध्यक्ष उपस्थित राहणार आहेत. नाना पटोले या बैठकीला जाणार आहेत.
अंतरवली सराटी येथे मराठा समाजावर झालेल्या लाठीचार्जची आठवण झाली की, अजूनही मन सुन्न होतं, अशी प्रतिक्रिया मनोज जरांगे पाटील यांनी दिली. यावेळी ते असेही म्हणाले की, त्यावेळी झालेल्या गोळीबाराची घटना अजूनही आम्हाला सुन्न करते. एका वृत्तवाहिनीशी ते बोलत होते.
वर्षाच्या अखेरच्या दिवशी कस्टम व डायरेक्टोरेट ऑफ रेव्हेन्यु इंटेलिजन्स यांच्या संयुक्त विद्यमाने झालेल्या कारवाईत डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर एका प्रवाशाकडून दोन किलो सोने जप्त करण्यात आले.
श्री सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या मिल मशिनमध्ये अडकून कामगाराचा मृत्यू झाला आहे. ही घटना रविवारी पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास घडली. गेनसिद्ध शिवलिंगप्पा अंदोडगी (वय ५५, रा. कुंभारी, ता. दक्षिण सोलापूर) असे मृत कामगाराचे नाव आहे.
लाचखोरी रोखण्यासाठी शासनस्तरावरून सातत्याने प्रयत्न केले जात असतानाही, लाचखोरीला आळा बसण्याऐवजी लाच घेण्याचे प्रमाण लक्षणीयरित्या वाढते आहे. यंदा वर्षभरात राज्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ८०३ गुन्हे दाखल करीत १ हजार १७० आरोपींना जेरबंद केले आहे. यात सर्वाधिक १६३ लाचखोरीचे गुन्हे नाशिक विभागात दाखल झाले आहेत. गत वर्षाच्या तुलनेत राज्यभरातील लाचखोरीत ७० गुन्हे वाढले आहेत. २०२३ मध्ये राज्यात ८०३ गुन्हे दाखल आहेत.
रस्ते विकास महामंडळ व महामार्ग पोलिसांच्या विविध उपाययोजनांमुळे यशवंतराव चव्हाण मुंबई- पुणे द्रुतगती मार्गावरील अपघात घटले, परंतु वाहने अद्याप सुसाटच आहेत. या महामार्गावर भरधाव वाहने एका मिनिटात दोन किलोमीटर अंतर कापतात. त्यामुळे वाहनांच्या वेगावर नियंत्रण आणणे गरजेचे असल्याचे बोलले जात आहे.
जमशेदपूरमध्ये कार अनियंत्रित होऊन दुभाजकाला धडकल्याने झालेल्या अपघातात 6 जणांचा मृत्यू झाला आहे. अपघाताच्या वेळी कारमध्ये एकूण 8 जण प्रवास करत होते, हे सर्व आदित्यपूरचे रहिवासी होते. पाच जणांचा जागीच मृत्यू झाला तर एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. दोन वाचलेले गंभीर जखमी आहेत. पुढील तपास सुरू असल्याची माहिती जमशेदपूर पोलिासांनी दिली आहे.
फिल्म निर्माते फारुख कबीर यांची पत्नी आणि सासूविरोधात बाळ चोरल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. फरार झालेल्या फारूक कबीर यांच्या पत्नीला आणि सासूला पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. नवजात बाळाला घेऊन पत्नी आणि सासू देश सोडून बाहेर जात असल्याची तक्रार फिल्म निर्माते फारुख कबीर यांनी दिली होती.
वर्सोवा पोलिसांनी यासंदर्भात गुन्हा दाखल केला होता. गुन्हे शाखेच्या युनिट ९ ने दोघींना अटक केली आहे. फारूक कबीर यांची पत्नी सनम आणि सासू दिल्फुझा यांना अमृतसरमधून ताब्यात घेण्यात आलं आहे. तसेच बाळाला पुन्हा त्याच्या वडिलांकडे सोपवण्यात आलंय.
मागील काही दिवसांपसून उत्तर भारतात थंडीचा कडाका वाढला आहे. यादरम्यान धुक्यामुळे विमान आणि रेल्वेसेवा प्रभावीत झाल्याचे पाहायला मिळत आहे. दिल्ली परिसरात 21 ट्रेन उशिराने धावत आहेत, इंडियन रेल्वेकडून याबद्दलची माहिती देण्यात आली आहे.
नव वर्षाच्या पहिल्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करत देशातील जनतेला नव्या वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. सर्वांना 2024 वर्षाच्या शुभेच्छा! हे वर्ष सर्वांना समृद्धी, शांती आणि अद्भूत आरोग्याचे जावो, असे त्यांनी म्हटले आहे.
ऐतिहासिक विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी सोमवारी पहाटेपासूनच भीमसैनिकांनी कोरेगाव-भीमा येथे गर्दी केली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील भीमा-कोरेगाव येथे दाखल होत भल्यापहाटे विजयस्तंभाला अभिवादन केलं. दरम्यान आज कोरेगाव भीमा येथे मोठा प्रमाणत पोलिस फाटा तैनात करम्यात आला आहे.
आज नवीन वर्षाचा पहिला दिवस असून आजच्या दिवसाचा पहिल्या सूर्योदयाचा मुंबई येथील गेटवे ऑफ इंडिया येथील व्हिडीओ समोर आला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.